शिक्षणः मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास यशस्वीतेचा मूलमंत्र
"शिक्षणामुळे मनुष्य दैववादी न राहता कर्तत्ववादी बनला पाहिजे"
वसंतरावजी नाईक साहेब
(माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
[०२ डिसेंबर १९७१ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, पालघर जि.ठाणे महाविद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी नाईक साहेबांनी केलेले भाषन...]
संकलन- प्रा.दिनेश सेवा राठोड
आज पालघर मध्ये महाविद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मी आपण सर्वांचे मनस्वी स्वागत करतो. शिक्षणावर बोलताना मी ठामपणे सांगतो की, शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपुर्ण विकासासाठी आणि त्याच्या मुलभूत अधिकारांसाठी महत्वाची असते. येणाऱ्या काळात देशाला आर्थिक महासत्ता आणि प्रभावी राष्ट्र बनवण्यात युवक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात त्यामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या मूलभूत शिक्षणाची आता देशाला खरी गरज आहे .
शिक्षणाच्या प्रसाराकरिता आपण दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहोत.त्यामुळे सर्व प्रकारच्या शिक्षणाच्या सोयी आता सर्वत्र उपलब्ध झाल्या आहेत. त्या दृष्टीने आजची पिढी मोठी भाग्यवान आहे. आमच्या वेळी स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षण घेणे ही अत्यंत अवघड बाब होती. मी माझेच उदाहरण सांगतो. माझे गाव तुमच्या गावासारखे मुंबईसारख्या अत्यंत प्रगत अशा शहराच्या सान्निध्यात नाही. यवतमाळ व अकोला या दोन जिल्ह्यांच्या कोप-यावर माझे लहानसे गहुली गाव आहे. त्या गावाची लोकसंख्या माझ्या जन्माच्या वेळी फक्त २८२ होती. त्यावेळी शिक्षणाच्या बाबतीत माझ्या गावाची परिस्थिती काय असेल याची आपण कल्पना करा. कधीही नापास न होता मराठी चौथी पास होण्याकरिता मला पाच शाळा बदलाव्या लागल्या. आणि चौथी पास झाल्यावर पुढील शिक्षणाच्या वेळी शाळा फार लांब असल्यामुळे अडीच वर्षे घरीच बसून राहावे लागले. मी श्रीमंत कुटुंबातला होतो तरी माझी ही स्थिती मग इतरांची स्थिती काय असेल ! याची कल्पनाच न केलेली बरी. स्वातंत्र्योत्तर काळात देशात विकासाचे युग सुरू झाले.१९५४ - ५५ मध्ये मी मध्यप्रदेश मंत्रिमंडळात होतो. तेव्हा प्रत्येक खेड्यातून सर्वप्रथम शाळेची मागणी होत असे. खेड्यातले लोक म्हणत असत की, आमच्या गावात आधी शाळा बांधून द्या, 'शाळा बांधण्यासाठी येणा-या खर्चाच्या ४० किंवा ५० टक्के रक्कम आधी गावक-यांना जमवून द्यावी लागे. पण आपल्याला आश्चर्य वाटेल की, प्रत्येक गावामध्ये विकासाची पहिली कोणती योजना हाती घेतली गेली असेल तर ती शाळा बांधण्याची होय. या कामासाठी गावकरी लवकर पैसा गोळा करीत, त्या वेळेला मी त्यांना विचारत असे की, 'तुम्ही शाळेलाच महत्त्व का देता? एखादा लहानसा तलाव बांधण्याचे, सार्वजनिक विहीर बांधण्याचे, किंवा शेतीला पाणी देण्याचे एखादे काम हाती का घेत नाही ? 'तेव्हा ते म्हणायचे की, 'साहेब , ते आम्ही करणार आहोत. परंतु शिक्षण नसल्यामुळे काय होते, याचे दु : ख आम्ही आयुष्यभर भोगत आल्यामुळे आम्ही प्रथम शिक्षणाला महत्त्व देतो. 'खेड्यातील लोकांच्या सांगण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. काही ठिकाणी मला असे सांगितले की, 'साहेब, आम्ही डॉक्टर होऊ शकलो नाही, वकील होऊ शकलो नाही . परंतु सरकारच्या नवीन धोरणामुळे आम्ही डॉक्टर आणि वकिलांचे बाप होऊ शकतो, तर मग ही संधी आम्ही का दवडावी? 'यावरून कल्पना येईल की ,शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याकरिता कुणी एखादा विद्वान माणूसच पाहिजे असे नाही. आम्ही लहानपणी शिक्षणाकरिता इतके कष्ट भोगले आहेत की, आम्हाला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा शिक्षणाचे महत्त्व अधिक वाटते.
शिक्षण हा सर्व विकासाचा पाया आहे, अशी आमची धारणा आहे. आणि म्हणून जेव्हापासून आम्ही मंत्रिमंडळामध्ये आलो, मग ते मध्य प्रदेशचे असो की महाराष्ट्राचे असो, तेव्हापासून आम्ही हेच धोरण स्वीकारले की, शिक्षणाच्या बाबतीत समान संधी देण्याचा आटोकाट प्रयत्न झाला पाहिजे. कोणालाही असे वाटता कामा नये की, आमच्या विभागामध्ये ती संधी नाही. माझी आर्थिक परिस्थिती तितकी चांगली नसल्यामुळे मला शिकता येत नाही' असे सुद्धा कुणाला वाटू नये, असे आम्हाला वाटते. त्यामुळेच गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये एकामागून एक अनेक शैक्षणिक सवलती देण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात आपण शिक्षणावर प्रत्येक वर्षी अधिकाधिक खर्च करीत आहोत. महाराष्ट्रात आज जे पंचवीस जिल्हे आहेत ते स्वातंत्र्यपूर्व काळात वेगवेगळ्या तीन विभागांत होते आणि त्यावेळी या पंचवीस जिल्ह्यांच्या शिक्षणावर जो खर्च होत होता त्यांचे आकडे उपलब्ध आहेत. १९४७ मध्ये शिक्षणासाठी दरवर्षी दोन कोटी रुपये खर्च होत असे तर गेल्या वर्षी एकशे दहा कोटी रुपये खर्च झाले. दरवर्षी दहा, पंधरा कोटींनी हा खर्च वाढणार आहे. कुठे दोन कोटी आणि कुठे एकशे दहा कोटी ! हा खर्च फक्त राज्य सरकारचा झाला. याशिवाय जिल्हा परिषदा, केंद्रीय अनुदान मंडळ, केंद्र सरकार, शिक्षणप्रेमी लोक व पालक जो खर्च करतात तो वेगळा, शाळेच्या इमारतीसाठी सरकार जमीन देते ते वेगळे. यावरून शिक्षणावर किती प्रचंड खर्च होतो हे आपण लक्षात घ्या. शिक्षणावर होत असलेला हा खर्च फक्त श्रीमंत वर्ग करीत नाही तर समाजातला प्रत्येक माणूस करीत असतो. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारजवळ एवढे पैसे कोठून येतात? ते समाजाच्या सर्व थरांतील सर्व लोकांचे असतात. एखादा भीक मागणारा माणूस चुकून जरी सिनेमाला गेला तर त्याच्यावर करमणुकीचा कर बसतो. मोठ्या कष्टाने फिरून भिकेपोटी एक एक पैसा गोळा करणा-या एखाद्या पांगळ्या माणसाने चुकून जरी एखादी विडी ओढली तर त्याच्यावर विक्री कर बसतो. याप्रमाणे गरिबातल्या गरीब माणसाकडून जो कर एकत्र होतो त्यातून अणावर एवढा प्रचंड खर्च होतो. आमच्याकडे खर्च करण्याकरिता दुसरे कोणते क्षेत्र नाही म्हणून आम्ही शिक्षणावर अधिक खर्च करतो असे मात्र समजू नका. निश्चित उद्देशाने आम्ही शिक्षणावर एवढा खर्च करीत आहोत. नवीन पिढीत आणि समाजात संस्कृती, कला, ज्ञान आणि विज्ञान या गुणांचा विकास व्हावा, समाजात नवीन दुष्टी यावी, मानवी शक्ती वाढावी, देशाचे उत्पादन वाढावे आणि सर्व दृष्टीनी देश संपन्न व बलवान बनावा यासाठी आपण शिक्षणावर एवढा खर्च करतो आहोत. खरे म्हणजे, शिक्षणावर खर्च म्हणजे देशातील मानवी शक्तीला संस्कारक्षम, विकासक्षम, गतिमान व शक्तिमान बनविण्यासाठी केलेली गुंतवणूक होय .
शिक्षणामुळे आमच्यासमोर असलेले व भविष्यात येणारे कठीण प्रश्न सोडविण्याची क्षमता असलेली व समाजाला पुढे नेणारी कर्तृत्ववान पिढी निर्माण झाली पाहिजे अशी जी आमची अपेक्षा आहे ती यामुळेच. आणि ही अपेक्षा अनाठायी आहे असे कोण म्हणेल ? ज्या समाजाचा अजून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही, ज्या समाजाचे कित्येक लोक अजून झोपडीमध्येच राहतात , ज्यांची अजून औषधपाण्याची व्यवस्था बरोबर नाही, त्यांनी आपल्या या व इतर अत्यंत निकडीच्या गरजा बाजूला सारून शिक्षणाकरिता हातभार लावला आहे. आणि म्हणून शिक्षणाचे हे मंगल मंदिर समाजाच्या महत्तम त्यागावर उभारण्यात येत आहे हे विसरून चालणार नाही. शिक्षणासाठी, समाज जो त्याग करीत आहे त्यामागची समाजाची भूमिका, शिक्षण क्षेत्रातील व्यवस्थापकांनी, शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी व इतरांनी समजून घेतली पाहिजे नाही तर शिक्षणासाठी गुंतविलेले हे प्रचंड भांडवल वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्यामध्ये विफलतेची भावना येण्याची शक्यता आहे. आपल्याला शिक्षण मिळाले नसते तर आपणही अडाणी, दरिद्री राहिलो असतो याची जाणीव आपण ठेवली पाहिजे,मला जे ज्ञान मिळत आहे ते समाजाच्या त्यागातून मिळत आहे आणि या उपकाराची परतफेड मला सव्याज करावयाची आहे ही भावना शिक्षणामुळे आपल्या मनात बिंबली पाहिजे. तसे न होता शिक्षणामुळे स्वतःच सुखी, ऐषोआरामात राहण्याची भावना वाढली तर आपल्याला शिक्षा मिळाले. ज्ञान मिळाले असे मी म्हणणार नाही. फार तर तुम्हाला निरनिराळ्या विषयांवर माहिती मिळाली असे मी म्हणेन. ती माहिती म्हणजे ज्ञान, शिक्षण होणार नाही. परंतु शिक्षण संस्थेकडून विद्याथ्यांला माहिती मिळावी ही अपेक्षा नसून ज्ञान मिळावे हो अपेक्षा आहे. शिक्षणामुळे समाजाच्या उपकाराची जाणीव निर्माण झाल्यास आपन केवढे मोठे कार्य करू शकतो याचे मी एक उदाहरण सांगतो. डॉ .मोदी येथे बसलेले आहेत . ते संपूर्ण भारतात फिरत असतात. यांना अंधत्व आले असेल त्यांना दृष्टिदान करीत असतात. अंधत्व हटाव हा त्यांचा कार्यक्रम आहे. त्यांना जे ज्ञान मिळाले ते ज्ञान जर त्यांनी स्वतः करीताच वापरले असते तर फार मोठ्या प्रमाणात आयकर भरूनसुद्धा त्यांच्याजवळ किती तरी संपत्ती राहिलो असती. पण त्यांना मिळालेले ज्ञान आहे त्यात समाजाचा हिस्सा आहे. समाजाने जर मला मदत केली नसती तर हे ज्ञान मला मिळाले नसते. या उपकाराची परतफेड मला केली पाहिजे. या जाणिवेने त्यांनी आपले आयुष्य या कामाकरिता वेचले आहे. त्यामुळे ते आदर्श सुशिक्षित आहेत असे माझे स्वत: चे मत आहे. शिक्षित माणसामध्ये विशालत्व येते का? याबद्दल पुष्कदा शंका निर्माण होते. तो खरोखर विशाल दृष्टीने पाहतो की, स्वत : करिताच सर्व करतो याचा जर आपण बारकाईने विचार केला तर आपल्याला दिसून येईल की, शिक्षणामुळे ज्या प्रमाणात विशाल दृष्टी यायला पाहिजे त्या प्रमाणात ती येत नाही. ज्या माणसात विशालत्व येत नाही तो माणूस संकुचित दृष्टीचा असतो. माणसामाणसाबद्दल त्याला प्रेम वाटत नाही. वात्सल्याची, दुस-याला समजून घेण्याची, सर्वाशी खेळोभेड वाराण्याची, दुस-याच्या सुखदुःखात समरस होण्याची कला त्याच्यामध्ये येऊ शकत नाही आणि वर्तमानकाळ असा आहे की, आपण आपल्या समाजालाच नव्हे तर इतर देशांतील लोकांनाही समजून घेतले पाहिजे. त्यांच्याशी बंधुभावाचे नाते जोडले पाहिजे. अशा स्थितीत आजच्या शिकलेल्या तरुणांत हे विशालत्व येत नसेल तर वर्तमान युगात आपण किती पंगू ठरेल याचा विचार आपण केला पाहिजे.
शिक्षणामुळे वास्तविक सुशिक्षित आणि अशिक्षित यांच्यामध्ये निनांग होता कामा नये. न दुःखाने मला असे सांगावे लागते की, ती शक्य तितक्या लवकर आपल्याला बुडवावयाची आहे. जो मागासलेला आहे. रंजलेला, गांजलेला, पिडलेला आहे त्याच्या बाबतीत सर्वसाधारण सुशिक्षित माणसाचा दृष्टिकोन काय असतो हे आपण विचारात घ्या. म्हणजे ही दरी किती मोठी आहे हे आपल्याला दिसून येईल. उदाहरणार्थ आदिवासींच्या मदतीकरिता, त्यांच्या प्रगतीकरिता आपण ज्या सुशिक्षितांना नेमतो त्यांनासुद्धा त्या माणसांबद्दल आस्था, प्रेम नसते. रंजलेल्या गांजलेल्यांची सेवा करण्याचे हे सर्वश्रेष्ठ काम त्यांना दिले. त्यासाठी आवश्यक ती सर्व साधने दिली, पैसा दिला, तरी ते हे काम मन: पूर्वक करीत नाहीत. त्यांच्या मनात आदिवासींबद्दल करुणा नसते, त्यांच्या सुखदु:खाशी समरस होण्याची वृत्ती नसते. यामुळे त्यांच्यापासून दूर जाण्याचा ते प्रयत्न करतात. शासन यंत्रणेमध्येसुद्धा आपल्याला हेच दिसून येते. समाज जेव्हा अडचणीत असतो त्यावेळी ज्या प्रमाणात शासन यंत्रणेकडून सहकार्याची अपेक्षा असते त्या प्रमाणात ती मिळत नाही.
महाराष्ट्र शासनापुरते बोलायचे झाले तर अभिमानाने आम्ही सांगू शकतो की, इतर कोणत्याही राज्य शासनापेक्षा ते जास्त लोकाभिमुख आहे . दुष्काळ येवो, रणीकंप होवो, महापूर येवो, कोणत्याही प्रकारचे संकट येवो, यंत्रणा आपले काम करते यात शंका नाही. पण केव्हा ? ज्या वेळेला एक विशिष्ट परिस्थिती निर्माण होते तेव्हा ! परंतु सर्वसाधारण परिस्थितीत ती दरी अजूनही आपल्याला दिसते. ती नष्ट झाली पाहिजे ही आजच्या काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी कसे वागावे याचा आदर्श शिक्षकांनी घालून दिला पाहिजे, शिक्षकांची वागणूक बरोबर नसली तर विद्यार्थ्यां पासून चांगल्या वागणुकीची अपेक्षा करणे योग्य होणार नाही. या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो की, शिक्षक जेव्हा संपावर जातात, निदर्शने करतात तेव्हा मला सर्वात जास्त दु:ख होते. निदर्शने आणि संप करण्याचा लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे. परंतु तुम्ही आदर्श काय घालून देणार ? शिक्षकांच्या अशा वागण्यामुळे विद्याथ्र्यावरही त्याचा परिणाम होतो, हे आपण अनुभवतो आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांत शिस्त ठेवणे कठीण होते आणि विद्यार्थी एकदा स्वैर सुटला की, काय होऊ शकते याची उदाहरणे आपल्याला इतर राज्यात पाहवयास मिळतात. सुदैवाने आपल्या राज्यात असे उदाहरण क्वचित अपवाद हणून पाहत्यास मिळते. तेव्हा आपल्यावर नवीन पिढी घडविण्याची जबाबदारी आहे हे लक्षात घेऊन शिक्षकांनी वागले पाहिजे. पगार मिळविण्याकरिता कसे तरी काम करावे या दृष्टीने नाही, तर शिक्षणाचे पवित्र कार्य आपले 'लाईफ मिशन' ठरवून शिक्षकांनी या क्षेत्रात कार्य केले पाहिजे. नवीन पिढीला ख-या अर्थाने शिक्षण मिळावे यासाठी शिक्षकांनाही शिक्षण द्यावे लागेल.
आजची स्थिती अशी आहे की, ज्या पद्धतीची नवीन पिढी बनावी असे आपणास वाटते त्या पद्धतीची ती बनविण्याकरिता पाहिजे त्या प्रमाणात आवश्यक ते शिक्षण काही वेळा शिक्षकालाच नसते. केव्हा तरी जुन्या काळातील पुस्तकांवरुन संपादन केलेले ज्ञान वर्तमान पिढी घडविण्याकरिता पुरेसे होत नाही. आम्ही काही टेक्निकल कॉलेजमध्ये पाहतो की, नवीन विज्ञानाच्या जवळपास फिरकण्याचीसुद्धा आमच्या काही शिक्षकांची तयारी नाही . जुनेच बरे असे ते म्हणतात ! या बदलत्या दुनियेत आज टेक्नॉलॉजीशिवाय दुसरे काय आहे ? सायन्स टेक्नॉलॉजीशिवाय तुम्ही पुढे जाणार कसे ? त्यासाठी रोज लागणाच्या नवीन नवीन शोधाची आपल्याला माहिती करून घ्यावी लागेल, ज्ञान करून ध्यावे लागेल. बदलत्या परिस्थितीशी समरस व्हावे लागेल. देशामध्ये काय चालले आहे ते उघड्या डोळ्यांनी पाहावे लागेल. जे काही दिसते त्याचा अनुभव घ्यावा लागेल, अशा रीतीने नवीन पिढी बनविण्याकरिता अद्ययावत ज्ञानाने आणि दृष्टीने सुसज्ज राहिले पाहिजे, अशी शिक्षक वर्गाची धारणा असली पाहिजे. याबाबतीत शिक्षक जेवढा जागरूक राहील तेवढ्या प्रमाणात नवीन पिढी घडविण्यात तो यशस्वी होईल असे मला वाटते. शिक्षणामुळे मनुष्य दैववादी न राहता कर्तत्ववादी बनला पाहिजे. आमच्या समाजामध्ये पिढ्यानपिढ्या अशी समजूत आहे की, जे काही होते ते ईश्वराच्या कृपेमुळे किंवा अवकृपेमुळे होते. आपल्यात काही कर्तत्व असते असे तो मानतच नाही. मी माझ्या भवितव्याचा शिल्पकार आहे आणि आत्मविश्वासाने आणि कर्तृत्वाने ते मी घडविणार आहे अशी विश्वासाची भावना तो कधी ठेवीतच नाही. आणि यातच त्यांच्या पराभवाचे बीज असते, कर्तत्व, आत्मविश्वास, चिकाटी व जिद्द हे गुण नवीन पिढीत रुजविण्याचे काम शिक्षण करणार नसेल तर कोण करणार आहे ! शिक्षणातून आपले व देशाचे उज्ज्वल भवितव्य घडविण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. कोणत्याही संकटावर मात करण्याची जिद्द आली पाहिजे. सतत कष्ट व श्रम करण्याची भावना वृद्धिंगत झाली पाहिजे. श्रमाची प्रतिष्ठा वाढली पाहिजे. आणि आपल्यातील पुरुषार्थ वाढीस लागला पाहिजे. खेळातील मनुष्याकृती फुग्याचे खेळणे जसे वर कसेही फेकले तरी खाली आल्याबरोबर जमिनीवर ताठ उभे राहते, आडवे तिडवे पडत नाही, तसेच शिक्षण संस्थेतून बाहेर पडलेला तरुण कोणत्याही परिस्थितीत न डगमगता आपल्या पायावर स्वाभिमानाने ताठ उभा राहिला पाहिजे. इतके शिक्षण घेऊनही शिक्षित माणूस उपजीविकेसाठी स्वत:हून काही करू शकत नसेल, असहाय्य बनत असेल तर आपले कुठे काय चुकते आहे याचा शोध आपण घेतला पाहिजे. परीक्षा पास होऊन शिक्षण संस्थेतून बाहेर पडणाच्या तरुणाने एका हातात नोकरीचा अर्ज व दुस -या हातात दगड घेऊन, नोकरी द्या , नाही तर दगड घालतो' असे म्हटल्यास समाजाला पश्चात्ताप करण्याची पाळी येणार आहे आपण किती लोकांना नोक-या देणार ? कुठल्या नोक-या देणार ? सर्वच नोकरांचे राज्य झाले तर मालक कोण राहणार ? आजकाल शेतीची पदवी घेतलेला व घरी भरपूर शेती असलेला तरुणही नोकरीच मागतो. अशा प्रकारे चांगले शिकलेले लोक शेती करणार नसतील तर शेतीचे उत्पादन कसे वाढेल ? शेतीत नवीन नवीन प्रयोग कोण करील ? संशोधन कोण करील ? वास्तविक अनुभव असा आहे की, जे तरुण हिंमतीने स्वतः उद्योग करतात, कष्ट करतात ,मग ते शेतीत असो की उद्योगात असो, ते चांगले कमावतात. मोठ्यातल्या मोठ्या हुद्यावरील अधिकारी मिळविणार नाही, इतके मिळवितात. मला सांगा, नोकरीतला कोणता माणूस जास्त कमावतो? उलट धंदेवाल्यांकडे, उद्योगातील माणसाकडे किंवा चांगली शेती करणाच्याकडे पाहिल्यास तो अधिक उत्पादन करतो, अधिक कमावतो असे दिसून येते. तेव्हा शिक्षण घेतलेल्या तरुणाने स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे. काही नवीन समाजोपयोगी कार्य केले पाहिजे. समाजाने ज्या तरुणाला एवढा मोठा त्याग करून शिकविले त्याने नोकरीही समाजाकडेच मागितल्यास व ती नाही मिळाली तर डोक्यात दगड घालण्याची भाषा बोलल्यास समाजाने कोणाच्या तोंडाकडे पाहावे ? कुणापासून अपेक्षा करावी? तेव्हा शिक्षण संस्थेतून बाहेर पडणारा तरुण आत्मविश्वासाने स्वत:च्या पायावर उभा राहील व देशाची संपत्ती वाढवील असे शिक्षण आपण दिले पाहिजे. वास्तविक या देशामध्ये काय कमी आहे ? आमचा देश खनिज संपत्तीच्या बाबतीत, जंगल संपत्तीच्या बाबतीत , कृषियोग्य जमिनीच्या बाबतीत संपन्न आहे. कोणत्याही गोष्टीची कमी नाही. कमी एवढीच आहे की, आमच्या देशातील साधनसंपत्ती आणि कर्तुत्व यांची अजून पाहिजे तशी सांगड बसली नाही. युवकांनी नवीन शोध लावून, संशोधन करून नवनिर्मितीचे कार्य करण्याचा कधी विचार केला आहे काय ? हे कार्य एकदा त्यांना गवसले तर या देशात कर्तृत्वास केवढा वाव आहे याची त्यांना प्रचिती येईल. मात्र नवीन निर्माण करण्याचा ध्यास नवीन पिढीने घेतला पाहिजे. तिचा तो छंद बनला पाहिजे.
सर्व प्रकारचे मतभेद विसरुन देशात एकजिनसीपणा आणणे, राष्ट्रीय एकता निर्माण करणे ही आज या देशाची खरी गरज आहे. पण गेले का शिक्षण तेथपर्यंत ? धर्म , वंश, पंध, जात, विभाग, भाषा या बाबतीत आपण अजूनही संकुचित आणि विकृत मनोवृत्तीचे आहोत, धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली अजूनही आपण माणसाला माणसासारखे वागवीत नाही. भाषेच्या, विभागाच्या प्रश्नांवरून आपण वागू नये तसे वागतो व देशाचे नुकसान करतो, ही संकुचित समाजविघटक व समाजविघातक मनोवृत्ती शिक्षणामुळे नष्ट होणार नसेल तर कशामुळे होणार आहे? योग्य काय आहे आणि अयोग्य काय, समाजाला, देशाला पोषक काय आणि अपायकारक काय याचा विचार करण्याची शक्ती शिक्षणातून येणार नसेल तर ते शिक्षण काय कामाचे ? या दृष्टीने शिक्षणाद्वारे काही होत आहे काय ? ही संकुचित भावना दूर करण्यास शिक्षणाची कितपत मदत होत आहे? या गोष्टीचा विचार केल्यास शिक्षण या बाबतीत अजून प्रभावी ठरले नाही असे वाटते. वास्तविक राष्ट्रीय एकतेचे बाळकडू लहान वयात, विद्यार्थी अवस्थेतच तरुणांना मिळाले पाहिजे.काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सारा देश माझा व मी देशाचा आहे ही त्यांची भावना, नव्हे निष्ठा बनली पाहिजे. देशाबद्दलच्या प्रेमाने त्यांचे मन भारून राहिले पाहिजे. या देशाबद्दल , देशाच्या इतिहासाबद्दल, स्वतःचा समाज व संस्कृतीबद्दल आपला अभिमान जाज्वल्य असला पाहिजे. माणसामाणसांत अंतर निर्माण करणा-या संकुचित भावनेचा त्यांनी त्याग केला पाहिजे . त्यांचे मन हिमालयासारखे विशाल बनले पाहिजे. या सर्व गोष्टी शिक्षणातून निर्माण होतील तेव्हाच शिक्षण हे ख-या अर्थाने शिक्षण या संज्ञेस पात्र होईल असे मला वाटते. ज्या शिक्षणावर समाज एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतो त्या शिक्षणामुळे नवीन पिढी कशा प्रकारची तयार झाली प्रकारचा तयार झाली पाहिजे व शिक्षणापासून आमच्या अपेक्षा काय आहेत याबद्दलचे माझे काही विचार मी आपल्यासमोर मांडले . कोणी अधिकारी व्यक्ती म्हणून नाही तर एक सामान्य नागरिक या नात्याने मी हे विचार मांडले आहेत. पण आणखी एक गोष्ट मला सांगावयाची आहे .शिक्षणाने समाजाबद्दल उपकाराची भावना मनात सतत तेवत राहिली पाहिजे . एखाद्या अशिक्षित व्यक्तीने ' समाजाने माझ्यासाठी काय केले ? ' 'हा प्रश्न स्वत:स विचारला पाहिजे व स्वत:च्या सदसदविवेक बुद्धीला स्मरून या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर त्याला देता आले पाहिजे. यासाठी आवश्यक ती प्रेरणा शिक्षणातून मिळाली पाहिजे. मला अभिप्रेत असणारे शिक्षण व समाजसेवेची प्रेरणा या शिक्षण संस्थांतून मिळेल अशी मला आशा आहे. मला आपण शांतपणे ऐकलात एवढे बोलून थांबतो.. धन्यवाद !!