जातीधर्माच्या ,भेदभावांच्या भिंती आपण
जमीनदोस्त केल्या पाहिजेत.... !
-वसंतरावजी नाईक
आज गांधी जयंतीच्या दिवशी आपण अस्पृश्यता निवारण सप्ताह सरू करीत आहोत. या गोष्टीला काही विशेष अर्थ आहे . अस्पृश्यता निवारण्याचे कार्याला महात्मा गांधीजींनी आपले जीवनकार्य मानले होते. अस्पृश्यता हा भारतीय समाजाला लागलेला कलंक आहे आणि तो धुऊन काढल्याशिवाय भारतीय समाज निरोगी बनणार नाही , एकसंध बनणार नाही अशी त्यांची निष्ठा होती. आणि म्हणून देशात सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. सामाजिक समता हे साध्य तर स्वराज्य हे त्यांनी साधन मानले . देश आता स्वतंत्र झाल्यामुळे सामाजिक समता निर्माण करण्याचे साधन आपल्याला मिळाले असून सामाजिक समतेचे, सर्व प्रकारचे भेदभाव नष्ट करण्याचे, अस्पृश्यता निवारण करण्याचे कार्य आपल्यासमोर आहे . या कार्यात जोपर्यंत सफलता मिळत नाही तोपर्यंत आपल्याला अभिप्रेत असलेल्या अर्थाचे स्वराज्य निर्माण होणार नाही .
हा देश सुसंस्कृत व्हावा , जगात पुढारलेला व्हावा अशी आमची धारणा आहे पण माणसाने माणसात फरक करणे, माणसाने माणसाला माणसाप्रमाणे वागविणे यांत सुसंस्कृतपणा आहे काय ? आमच्या समाजात पिढ्यानपिढ्या व आजही आम्ही काय पाहातो ? घाणेरड्या जनावराला स्पर्श करतो तेव्हा आम्ही बाटत नाही , कुत्र्या मांजराला स्पर्श करतो तेव्हाही आम्हाला विटाळ होत नाही. पण अस्पृश्य समाजात जन्मलेला माणूस कितीही स्वच्छ , चांगला असला तरी त्याला हात लागल्याने मात्र आम्ही बाटतो ! आणि काय आश्चर्य ? पाण्याचे चार शिंतोडे घेतले म्हणजे आम्ही लगेच शुद्ध पण होतो भारतीय समाज किती विकृत मनोवृत्तीने ग्रासला आहे आणि त्याच्या स्पृश्यास्पृश्यतेच्या कल्पना किती खुळ्या आणि निरर्थक आहेत याची यावरून कल्पना येते. तीच तर आम्हाला उच्च संस्कृती वाटत असेल तर आपण आपली कीव केली पाहिजे ? सारे जग हे एक कुटुंब आहे अशी आमची शिकवण आहे . सर्व प्राणिमात्रात ईश्वराचा अंश आहे असेही आमचा धर्म आम्हाला सांगतो. त्याच धर्मातील लोकानी आपल्याच धर्मातील लोकांना कमी लेखावे हे बरोबर नाही .
आमच्या संत महात्म्यांची शिकवण काय आहे ? ज्या महाराष्ट्रात ज्ञानदेव , नामदेव , तुकाराम , चोखामेळा जन्मास आले आणि त्यांनी समाजास खरा धर्म शिकविण्याचे कार्य केले , ज्या देशात गोखले , महात्मा गांधी , महात्मा फुले , आगरकर यांच्यासारख्या समाजसुधारकांनी चंदनासारखे झिजून समाजात परिवर्तन घडवून आणण्याचा व सामाजिक समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला , त्या देशात स्वातंत्र्यानंतर चोवीस वर्षांनीसुद्वा अस्पृश्यतेचा प्रश्न शिल्लक राहवा याबद्दल खेद वाटल्याशिवाय राहात नाही .
अस्पृश्यता मानणे हा भारतीय राज्यघटनेप्रमाणे गुन्हा ठरतो. त्यासाठी आपण निरनिराळ्या प्रकारचे कायदे करून अस्पृश्यांना प्रत्येक ठिकाणी कायदेशीर संरक्षण दिले आहे . पण समाजाच्या हाडा मासामध्ये रुजलेली अस्पृश्यतेची भावना केवळ कायद्याने लवकर नष्ट होत नाही असे दिसून आले आहे . या सामाजिक कार्यासाठी सरकारची शक्ती तोकडी पडते . त्यासाठी सामाजिक संस्थांनी व समाज सेवकांनी मनापासून काम केले पाहिजे . अस्पृश्यता पाळणे हा माणसाचा मानवतेविरुध्द गुन्हा आहे , तो अधर्म आहे , ही भावना प्रत्येकाच्या मनात बिंबविली पाहिजे. त्याकरिता सर्वांनी प्रचंड मोहीम उभारली पाहिजे . .
अस्पृश्यता निवारण्यासाठी सरकार आपल्या परीने प्रयत्न करीत आहे . पण या प्रयत्नांना सामान्य जनतेचे सहकार्य लाभले नाही , तर त्या प्रयत्नांना हवे तेवढे यश मिळत नाही . अस्पृश्यतेच्या निवारणासाठी शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे या दृष्टीने आपण प्रतिवर्षी शिक्षणावर अधिकाधिक खर्च करीत आहोत . महाराष्ट्र राज्य निर्मितीपूर्वी आपण दरसाल शिक्षणावर दोन कोटी रुपये खर्च करीत होतो. आता आपण ११० कोटी रुपये खर्च करतो. मागासलेल्या लोकांना शिक्षण मिळाल्यास बाकीच्या समाजाच्या बरोबरीने ते वागतील या उद्देशाने अनेक शैक्षणिक सवलती आपण त्यांना देत आहोत . त्याचप्रमाणे घरबांधणीचा कार्यक्रम कितीतरी पटीनी वाढविला आहे . मागासलेल्यांच्या विकासासाठी आणखीही शासनाच्या योजना आहेत . त्या सर्व योजना सांगून आपला वेळ घेणे योग्य होणार नाही . पण शासनाची शक्ती मर्यादित असल्यामुळे सर्व प्रश्न शासनानेच सोडविण्याची भाषा बोलणे बरोबर होणार नाही.
या राज्याचे हे धोरण निश्चित आहे की , जो मागे राहीला असेल त्याला पुढे आणले पाहिजे. त्यासाठी मागे सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या योजना आपण काही घेत आहोत . सर्व योजना सर्वांना एकाच वेळी लागू करणे शक्य होणार नाही . आपल्या संसारातल्या गरजा एकाच वेळी मिटू शकत नाहीत. तीच गोष्ट देशाच्या बाबतीत आहे . शिक्षणामध्ये, उद्योगांमध्ये , नोकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या त-हेने विचार करून निर्णय घेण्यात आलेले आहेत . आदिवासी किंवा हरिजन यांना विशेष सवला दिल्या जातात . शिक्षण संस्था आणि सरकारी व सरकारच्या आधिपत्याखाली चालणाऱ्या संस्थांतील नोकऱ्यांमध्ये त्यांना किती प्रमाणात जागा व नोकऱ्या मिळाव्यात हे निश्चित ठरविण्यात आले आहे . एखादे महामंडळ काढून त्याच्यामार्फत हुशार व्यक्तींना प्रगतीसाठी मदत करता येईल काय याबद्दलही आपण विचार करीत आहोत . जो श्रम करू इच्छितो त्याला काम व साधने देणे हे सरकारचे धोरण आहे . त्यासाठी आपण पंधरा कलमी योजना आखली आहे . या योजनेनुसार जो माणस धडधाकट असेल , जो काम करण्यास तयार असेल त्याला काम देण्याची व कामाप्रमाणे दाम देण्याची हमी सरकारने घेतली आहे . या योजनेसाठी पैसा अग्रक्रमाने बाजूला काढून ठेवण्यात येणार आहे . .
यापूर्वी आपण ७० टक्के शेतसारा जिल्हा परिषदेला व ३० टक्के शेतसारा ग्रामपंचायतीला देत होतो. या वर्षी आपण असा निर्णय घेतला आहे की , शंभर टक्के शेतसारा ग्रामपंचायतीलाच द्यावयाचा . या निर्णयामुळे ज्या गावांच्या जमिनीचा पोत चांगला आहे तेथे जास्त पैसा मिळणार आहे व जेथे जमीन हलकी असेल तेथे पैसा कमी मिळणार आहे . कमी उत्पन्नाची गावे मागे राहू नयेत यासाठी दरडोई दर वर्षी ज्या प्रमाणात उत्पन्न मिळावयास पाहिजे तेवढ्या प्रमाणात ते मिळत नसल्यास तेथे सरकार स्वतः भर घालून एखाद्या गावाला जेवढी रक्कम देणे आवश्यक असेल तेवढी त्या गावाला देईल .
याशिवाय चाळीस - पन्नास लक्ष रुपयांची मदत ग्रामपंचायतींना देण्याचा सरकारने कबूल केले आहे . जंगल भागातील खेड्यांतून मिळणाऱ्या उत्पन्नाच दोन टक्के रक्कम सरकार पूर्वी जिल्हा परिषदेला देत असे . त्यातून जंगल विभागात राहणाऱ्या लोकांकरिता रस्त्यासारख्या सुखसोयी करण्यात याव्यात असा सरकारचा विचार होता. आता ही रक्कम दोन टक्क्यांवरून चार टक्के करण्यात आली आ अशा रीतीने जंगल विभागातील व इतर ग्रामपंचायतींना जवळजवळ पाच कोटी रुपये मिळणार आहेत. ज्या खेड्यांकरिता आपण इतका पैसा खर्च करतो त्या खेड्यात अस्पृश्यता निवारणाचे कार्य प्रामाणिकपणे झाले पाहिजे. खऱ्या अर्थाने अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे . अस्पृश्यांच्या उन्नतीकरिता खर्च झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे . आपण खेड्यामध्ये जातो जेव्हा पाहतो की , अस्पृश्य लोक एका लहानशा जागेमध्ये गावाच्या एका टोकाला राहतात. झोपड्यांमध्ये राहतात . तेथे कोणत्याही प्रकारची स्वच्छता नसते , दिवाबत्तीची सोय नसते , पाणी नसते , रस्ते नसतात . या वातावरणात सुधारणा व्हावी म्हणून आपल्याला आता ग्रामपंचायतीना आदेश द्यावे लागणार आहेत की , ज्या ग्रामपंचायती हरिजन मोहल्ल्यामध्ये सुधारणा करणार नाहीत त्यांना एक पैसाही मिळणार नाही . ग्रामपंचायतींना मिळणारा पैसा अमुक अमुक कामाकरिताच वापरला पाहिजे , असे त्यांना बजावून सांगावे लागणार आहे . हरिजन मोहल्ल्यांमध्ये विहीर व्हावी म्हणून दिलेला पैसा दुसरीकडेच विहीर खोदण्यासाठी खर्च केला जातो . हरिजन वस्तीत रस्ता तयार करण्याकरिता घेतलेला पैसा दुसरीकडे वापरण्यात येतो अशा तक्रारी आमच्याकडे येत असतात . हे बरोबर नाही . त्यांचा बंदोबस्त आपणास करावा लागणार आहे
तसे पाहिले तर एकंदर सामाजिक परिस्थितीत आता फरक पडत आहे असे दिसून येते . कमीपणाच्या भावनेमुळे किंवा इतर दबावामुळे पूर्वी हरिजनांना मान वर करून चालता येत नव्हते . आता ते मान वर करून चालावयास शिकले आहेत . पण त्यांना अडविण्याचा प्रयत्न होत आहे . या प्रवृत्तीला पायबंद घातला पाहिजे . खेड्यामध्ये जे लोक दबलेले आहेत , त्यांना वर काढण्याचा प्रयत्ल होणे , आवश्यक ते सर्व करून त्यांच्यात स्वाभिमान जागविणे , आत्मविश्वास निर्माण करणे , त्यांना त्यांच्या न्याय्य हक्कांची व प्रगतीच्या नव्या मार्गाची जाणीव करून देणे आवश्यक आहे.
हरिजनांच्या , मागासलेल्यांच्या उन्नतीकरिता सरकारने जे धोरण अवलंबिले आहे तेच धोरण महात्मा गांधींनाही अभिप्रेत होते . आज त्यांची जयंती आहे . या पवित्र दिवशी त्यांचे अपूर्ण राहिलेले अस्पृश्योद्वाराचे कार्य पुढे चालविण्याचा व त्यात पूर्ण यश मिळवण्याचा संकल्प आपण केला पाहिजे . त्याकरिता योग्य वातावरण तयार करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे . कायद्यानेच सर्व गोष्टी होत नाहीत . हा एक सामाजिक प्रश्न आहे .तो सोडविण्याकरिता समाजानेच कटिबद्ध झाले पाहिजे.
आपल्याला आपला समाज एकजिनसी बनविला पाहिजे. आणि त्याची शक्ती देशाच्या उत्कर्षाकरिता लावली पाहिजे. समाज एकजिनसी बनविण्यात समाजातील सर्व घटकांना एकाच पातळीवर आणणे आवश्यक आहे . याशिवाय खांद्याला खांदा लावून उभे राहणार नाहीत . समाजात भेदभाव असेल तर आप देश दुबळा होईल . त्यामुळे देशाचे नुकसान होईल , ही गोष्ट आपण लक्षात घ्या आपल्या देशाचे दुबळेपण हे जातिधर्माच्या भेदात आहे म्हणून ते भेद नष्ट कर पाहिजेत . लोकांना आपण ही गोष्ट पटवून दिली पाहिजे . देशात एक प्रकारचे नवीर वातावरण निर्माण केले पाहिजे .
देशात सर्व ठीक चालले आहे असा समज कोणी करून घेऊ नका. आपल्या राज्यात गेली दोन वर्षे दुष्काळ पडला . उत्तर प्रदेशामध्ये आणि बंगालमध्ये नद्यांना पूर आले . किती तरी गावे वाहून गेली . किती तरी गावे पंधरा दिवस पाण्याखाली होती . बांगला देशाचा प्रश्न अजून आपल्या समोर आहेच . तेथून ८० - ९० लक्ष निर्वासित आपल्या देशात आले . त्यांना आपण परत पाठवू शकत नाही . कारण तो मानवतेचा प्रश्न आहे . सुदैवाने आपल्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे मजबूत आणि पुरोगामी नेतृत्व आपल्या देशाला लाभले आहे . कोणत्या वेळी काय करावे याचे त्यांना ज्ञान आहे . त्या जे पाऊल उचलतील त्यामागे सर्व देशाने सर्व शक्तिनिशी उभे राहिले पाहिजे . कोणत्याही संकटाला तोंड देण्याची तयारी दाखविली पाहिजे . प्रत्येकाने आपले कर्तव्य केले पाहिजे . आपण विभक्त असू किंवा विखुरलेले असू तर आपण संकटाला तोंड देऊ शकणार नाही . त्यादृष्टीने जातिजमातीच्या भेदामध्ये विभागलेला देश एकत्र आला पाहिजे . जातिधर्माच्या भेदभावांच्या भिंती आपण पाडून टाकल्या पाहिजेत . नष्ट केल्या पाहिजेत . आपला समाज एकाच समाजपुरुषाप्रमाणे उभा झाला पाहिजे . तेव्हाच आपल्या देशाचे संरक्षण आपण करू शकू , आपल्या देशातील गरिबी दूर करू शकू .
धन्यवाद..
( नागपूर,२ ऑक्टोबर १९७१ अस्पृश्यता निवारण सप्ताहाचे उद्घाटनपर वसंतरावजी नाईक यांचे भाषण )
संकलन- प्रा.दिनेश सेवा राठोड
profdineshrathod@gmail.com
www.profdineshrathod.blogspot.com
Cell-+91-9404372756
profdineshrathod@gmail.com
www.profdineshrathod.blogspot.com
Cell-+91-9404372756
******************************************
We must demolish the walls of casteism and discrimination .... !
- Vasantraoji Naik
Today, on the birth anniversary of Mahatma Gandhi, we are launching Untouchability Redressal Week. Today it has a special meaning. Mahatma Gandhi had considered the task of redressing untouchability as his lifelong mission. Untouchability is a stigma attached to Indian society and he was loyal to the idea that Indian society would not become healthy or united unless untouchability was washed away. And so he worked in his life to bring about social equality in the country. He considered social equality as a means of achieving self-government. Now, the country has become independent, we have got the means to create social equality. We have the task of eliminating social equality, eliminating all forms of discrimination, eliminating untouchability. Unless there is success in this work, we will not create the harmony of the intended meaning.
We believe that this country should be cultured, propelled into the world, but is it civilization to differentiate between human beings and treat to us in the same way? What do we see in our society across generations and even today? When we touch a dirty animal, we do not go to bed; But no matter how clean, good a person born in an untouchable society is, we just touch it! And what a surprise is this? Taking four sprinkles of water means that we are immediately purified but this is how the Indian society is consumed with a distorted mind and the ideas of its touch are so meaningless. If so, how we feel in high culture, then we should do it ourselves? We teach that the whole world is a family. Our religion also tells us that God is part of all beings. It is not right that people of the same religion should underestimate the people of their own religion.
What is the teaching of our saints? In Maharashtra, where Dnyanadeva, Namdev, Tukaram, Chokhamela were born and worked to teach the true religion to the community, the social reformers like Gokhale, Mahatma Gandhi, Mahatma Phule, Agarkar tried to transform society and create social equality. Twenty-four years later, the question of untouchability remains as it is.
Keeping untouchability is a crime according to the Constitution of India. For this, we have given various types of laws to protect untouchables everywhere. But the sense of untouchability rooted in the bone marrow of the society has not been shown to be destroyed by law alone. For this social work, the power of the government falls short. For this, social organizations and social workers should work wholeheartedly. Adoption of untouchability is a crime against humanity, it is unrighteousness, it should be instilled in everyone's mind. For that, everyone should make a huge campaign.
The government is trying its best to resolve untouchability. But if these efforts do not get the cooperation of the general public, then those efforts do not get much success. We are spending more money every year on education to prevent the spread of untouchability. Before the creation of the state of Maharashtra, we were spending two crore rupees on education every year. Now we spend Rs 3 crore. We are giving many educational concessions to the backward people for their education so that they will be treated as equal to the rest of society. Similarly, the housing programmes has increased manifold. There are more government schemes for the development of the backward. Saying all those plans will not be worthy. But the power of the government is limited, I think that the government will not solve all the problems.
The policy of this state is to ensure that whoever is left behind should be brought forward. For this, we are taking some of the different schemes as mentioned earlier. It will not be possible to implement all the plans at once. The needs of our world cannot be cured at once. In education, in industries, in jobs, decisions are taken in different ways. Special discounts are given to tribals or Harijans. It has been decided by the amount of seats and jobs available in the educational institutions and the jobs of government and government-run institutions. We are also thinking about whether we can remove a corporation and help intelligent people through it.
The government's policy is to give work and equipment to those who want to labor. We have planned fifteen sections for this. According to the scheme, the government has guaranteed to give to work and pay the price as per their work. The money for this scheme will be set aside on first priority.
The government's policy is to give work and equipment to those who want to labor. We have planned fifteen sections for this. According to the scheme, the government has guaranteed to give to work and pay the price as per their work. The money for this scheme will be set aside on first priority.
Earlier, we were giving 4 percent farm-land to the Zilla Parishad and 5 percent to the village panchayat. This year we have decided that 100 percent of the farm should be given to the Gram Panchayat. Due to this decision, there will be more money in the villages, where the land has good texture, and where the land is lighter, there will be less money. If the low-income villages do not get enough of the income they need to get every year to stay behind, the government itself will give the village as much money as it needs to pay.
Apart from this, the government has agreed to provide forty-five lakh rupees to the Gram panchayats. In the past, only 2 percent of the proceeds from the villages were given to the Zilla Parishad. The government thought that the roads should be made as comfortable as possible for the people living in the forest area. Now the amount has been reduced from two percent to four percent. Thus, the forest department and other Gram panchayats will get about Rs 5 crore. In the villages where we spend so much money, untouchability prevention should be done honestly. Untouchability must be destroyed in the true sense. We want to spend more for the upliftment of the untouchables. We go to the village when we see untouchables living in a small place on one end of the village. They shelter in huts. There is no cleanliness, no lighting facility, no water, no roads. In order to improve this environment, we have to give orders to the Gram Panchayat that the Gram Panchayats who do not improve Harijan Mohalla will not get even a single penny. Gram Panchayats will have to show that the money received should be used only for such work. On the other hand, the money given to dig wells is spent on other uses. We are getting complaints that the money taken in the construction of roads in Harijan ares is used elsewhere. That's not right.
Looking this, it seems that the overall social situation is making a difference. Harijans could not walk on their own in the past due to lack of spirit or other pressure. Now they have learned to walk on their own. Untouchability trend should be banned. All those who are oppressed in the village, we should try to uplift them, instill pride in them by doing all that is necessary, build confidence, make them aware of their new rights and right for their progress.
The policy has been adopted by the government for the upliftment of the Harijans and the backward as same as Mahatma Gandhi applied. Today, on his birth anniversary, this sacred day, we must be determined to carry on the work of the untouchables who are incomplete and to achieve their full success. Creating the right environment for them is very important. Everything will not be done by laws and regulations . As this is a social question, we must be committed to solve it.
We must work for our society to be united. And its power should be invested for the betterment of the country. In order to make society homogeneous, it is necessary to bring all the components of the society to the same level. Without this, we would not stand together. If there is discrimination in our society then our country will be weak. Therefore, we should realize that it is our disadvantage, as the weakness of our country is in the casteism. We must convince people for this. A new environment should be created in the country.
Don't assume that everything is going well in the country. The state has been facing drought for the past two years. Rivers flooded in Uttar Pradesh and in Bengal. How many villages flowed? Many villages were under water for fifteen days. The question of the Bangladesh is still in front of us. From there, 8-9 million refugees came to our country. You can't send them back. Because it is a question of humanity. Fortunately, the strong and progressive leadership of our Prime Minister Mrs. Indira Gandhi has benefited our country. She knows what to do for them. Nations must stand with its power. We must be prepared to face any crisis. Everyone should do their duty honestly. If we are separated or scattered, we will not be able to cope with the crisis. In that view, a country divided into caste distinctions must come together at once. We must demolish the walls of caste discrimination and it should be destroyed completely. Our society should stand as one man. Only then, we can protect our country and eliminate poverty from our country.
Thanks.....
(Inaugural speech delivered by VASANTRAOJI NAIK on 'Untouchability Prevention Week' on October 2, 1971 NAGPUR)
Ref-Desai Dinesh -Plough And Pipe
Selected Speeches
Ref-Desai Dinesh -Plough And Pipe
Selected Speeches