Monday, July 29, 2019

VASANTRAO NAIK: Historical Fact to Remember THROUGH OTHERS' EYES FROM THE GOLDEN PAGES OF HISTORY

वसंतरावजी नाईकः मुख्यमंत्री पदाच्या निवृती नंतर, बिहारचे राज्यपाल पद व देशाचे उपराष्ट्रपती पद यासारखी मोठ्या सन्मानाची पदे नाकारणारा उदारमतवादी नेता..

-----------------------------------------------------
   २० फेब्रुवारी, १९७५ श्रेष्ठींचा योग्य निर्णय लक्षात घेऊन, मनात कुठलीही कटुता न बाळगता उदार वृत्तीने वसंतराव नाईक हे मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले." त्यापूर्वीच त्यांनी १३ फेब्रुवारी,१९७५ ला पुण्यानजीक यवत या खेड्यात पाणी पुरवठयाच्या उद्घाटन समारंभात जवळजवळ निरोपाचेच भाषण  दिले होते.  ते म्हणाले,  "महाराष्ट्रातील जनतेने माझ्यावर अलोट प्रेम केले, हे मला  कधीही विसरता येणार नाही. पाच जन्म घेतले तरीही महराष्ट्राचे हे ऋण मला फेडता येणार नाहीत. वीस वर्षापासून मी मंत्रीमंडळात आहे. त्यातील ११ वर्षे मी मुख्यमंत्री राहिलो. मी पूर्ण समाधानी आहे . मंत्रीपद ही गौण बाब आहे. हे पद मला केव्हातरी सोडावेच लागले असते, तथापि जनतेची सेवा ही कधीही सोडता कामा नये. जनसेवेचे काम मी चालूच ठेवणार आहे. जागा बदलली म्हणजे नाराज होणे नाही. माझ्याकडे आत्मविश्वास आणि कर्तुत्व असल्याने  घाबरण्याचे काही कारण नाही" .
    इंदिरा गांधी यांनी जून १९७५ च्या अखेरीस आणीबाणी पुकारली होती. पुढे १९७७ साली निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधीच्या काँग्रेस पक्षापुढे मोठे आव्हान होते. सर्व देशभर इंदिरा गांधी आणि राज्यकर्ता पक्ष यांविरूद्ध वातावरण तापलेले होते. वसंतराव नाईक यांना त्याची कल्पना होती. अशा वातावरणात त्यांना पक्षाने लोकसभेची निवडणूक लढविण्याची सूचना केली. संबंध देशातील प्रतिकूल वातावरणाचा अंदाज आलेला कोणीही सुज्ञ नेता पराभवाच्या छायेत जाऊ शकला असता. पण वसंतराव नाईक यांनी पक्षाची इच्छा प्रमाण मानून ते आत्मविश्वासाने  लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले. महाराष्ट्रात नव्हे तर सर्व देशातच त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव  झाला. पंतप्रधान, इंदिरा गांधी सह अनेक गणमान्य पराभूत झाले. पण पुसद मतदार संघातून वसंतराव नाईक सहजगत्या निवडून आले. काँग्रेसच्या राजवटी बद्धल जनतेत असंतोष होता. पण वसंतरावांच्या बाबतीत व्यक्तिशः तो असंतोष आडवा येऊ शकला नाही. स्वसामर्थ्यावर, स्वतःच्या लोकप्रियतेवर व स्वकर्तृत्वावर ते  सहज निवडणूक जिंकून खासदार म्हणून दिल्लीला गेले. विरोधी पक्षाच्या राजवटीमध्ये खासदार या नात्याने ते संसदेत गेले. परंतू ती खासदारकीची कारकीर्द जेमतेम दोन-अडीच वर्ष. ( मार्च १९७७ ते ऑगस्ट १९७९ ) त्यांच्या वाट्याला आली .
 या राजवटीमध्ये त्यांना उपराष्ट्रपतीपद स्वीकारावे यासाठी त्यावेळचे पंतप्रधान मोरारजीभाई यांचेकडून प्रस्ताव आला होता . मोरारजीभाईचे विश्वासू आणि नाईकांचे स्नेही सोनूसिंग पाटील यांच्यामार्फत तो प्रस्ताव आला. पण वसंतराव नाईक यांनी ते हे पद मोठ्या मनाने नाकारले. त्यापूर्वी इंदिरा गांधीकडूनही वसंतराव नाईक यांना भेटीचे निमंत्रण आले होते. जेव्हा वसंतराव नाईक भेटायला गेले तेंव्हा इंदिरा गांधी यांनी बिहारचे राज्यपालपद स्वीकारण्याचा प्रस्ताव मांडला होता. तेव्हा तेथे हेमकांत बारुआ हेही होते. ही सूचना वसंतराव यांना सर्वस्वी अनपेक्षीत होती. पण स्वतःच्या भूमीकेबद्धल सदैव निःसंदिग्धपणे वागणा-या वसंतराव नाईक यांच्या सद्सदविवेकबुद्धीने तात्काळ निर्णय घेतला होता. त्यांनी इंदिरा गांधी यांचे म्हणणे शांतपणे ऐकूण घेतले व उत्तरादाखल ठामपणे एवढेच शब्द उच्चारले." मॅडम आय एम नॉट अ जॉब हंटर ! ” राज्यपालपद व उपराष्ट्रपतीपद यासारखी मोठ्या सन्मानाची पदे नाकारण्यासाठी मनाची फार मोठी तयारी लागते.वसंतराव नाईक यांच्या कणखर सहिष्णू व्यक्तीमत्वामध्ये ती तयारी उपजतच होती ते दिसून येते. वसंतरावजी नाईक यांचे राजकारणातील उदारमतवादी तत्त्वज्ञान हे स्वातंत्र्य आणि समता ह्यांवर आधारित असल्यामुळे  महाराष्ट्राचा संतुलित विकास त्यांच्या मुख्यमंत्री  पदाच्या अकरा  वर्षापेक्षा जास्त मिळालेल्या  कार्यकालात होवू शकला.
    असा हा अभ्यासू राजकारणी- मुख्यमंत्री  पुन्हा जन्माला येणे अशक्यप्राय बाब आहे. अशा या महान नेत्यास विनंम्र अभिवादन ...!!!

संदर्भ-  इंडियन जर्नल अॉफ रिसर्च               इंटरनॅशनल जर्नल   शोध प्रकल्प- Volume-8, Issue-6 ISSN No. 2250 - 1991 June-2019  Impact Factor-6.761-IC Value   86.18 UGC sr. no.47432

      संशोधकः दिनेश सेवा राठोड    
कोहळा तांडा ता.दारव्हा जि.यवतमाळ
            महाराष्ट्र राज्य (भारत)  

***********************************

Vasantraoji Naik:
After the retirement of the Chief Ministership, Liberalistic leader who denies the prestigious honor of being the Governor of Bihar and Vice-president of the country 

-----------------------------------------------------------------
 On February 20, 1975, Vasantrao Naik was relieved from the responsibility of the Chief Minister, with no insensibility of mind, Earlier, On Feb.2,1969 he had given a speech almost on the occasion of the inauguration of water supply in  village, Yavat near Pune. He said. "I will never forget that the people of Maharashtra that always loved me. I mean,  even after taking five births, I can not repay this debt of Maharashtra. I have been in the cabinet for over twenty years. I was Chief Minister for 11years.  I'm completely satisfied.  Cabinet is a secondary matter. I would have to leave this post sometime, but the service of the public should never be left out. I will continue to serve the public.  Changing places doesn't mean getting unhappy," It shows that  there is no reason to be  panic because of   having Naik's confidence and dedication.
   Indira Gandhi had called for an emergency in late June 1975.  Next, elections were held in 1977.  Indira Gandhi's Congress party faces a major challenges in this election. The atmosphere was challenging  against Indira Gandhi and the ruling party all over the country.  Vasantrao Naik closely knew this.  In such an circumstance he wad advised by the party to contest the Lok Sabha elections. Any wise leader who predicted adverse circumstance in the country could go into the shadow of defeat.  But Vasantrao Naik accepted the Lok Sabha elections with more  confidence. The Congress party was defeated in that election, not just in Maharashtra but all over the country.  Many dignitaries were defeated, including the Prime Minister, Indira Gandhi.  But Vasantrao Naik was easily elected from the Pusad constituency.  There was dissatisfaction with the ruling party.  But in the case of Vasantrao Naik, personally, the dissatisfaction did't matter. Because of his self-sufficiency, popularity and self-determination, he went to Delhi as an M.P. by winning the election easily.  He went to Parliament as an MP during the rule of the opposition.  But he was  MP for a maximum of two and a half years. (March 1977 to August 1979).
   However, there was  a proposal  by Prime Minister, Morarjibhai Desai at that time to accept him as Vice-President of the country.This proposal came through Sonusingh Patil, (Janta Party) a loyalist of PM.Morarjibhai Desai.  But Vasantrao Naik had rejected the post.  
    Nevertheless, even before Indira Gandhi had given an invitation to Vasantrao Naik. When Vasantrao Naik went to visit, Indira Gandhi had proposed to accept Naik as the  Governor of Bihar घे.Then there was Hemakant Barua. This suggestion was completely unexpected to Vasantrao Naik.  But with the conscience of Vasantrao Naik, who always acted indiscreetly with his own decision, an immediate decision was taken by him. He listened to Indira Gandhi calmly and uttered the same words in reply. "Madam,  I am not a job hunter!"  This shows that Vasantrao Naik  was such a  person who favors a political philosophy of progress, reforms and the protection of civil liberties. He was a great liberalist and progressive characterized by broad-mindedness and  principles of tolerance.
 Vasantraoji Naik's liberal philosophy of politics was based on liberty and equality so that balanced development of Maharashtra could be achieved in the tenure of his Chief Minister for more than eleven years.
  It is impossible being  such a learned politician - Chief Minister to be born again.  A humble greetings  to such a great reformist leader ... !!!

Ref- Indian Journal Of Research 
     University Grand Commission, New Delhi approved International Journal  
Volume-8, Issue-6 
ISSN No. 2250 - 1991 June-2019
 Impact Factor-6.761-IC Value 86.18 UGC sr. no.47432
        Research Project  -
Researcher -Dinesh Sewa Rathod
------------------------------------------------------

            Compiled By- Dinesh Sewa Rathod
                 profdineshrathod.blogspot.com
                          Mob-+91-9404372756 


नाईक साहेबेरो गुन्हो कांयी ?*

*महानायक वसंतराव नाईक साहेबेर अप्रतिष्ठा करेवाळ लोकुपर सामाजिक बहिष्कार का न नाकेन चाये ?*    - फुलसिंग जाधव, छत्रपती संभाजीनगर ============...