Wednesday, December 29, 2021

याडीकार

*सामाजिक क्रांती चे दुत बापू फुलसिंग नाईक आणि शैक्षणीक क्रांतीचे दुत श्रद्धेय बळीराम पाटील मांडवीकर यांची ऐतिहासिक भेट* 


*गहुली ते मांडवी प्रवास डमणीने*
=================================
*याडीकार पंजाब चव्हाण, पुसद*

-------+++--++++++++++++++++++++++

 *काल 3 सप्टेंबर 2021 रोजी सामाजिक क्रांतीचे दूत श्रद्धेय बापू फुलसिंग नाईक यांचा स्मृतिदिन*
काल सकाळी फिरताना फुलसिंग नाईक महाविद्यालयाचे निवृत्त योगा *प्राध्यापक माननीय जे.के .राठोड सर आणि माझे मित्र माननीय डी एन राठोड कंजरवेटर ऑफ फॉरेस्ट ऑफिसर सेवानिवृत्त* यांची भेट झाली. आणि सकाळी सकाळी माझ्या घरी चहा घेतला. आणि गोरबंजारा समाजा विषयी चर्चा करताना समाजातील *लोक नेते बापू फुलसिंग नाईक यांची आठवण झाली*. प्राध्यापक जेके राठोड सरांना महाराष्ट्राचे *मुख्यमंत्री जलनायक सुधाकरराव नाईक साहेब यांच्या धर्मपत्नी सुमनताई नाईक* यांनी सांगितलेली हकीगत अशी.....
 बंजारा समाजाचे *सामाजिक क्रांतीचे दूत श्रद्धेय बळीराम पाटील मांडवीकर* आपल्या पत्नीसह काशी दर्शनाला गेले .असताना आपल्या पत्नीचा फेटिया काचळी आटीचोटला ही वेशभूषा पाहून रेल्वेमध्ये फार मोठी अडचण निर्माण झाली. ते काशीला जात असतांना त्यांना जागो जागी  *फेटिया काचळी आटीचोटला* या वेशभूषा मुळे त्यांना वाईट वागणूक मिळाली. त्यामुळे ते अत्यंत नाराज झाले. आणि त्यांनी घरी येऊन मांडवी येथे गोर बंजारा समाजाचा हा गौरव शाली पारंपरिक वेशभूषा बदलण्याचा कठोर निर्णय घेतला .आणि लगेच त्यांनी आपल्या धर्म पत्नीला लुगडे नेसणे सुरुवात केली .त्यामुळे  गोर बंजारा समाजामध्ये वेशभूषा बदलण्यावरून फार मोठे वादळ उठले. पण त्यांना न घाबरता गोर बंजारा समाजाचे परिवर्तन करण्यासाठी श्रद्धेय बळीराम पाटील मांडवीकर यांनी खूप मोठी धडपड सुरू केली होती .या परिवर्तन लढाईचा विरोध बहुतांश तांडयात होत होता. लोक होळीच्या सणाला लेंगी द्वारे गीत गात होते .
*तांडो मांडवीरो चाल बिघाडो शेरीया*
*तांडो  मांडवीरो..रं!*
अशा पद्धतीने होळी उत्सवा मध्ये लेंगी गीताद्वारे *श्रद्धेय बळीराम पाटील मांडवीकर* यांना प्रचंड विरोध होत होता त्यांनी *श्रद्धेय बापू फुलसिंग नाईक गहुली* यांना भेटण्याचा निर्णय घेतला .मांडवी ते गहुली असा प्रवास डमणीद्वारे करण्याचा निर्णय घेतला ते नियोजित भेटीसाठी मांडवी वरून सकाळीच गहुली कडे निघाले .आणि पुसद तांड्यातील धुंदी येते त्यांना रात्र झाली .पुढे प्रचंड जंगलाचा रस्ता असल्यामुळे रात्रीला जाणे शक्य नसल्यामुळे त्यांनी धुंदी येथे मुक्काम ठोकला.
 *पातळी बाटी, चरकदाळ,लसणेर खोडी* चा पाहुणचार घेऊन त्यांनी सगळ्या लोकांना बंजारा समाजामध्ये परिवर्तन आणण्यासाठी एक छोटेखानी जाळ पेटून  रात्री सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी बळीराम पाटील मांडवीकर अशी ओळख न देता *मी बळीराम पाटील मांडवी करांचा दिवांजी आहे अशी ओळख दिली* त्यामुळे  त्यांना  लोंकानी कुठल्याही शिव्या शाप दिला नाही .त्यांचे आदरातिथ्य केले. पण त्यांच्या समोरच बळीराम पाटील मांडवी करांना प्रचंड शिव्या देण्यात आल्या.
 *फेटिया काचळी बदलान गोरबाईन कोरी करनाको,समाजेर नाक कटानाको आसे पटल्यानं समाजेर  बार काढेर  गरजे छं?* असा सुर होता. लोकांचा रूख त्यांना समजला   होता. लोकांचा राग पाहून बळीराम पाटील मांडवीकर यांनी सकाळी पाच वाजता उठून चहा न घेताचं ते आपल्या डमणीने गहुली येथे  निघून गेले . आणि *बापू फुलसिंग नाईक* यांची भेट घेतली तोपर्यंत धुंदी तांड्यात येऊन वार्ता पसरली होती।
  *अरे ऊ मनक्या बळीराम पाटीलरो दिवानजी कोणी रं... ऊ  बळीराम पाटील मांडवीकर च रं.आपणेन ऊ  फसान चलेग़ो*
 तांडयात एकच कल्लोळ झाला .आणि तांड्यातील पाच पन्नास लोक त्यांच्या समाचार घेण्यासाठी गहुली येथे जाऊन पोहोचले. आणि बापू फुलसिंग नाईक यांच्या समोर बळीराम पाटील मांडवीकर या यांना शिव्या देणे सुरू केले. बापू फुलसिंग नाईक यांना हे अजिबात पटले नाही. त्यांचा दरारा केवळ गहुलीतच नव्हे तर संपूर्ण गोरबंजारा समाजामध्ये होता. त्यांनी त्यां लोकांना बजावून सांगितले बळीराम पाटील मांडवीकर हे आपले पाहुणे आहेत आणि गोर बंजारा संस्कृती मध्ये पाहुण्याचा कोणी अपमान करतो का? पाहुण्याला कोणी शिव्याशाप देतो का? अशी समजूत घालून सगळ्या लोकांना शांत केले. आणि त्यानंतर बापू फुलसिंग नाईक यांनी लोकनेते बळीराम पाटील मांडवी कर यांच्यासोबत गहुली गावात परिवर्तनाची पहिली सभा घेतली. आणि लोकांना परिवर्तनाच्या वाटेने आपण गेलो तरच आपली निश्चितच प्रगती होणार आहे .असे बजावुन सांगितले. लोकांचा राग शांत झाला. लोकांनी बळीराम पाटील मांडवी कर यांच्या परिवर्तनाच्या विचारांचे स्वागत केले. *गहुली गावातून फेटिया काचळी आटीचोटला  हद्दपार  करण्यात आला* 
कदाचित तो विदर्भातील पहिला तांडा असेल आणि ही परिवर्तनाची लढाई महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात पसरली .असे परिवर्तन करणारे *सामाजिक क्रांतीचे क्रांतीचे दुत बापू फुलसिंग नाईक आणि शैक्षणीक क्रांती चे दुत श्रद्धेय बळीराम पाटील मांडवीकर यांची ही ऐतिहासिक भेट*
 तिची ही माहिती दस्तुरखुद *बळीराम पाटील मांडवीकर यांची कन्या तथा महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री जलनायक सुधाकरराव नाईक साहेब यांच्या धर्मपत्नी सुमनताई नाईक* यांनी प्राध्यापक जेके राठोड सरांना सांगितली .आणि प्राध्यापक जे.के .राठोड सरांनी ही ऐतिहासिक भेटीची आठवण आज माझ्या घरी सांगितल्यामुळे ही ऐतिहासिक भेटीची चर्चा आपण सर्वांना माहित व्हावी. या हेतूने हा छोटेखानी लेख प्रपंच.
 एक काळ असा होता की फेटीया काचळी आटीचोटला बदलविण्याची गरज वाटली.  *
*पण कॉम्रेड डी.बी. नाईक साहेब माजी सभापती पंचायत समिती महागाव यांनी आज गोर बंजारा गौरवशाली वेशभूषा   वाचवणे ही काळाची गरज ओळखून त्यांनी सन 2009 मध्ये भेटीया बचाव आंदोलन केले होते* 
सदर बळीराम पाटील मांडवीकर हे परिवर्तन लढाई मधील गोर बंजारा समाजातील *प्रथम गोर सैनिक असून गोर बंजारा समाजामध्ये त्यांना आणि बापू फुलसिंग नाईक यांना मायनस करून कोणालाही पुढे जाता येत नाही. इतके मोठे प्रचंड काम या दोन्ही महापुरुषांनी केले आहे*
. *सामाजिक क्रांतीचे दूत बापू फुलसिंग नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण🙏🙏🙏 आदरांजली* 
या घटनेच्या  विस्तृत माहितीसाठी आत्ताच बोला प्राध्यापक जे.के .राठोड सर पुसद 97 67 15 74 41 
काही तांत्रिक अडचणीमुळे सदर पोस्ट काल टाकता आली नाही. 
समक्षव🙏🙏 

*याडीकार पंजाब चव्हाण, पुसद मोबाईल नंबर 95 52 30 27 97*

याडीकार

*महानायक नाईकसाहेब तुम्हाला परत यावेच लागेल !*
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^🌵🌿🌾🌴🌾🌴
✍ *याडीकार पंजाब चव्हाण,पुसद 📞9552302797*
==========================
 *1 जुलै 2021 हा भूमिपुत्र महानायक वसंतराव नाईक साहेबांचा 108 वा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो* परंतु सरकारने 2017 मध्ये हा दिवस नव्याने मतदार दिवस साजरा करावा असा आदेश काढल्यामुळे तमाम बंजारा समाजात खळबळ उडाली होती परंतु माननीय संजय भाऊ राठोड तत्कालीन राज्य मंत्री महसूल यांच्या अथक परिश्रमाने व आमच्या जागरूक व्हाट्सअप गँग यांनी वेळीच दखल घेऊन सदर मतदार दिवसाचा जीआर रद्द करण्यास शासनाला बाध्य केले त्यामुळें आमदार श्री संजय भाऊ राठोड व तमाम व्हाट्सअप गँग यांचे मनःपूर्वक आभार दुसरे आभार सरकारचे कारण बळीराजाला काही प्रमाणात कर्जमुक्त केले त्यामुळे सध्या बळीराजा आनंदात आहे संपूर्ण कर्जमाफी आंदोलन दरम्यान नाईक साहेब यांचीच आठवण येत होती कारण नाईक साहेबांचा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी नेहमीच फायद्याचा असायचा *पहिला पाऊस मुंबईला पडला की नाईक साहेब पेढे वाटायचे आणि पावसाची स्वागत करायचे मी जरी मुंबईत असलो तरी माझे संपूर्ण मन शेतकऱ्याच्या बांधावर आहे असे ते आत्मविश्वासाने सांगायचे प्रत्येक शेतकऱ्याला आपला कुटुंबातला मुख्यमंत्री विराजमान आहे असे सतत वाटायचे म्हणून तीन तीन दिवस उपाशी राहणार शेतकरी कधी कधी मिलो ज्वारी वर गुजराण करणारा हा बळीराजा आत्महत्या करायचा नाही* परंतु का कुणास ठाऊक हा सतत विसा चा डब्बा घेतो किंवा विहीर जवळ करतो हे सर्व थांबवायचे असेल तर **महानायक नाईक*
*साहेब तुम्हाला परत यावेच लागेल!* 
नाईकसाहेब आपण पुसद मध्ये वकिली करत असताना एकटेच संध्याकाळी दोन चार खेडे जसे भोजला ,पारडी, वालतुर येथे जाऊन बहुजनाचे मनोधैर्य वाढवित होते लोकांना कायद्याची जाणीव करून देत होते परंतु आज बहुजन समाजात प्रचंड प्रमाणात वकील ,डॉक्टर, प्राध्यापक आहेत परंतु आज तुमच्यासारखे कोणीही खेड्यात जाऊन बहुजनाचे मनोधैर्य वाढवण्याचे काम करत नाही बंगला, माडी साडी आणि गाडीतच ही मंडळी जाम खुष आहे *त्यामुळे पे बॅक टू सोसायटी करण्यासाठी  महानायक नाईकसाहेब तुम्हाला परत यावेच लागेल!* 
पोफळी साखर कारखाना उद्घाटन प्रसंगी आपण शेतकरी हा कारखानदार झालाच पाहिजे अशी भीम गर्जना केली होती आपण हयात असताना पोफाळी कारखाना नफयात  तर बळीराजा सुखात होता परंतु आता तो कारखाना बंद होण्याच्या स्थितीकडे वाटचाल करत आहे तुम्ही निर्माण केलेली पुसद ची सूतगिरणी बंद पडलेली आहे त्यातील हजारो कामगार देशोधडीला लागलेले आहेत त्यामुळे कारखाना व सूत गिरणी सुरु ठेवण्याकरिता व शेतकरी हा कारखानदार करण्याकरिता *महानायक नाईक साहेब तुम्हाला परत यावेच लागेल!*
 आपल्या धर्मपत्नी वत्सलाबाई नाईक यांनी एका ठिकाणी असे लिहून ठेवले आहे की मी नाईक साहेब यांना पूजा-अर्चा करताना कधी बघीतलेच नाही ते पूजा करायचे माणसाची आणि माणूस हा त्यांचा विकासाचा केंद्रबिंदू होता परंतु नाईक साहेब तमाम बहुजन आज पूजाअर्चा होमहवन सत्यनारायण पूजा कर्मकांड व पूजा अर्चि,संकट चतुर्थी पौर्णिमा ,एकादशी,अमावस्या या व अशा धार्मिक कर्मकांड यामध्ये गुंतलेले आहे आपण तर कधी पूजा केली नाहीच परंतु *संत सेवालाल महाराजांनी सुद्धा भजो मत पुजो मत चा नारा दिला* आपला हा बहुजन बांधव पूजाअर्चा होमहवन कडे फार मोठ्या प्रमाणात वेळ व पैसा खर्च करताना दिसतो आहे जेवढा मोठा अधिकारी तेवढा तो पोथीवाचक हरामाचे मिळालेले पैसे तो समाज कार्य करणाऱ्या व्यक्तींना देणार नाही परंतु शेगाव, शिर्डी ,शनिशिंगणापूर येथे जाऊन अमाप देणगी देणार पोहरादेवी येथे जाऊन नतमस्तक होण्यासाठी त्याला लाज वाटणार पण मुंबईत एका मंदिरात तासनतास ताटकळत दर्शन घेणार आपण कधीही पंचांग पाहिला नाही हे मी ठामपणे  या ठिकाणी नमूद करु इच्छितो परंतु हा बहुजन बांधव पंचाग, मंगळ जोतिष  पाहिल्याशिवाय लग्न करीत नाही तेवढी मोठी शोकांतिका दुसरे असे की चार पुस्तक शिकलेल्या आमच्या भगिनी शहरात आल्याबरोबर मार्गशीष महिना ,नवरात्र, संकट चतुर्थी ,वैभव लक्ष्मी व्रता कडे वळले आहेत आठवड्यातले चार चार दिवस उपास करून शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे नाईक साहेब आपण पूर्ण हयाती मध्ये कोठेही मंदिराचे बांधकाम केले नाही परंतु तांडया  तांड्यात मंदिर काम बांधकामाचे फार मोठे लोन पसरले आहे या अनिष्ट रूढी परंपरा च्या मागे लागून समाज स्वतःची ओळख विसरत आहे हे सर्व थांबवायचे आम्ही अनेक प्रयास करत आहो नाईक साहेब परंतु आमचे कोणीही मनावर घेत नाही या अनिष्ट रूढी परंपरा बंद करण्यासाठी *महानायक नाईक साहेब तुम्हाला परत यावेच लागेल!*
 नाईक साहेब आपण लग्नात हुंडा  घेतला नाही परंतु कमी खर्चात एक आदर्श लग्न केलं असे समाजात बुजुर्ग मंडळी आजही सांगतात परंतु नाईक साहेब आज लग्नाच्या बाजारात सर्वांचे रेट ठरलेले आहे पोलीस 300000 ग्रामसेवक पटवारी बाबू पाचलाख,प्राध्यापक इंजिनीयर 15 लाख ,डॉक्टर 30 लाख व त्यापुढे एवढेच नाही तर मग भैस चारणार सुद्धा साठ-सत्तर हजार घेतो इतर सोना चांदी आणि सामान वेगळे द्यावे लागते *देजो देणारा* हा समाज हुंड्यापायी आपल्या मुलाला चक्क बैलासारखा विकतो. आणि समाजातील एका घराला नेस्तनाबूत करण्याचा हा जुगार खेळतो यासाठी समाजात कोणीही पुढे यायला तयार नाही *हुंडा शिवाय लग्न करणारी मंडळी प्राध्यापक प्रभंजन चव्हाण पुणे ,भारत पवार मुंबई, डॉक्टर पवन राजूदास जाधव आर्णी व प्रवीण पंजाबराव चव्हाण पुसद अशी अनेक मंडळी समाजात आहे पण त्यांची प्रचार आणि प्रसिद्धी होत नाही* ज्यांच्या घरामध्ये डॉक्‍टर इंजिनिअर आहेत ते नाईक साहेब समाजाला फटकून वागतात मी आणि माझा सासरा बस बोटी आणि सळोई ? यामध्ये मजबुर आहेत यामुळे हुंडा न देऊ शकणाऱ्या कुटुंबातील आजही अनेक मुली नाईलाजास्तव मारवाडी समाजात विवाह करत आहे आणि गरीब घरातल्या मुली खानदेश  विभागात पैसा घेऊन विकल्या जात आहेत यासाठी अनेक मुली या लालची लोकांनी जाळून टाकले आहेत हे भीषण वास्तव्य थांबवायचे असेल तर *महानायक नाईक साहेब तुम्हाला परत यावेच लागेल!*
 *नाईक साहेब आपण पुणे येथील शनिवार वाडया समोर भाषणात सांगितले होते की मी महाराष्ट्र दोन वर्षांत अन्न धान्याने स्वंय पुर्ण केला नाही तर मला फाशी द्या* शेती ही निसर्गाच्या पाण्यावर पिकत नसून स्वतःच्या घामाने पिकते उत्तम शेती करायची असेल तर माणसाने शेतीत गाडुन घेतले पाहिजे परंतु नाईक साहेब स्वतःच्या घामाने शेती पिकवण्याचे सोडून आज बहुजन बांधव ग्रामपंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या राजकारणात एवढा अखंड  बुडाला आहे की त्याला शेतात कोणती पिके घ्यायची याची सुद्धा जाणीव राहिलेली नाही काही शेतकरी तुमच्या शब्दाला जागून फार मोठी प्रगती करताना दिसत आहे परंतु टक्केवारीत  ते अल्प आहेत शासनाकडून काही मिळते का यासाठीच पंचायत समितीमध्ये दिवसेंदिवस चकरा मारणारे अनेक रिकामटेकडे मंडळी दिसून येते सकाळी उठून शेतात जाण्यापेक्षा त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाणे महत्त्वाचे वाटते तुम्ही निर्माण केलेले कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, मृदसंधारण खाते हे शेतकऱ्यांच्या वरवर मलमपट्टी करतात परंतु कोणतेही चांगले उपक्रम राबविताना दिसत नाही बँका उद्योगधंद्यासाठी पतपुरवठा करीत नाही त्यामुळे बळीराजा हवालदिल व कर्जबाजारी झाला आहे शेताच्या बांधावर झाडे नाहीत गोठ्यात गुरे नाही ज्याला शेती विकून नोकरी लावली तो मुलगा परत कुटुंबाकडे लक्ष द्यायला तयार नाही अशा भीषण संकटात बळीराजा अडकला आहे बळीराजाला जगवायचे असेल तर *महानायक नाईक साहेब तुम्हाला परत यावे लागेल!*
 नाईकसाहेब तुमच्या मुख्यमंत्री काळात महाराष्ट्रात बहुजनांच्या मुला-मुलीच्या सोयीसाठी 400 आश्रम शाळा निर्माण केल्या यामधून बहुजनाची शैक्षणिक फौज  निर्माण व्हायला पाहिजे होती असे आपले स्वप्न होते परंतु त्या आश्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष बहुजनातील फौज निर्माण करण्याचे सोडून स्वतः गब्बर होण्यात धन्यता मांनली तुम्ही सर्वांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून जनता शिक्षण प्रसारक मंडळ द्धारे कॉलेज, वसतिगृह निर्माण करून विदर्भातील सर्व गोर गरीब मुलांना शिक्षणाची मोफत सोय करून दिली परंतु आज मुलाला पहिल्या वर्गात टाकायचे असेल तर दहा ते पंधरा हजार डोनेशन द्यावे लागते वरून ट्यूशन फी वेगळीच कसा शिक्षण घेणार समाज यांना धडा शिकवायचा असेल तर *महानायक नाईकसाहेब तुम्हाला परत यावेच लागेल!*
 31 जानेवारी 1953 साली माननीय लालबहादूर शास्त्री पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे दिग्रस येथे प्रथम अधिवेशन घेऊन तमाम गोर बंजारा बांधवांना एकत्र करून नवी दिशा देण्याचे फार मोठे क्रांतीकारी काम आपण केले होते आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या माध्यमातून तमाम बंजारा बांधवांचे संघटन निर्माण करून समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी क्रांतीकारी पाऊल उचललेले असताना नाईक साहेब आज समाजात बंजारा क्रांती दल राष्ट्रीय बंजारा क्रांती दल गोर्शिकवाडी, गोर सेना, भारतीय बंजारा कर्मचारी सेवा संस्था, बंजारा परिवर्तन अभियान ,भारतीय भटके युथ फंट,राष्ट्रीय बंजारा मिशन, बंजारा सेना या व अशा जवळपास 70 ते 75  संघटना निर्माण झाल्या असून कोणाचा पायपोस कोणामध्ये नाही यामध्ये व्हाट्सअप गँग  वेगळीच धुमाकूळ घालत आहे त्यामुळे बंजारा बांधव संभमित  झालेला आहे माननीय रणजित नाईक ,माननीय राजू नाईक मुंबई यांनी तमाम संघटना 2003 मध्ये एकत्र करून ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या माध्यमातून समाजाचे काम करण्याचा प्रयत्न केला परंतु माननीय हरिभाऊ राठोड इतर मंडळींनी प्रचंड विरोध केल्यामुळे सर्व संघटना एकत्र येऊ शकले नाहीत वेदनाकारक एकनाथ पवार यांची तांडा चलो अभियान आणि प्रा.संदेश चव्हाण याची गोरसेना अत्यंत चांगल्या प्रकारे काम समाजात करताहेत सर्व संघटना एकत्र करण्यासाठी *महानायक नाईकसाहेब तुम्हाला परत यावे लागेल!*
नाईकसाहेब तुम्ही यज्ञ केल्याचे कुठेही लिहिलेले नाही तसेच बहुजन समाजात यज्ञ केल्याचे इतिहासात सुद्धा नसताना आज बंजारा समाज यज्ञ करताना दिसतो आहे त्यामुळे तमाम  बहुजनांना वाचवण्यासाठी व अशा प्रथा समाजातून घालवायचे असतील तर ते सामर्थ्य तुमच्या मध्ये आहे त्यामुळे *महानायक नाईक साहेब तुम्हाला परत यावेच लागेल!*
 नाईकसाहेब आपण शेवटच्या क्षणी सुद्धा सिंगापूर येथील हॉटेलमध्ये *हातात झाड असताना अखेर प्राण सोडले म्हणूनच मधू मंगेश कर्णिक ज्येष्ठ साहित्यिक आपल्याला हिरवा माणूस म्हणून संबोधायचे किती मोठे झाडावरचे आपले प्रेम*  आज सरकार एक कोटी वृक्ष लागवडीचे त्यानंतर तेहतीस कोटी वृक्ष लागवडीचे कार्यक्रम राबविताना दिसत आहे परंतु लोकांचा सहभाग हा नगण्य असतो झाडावर प्रेम करण्या ऐवजी सर्व झाडांची कत्तल होताना दिसत आहे त्यामुळे जंगले नष्ट होत आहे झाडावर प्रेम करण्यासाठी तुमची गरज आहे म्हणून *महानायक नाईकसाहेब तुम्हाला परत यावे लागेल!*
 पुसदच्या यशवंत मंदिरात आपली सभा एकण्यासाठी त्यावेळी खेड्यापाड्यातून लोक घरच्या भाकरी घेऊन सभेसाठी  पाच सहा कोस दरकोस पायी चालत यायचे व सभा संपल्यानंतर आपल्या भाषणामुळे आलेले हत्तीचे बळ घेऊन जलाराम हॉटेलमध्ये रस्याच्या आलुबोंडा यावर ताव मारून रात्री पायी गावाकडे जायचे आज तसे राहिलेले नाही एखाद्या नेत्याची सभा घ्यायची असेल तर मजुरीने माणसं  गोळा करावी लागतात पैसे देऊनही सभेला गर्दी जमत नाही लोकांना आता भाषण नको राशन  पाहिजे ही अफाट गर्दी जमवण्यासाठी *महानायक नाईकसाहेब तुम्हाला परत यावेच लागेल!*
 तुम्ही मुख्यमंत्री असताना पुसद येथे सुरेश मेश्राम नावाचे S.D.O.होते त्यांच्याबाबत काही लोकांनी आपल्याकडे तक्रारी केल्या त्याबाबत आपण जुने बंगल्यावर बोलावून मेश्राम साहेबांना नियमाप्रमाणे काम करा मी तुमच्या पाठीशी आहे असे सांगितले व त्यांना काम करण्याची संधी दिली आता तसे राहिलेले नाही राजकीय द्वेषापोटी अधिकारी यांना तडकाफडकी निलंबित करण्यात येते त्यांची बाजू ऐकून घेण्यात येत नाही या दुष्टचक्रातून अधिकारी वर्ग यांना वाचवण्यासाठी *महानायक नाईकसाहेब तुम्हाला परत यावेच लागेल!*
 नाईकसाहेब तुमच्या काळात एका नायकावर नसाबं-हसाबं  करणारा तांडा आज राजकीय परिस्थितीमुळे चार चार  नायकाच्या दहशतीखाली वावरत आहेत तांड्यात आता शाळकरी मंडळी कमी आणि माळकरी जास्त झाले आहे ज्या तांडड्यात जसे समनक,ओरी, बकरी ,गेर करायचे त्याच तांड्यात भागवत कथा हरिपाठ सुरू आहे तांड्यातील शाळा अंगणवाड्यांच्या फरशी बसवणे करिता देणगी न देणारा बंजारा बांधव आज गणेश उत्सव, दुर्गा उत्सव मध्ये दीड लाखाच्या डिजेवर थिरकतो आहे त्याचे मूलभूत प्रश्न मागे पडलेले असून अध्यात्मिक प्रश्न समोर आलेले आहेत नवतरुण युवा पिढी खर्रा ,गुटखा बिअरच्या आहारी गेली आहे शेतात काम करताना कोणी दिसत नाही आणि खेळण्याकरिता पारावर गर्दी झालेली आहे बहुतांश मंडळी व्यसनापायी बरबादीचा मार्गावर आहे तांड्याला आता कोणी वाली राहिलेला नाही आम्ही पोरके झालो आहोत हे सर्व विदारक चित्र थांबण्यासाठी *महानायक नाईकसाहेब तुम्हाला परत यावे लागेल!*

 सन 1953 मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईच्या घरी माननीय पद्मश्री रामसिंगजी  भानावत  यांना पाठवून आपण परिवर्तनाच्या दिशेने एक पाऊल ठेवले होते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी  भावनेच्या भरात तुम्ही माझ्यासोबत येऊ नका प्रथम बंजारा समाजात एकमत करा असा संदेश दिला होता त्या दृष्टीने आपण ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची स्थापना करून दिग्रस येथे 31 जानेवारी 1953 मध्ये प्रथम अधिवेशन बोलावले होते व 30 जानेवारी 1953 रोजी हा विषय कोर कमिटीत ठेवला परंतु उत्तर प्रदेशचे प्राध्यापक प्रीतमसिंह यांनी या परिवर्तनाच्या विषयावर प्रचंड विरोध केला त्यामुळे आपण परिवर्तनाच्या दिशेने गेलो नाही परंतु माननीय पद्मश्री रामसिंग भानावतजी , माननीय बाबू सिंग राठोड, माननीय बळीराम पाटील मांडवीकर, माननीय सखाराम मुडे गुरुजी उमरखेड, माननीय आमदार प्रतापसिंग आडे वसंतनगर या व अशा अनेक कार्यकर्त्याकडून आपण बंजारा समाजात परिवर्तन घडवून आणले आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून ताठमानेने जगण्याची संधी उपलब्ध करून दिली आजही सामान्य माणसांना सुद्धा इतर मंडळी नाईकसाहेब म्हणूनच संबोधल्या जाते परंतु आज समाजात काम करणारे कार्यकर्ते फार कमी असून व्हाट्सअप वर रात्रंदिवस पोस्ट टाकणाऱ्या कार्यकर्त्यांचा सुकाळ झाला आहे व्हाट्सअप गँग ही सामाजिक काम करण्यासाठी गावात जाऊन प्रबोधन करणार नाही किंवा स्वतःच्या परिवारातील माणसाला मदत करणार नाही परंतु व्हाट्सअप वर प्रचंड गोंधळ घालणार ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे तसेच तांडा तांड्यात छोट्या छोट्या कारणावरून प्रचंड हाणामारी, कोर्ट केसेस ,498 च्या केसेस करण्यात राजकीय मंडळी गुंतलेली आहे आजही लोक सांगतात की आपण वकील असताना लोकांना कोर्टात केसेस करू नका भांडण तंटे गावातच मिटवा असा संदेश वारंवार देत होता परंतु आज बंजारा समाजातील वकील मंडळी समाजाला समजावण्याचे काम करताना दिसत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे *आपण प्रथम निवडणुकीला उभे असताना दौऱ्यामध्ये आपले पाय दुधाने धुऊन गावाच्या सीमेवर कुमकुम टिळकांनी स्वागत व्हायचे त्यानंतर त्याला जमेल तेवढे पैसे निवडणूक याकरता दान द्यायचे बाई मंडळी आपल्या कानातील सोन्याचे डूल, चांदीचे कड,े नाकातील नथ व इतर दागिने स्वखुशीने निवडणुकीकरिता आपल्या पदरात घेऊन धन्य मानायचे आता तसे राहिलेले नाही* निवडणूक काळात   उमेदवारा ची गाडी गेली की प्रचंड दगडफेक करायची त्यानंतर पैसा व दारू घेऊन मतदान करायचे एकाच पक्षाखाली मतदान करणारा तांडा आज अनेक पक्षांत विभागला गेला आहे बाप काँग्रेसला तर बायको दोनशे रुपयाच्या गॅस साठी मोदीला आणि पोरगं शिवसेना शिवसेनेला मतदान करताना दिसतो ही लोकशाहीची थट्टा व परिस्थिती सुधारण्यासाठी *महानायक नाईकसाहेब तुम्हाला परत यावेच लागेल!*
ज्या विधानभवनात आपण साडे अकरा वर्ष आदर्श मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे व विदर्भवीर माननीय भाऊ जाबुंवतराव धोटे साहेबा सारखे विरोधी नेते असताना सुद्धा विधान भवनाचे महत्त्व व गरिमा आपण कमी होऊ दिली नाही सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षांमध्ये आपला सुसंवाद होता एखादा आमदार आमदार निवासात आजारी पडला तर आपण स्वतः जातीने भेट देऊन त्याची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यायची आता तसे राहिलेले नाही एका दिवसात चार चार वेळा विधानसभा, विधानपरिषद तहकूब करावी लागते हे सर्व थांबविण्यासाठी *महानायक नाईकसाहेब तुम्हाला परत यावेच लागेल!*
 खरंच नाईकसाहेब तुम्ही आलात तर हुजरेगिरी करणारे तुमच्या पुढे पुढे गर्दी करतील व आम्हास दूर ढकलून देतील  आम्हाला पश्चाताप होईल एवढा मोठा लेख लिहून काय फायदा यासाठी *नाईकसाहेब तुम्ही चुपचाप या शक्य असेल तर सुधाकरभाऊ नाईक साहेबांना सुद्धा घेऊन या*  या तुम्हाला वरील सर्व भयानक परिस्थिती दिसेल ही सर्व परिस्थिती सुधारण्यासाठी *महानायक नाईकसाहेब तुम्हाला परत यावेच लागेल!*
 *तुम्हाला परत यावेच लागेल!*
 *तुम्हाला परत यावेच लागेल!*
 आपल्या प्रतीक्षेत ..........आपला सेवक
जय..वसंत👏👏

🌴🌾🌿🌵🌷🍀⛳🌾🌴🌴🌾🌿
✍ *याडीकार पंजाब चव्हाण सुंदल निवास कदम लेआउट श्रीरामपूर पुसद जिल्हा यवतमाळ मोबाईल 📞नंबर 94 21 77 43 72*
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

*माननीय संपादक आपल्या लोकप्रिय दैनिकात  सदर लेख प्रकाशित करावा ही नम्र विनंती👏👏*

नाईक साहेबेरो गुन्हो कांयी ?*

*महानायक वसंतराव नाईक साहेबेर अप्रतिष्ठा करेवाळ लोकुपर सामाजिक बहिष्कार का न नाकेन चाये ?*    - फुलसिंग जाधव, छत्रपती संभाजीनगर ============...