गोर बंजारा समुदायातील,खाकीतली रणरागिणी -
हरपणी सौ. रिता ग्यानसिंग जाधव
कवितेचा छंद जोपासत कर्तव्यात ठरली अव्वल !
खाकी ! या नावानेच अनेकांचे रंग बेरंग होतात. खाकीची शान राखत स्वत:चा छंद झोपासणारे अनेक कर्तव्यदक्ष पोलीस खात्यात आहेत. पण त्या सर्वांमध्ये अनोख्या ठरल्या त्या महिला पोलीस अंमलदार (बक्कल नं. 515) सौ. रिता ग्यानसिंग जाधव! पोलीस असो वा डॉक्टर... महिला म्हटलं की कुटुंबीयांची जबाबदारी असते. त्यातही पोलीस खातं म्हटलं की, कर्तव्यनिष्ठा असलीच पाहिजे. कुटुंब व कर्तव्य याची योग्य सांगड घालत अंमलदार रिता यांनी आपलं कविमन जप्त अनेक सुंदर काव्य रचना रचल्या. या कविचा मनाचा आदर राखत तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त श्री दत्ता पडसलगीकर यांनी सौ. रिता जाधव यांना प्रशिस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला. तसेच सन 2018 साली "नात्यांच्या पलीकडले" या काव्यसंग्रहाचे प्रकाशन श्री दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या काव्यसंग्रहामुळे नागरिकांना खाकीतल्या रूपातील सौ. रिता यांचे कविमन समजू शकले.
तत्पूर्वी, सन 2006 साली एक सुवर्ण संधी अंमलदार सौ. रिता जाधव यांच्या वाट्याला आली होती. दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी, महाराष्ट्र पोलिसांच्या 7 जणांच्या चमूमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील 6 पुरुष पोलीस सहकाऱ्यांसोबत सहभागी झालेल्या सौ. रिता यांना अशोका हॉलमध्ये तत्कालीन राष्ट्रपती आदरणीय ए. पी. जे अब्दुल कलाम यांची स्नेहभेट घेण्याचे भाग्य लाभले. आजवरच्या इतिहासात प्रजासत्ताकदिनासाठी महाराष्ट्र पोलीस दलातर्फे निवड झालेल्या सौ. रिता ग्यानसिंह जाधव या एकमेव महिला पोलीस अंमलदार आहेत.
अंमलदार रिता यांच्या कर्तव्याबाबत सांगायचे झाल्यास त्यांनी अनेक उत्तम कामगिरी केल्या आहेत. पण त्यापैकी एक म्हणजे माहिम वाहतूक विभागात कर्तव्यावर असताना अंमलदार रिता यांनी टोविंग क्रेनवर धारावीसारख्या परिसरात कर्तव्य बजावले. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे रिता जाधव यांना पोलीस अधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिकांचे कायम सहकार्य मिळाले. आजही जागरूक नागरिकांकडून टोविंग क्रेन घेऊन येण्याबाबत अंमलदार रित यांना फोन येतात. सद्या त्या वांद्रे पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असून बदली झाल्याचे जागरुक नागरिकांना सांगावे लागते. या कर्तव्याबद्दल तत्कालीन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते सौ. रिता यांचा सत्कार करण्यात आला आहे.
तसेच फेब्रुवारी 2019 महिन्यात झालेल्या महाराष्ट्र पोलीस साहित्य संमेलनात अंलदार रिता जाधव सहभागी झाल्या होत्या. त्यांनी सुंदर काव्य साधर केले होते.
अंमलदार रिता यांचा परिचय
सौ.रिता ग्यानसिंग जाधव
महिला पोलीस हवलदार
बांद्रा पोलीस ठाणे,
बृहन्मुंबई पोलीस दलात भरती
०१/०४/१९९१
शिक्षण - कला शाखेत पदवीधर (इतिहास विषय)
आजवर कर्तव्य बजावलेले ठिकाण
१) विमानतळ सुरक्षा विभागात ५ वर्षे
२) वाकोला पोलीस ठाण्यात ६ वर्षे
३) गुन्हे शाखा 7+वर्षं
( त्यात जापु संरक्षण, समाजसेवा शाखा, आर्थिक गुन्हे, युनिट वांद्रेमध्ये कर्तव्य बजावताना तत्कालीन पोलीस अदिकारी साळसकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रिता यांनी कर्तव्य बजावले.
४) बी.के.सी.पोलीस ठाणे 2 वर्ष (आदरणीय आबा पाटील सर यांच्या हस्ते जागतिक महिला दिनी विशेष कामगिरीबाबत सत्कार)
५) वाहतूक विभागात ७ वर्षे
वाहतूक विभागात काम करत असतांना अनेक रिवार्ड भेटली
मा.भारंबे सर, मा.उपाध्याय सर
मा.अमितेशकुमार यांचे हस्ते रिवार्ड.