गोरमाटींची बौद्धिक गुलामी मोजण्याचा
सेवादास महाराजांचा अभिनव प्रयोग...
थोर सेनानी नाथा वडतियाचा मी अनुयायी ....!
"दुपारची वेळ.........
क्रांतिसिंह सेवादास महाराज गुरं चरत असतांना विश्रांतीसाठी एक आंब्याच्या झाडाखाली बसलेले असताना,त्यांच्या सोबत असलेल्या दहा जणांच्या बुद्धीचे परिक्षण करण्याचे ठरविले..!
अचानक आंब्याच्या झाडाकडे वर पाहून "काय झाडाला चिंचा लागल्यात?" असे उद्गारताच त्यांच्या सोबत असलेल्या दहा जणापैकी नऊ जणांनी "होय बापू"म्हणत सेवादास महाराजांच्या वक्तव्याला मान्यता दिली आणि त्यातील एकाने मात्र "काय बापू तुम्ही खोटं बोलता ?" आंब्याच्या झाडाला कधी चिंचा लागतात काय ?" असा प्रतिप्रश्न उपस्थित केला.
सेवादास महाराजांना खोटे ठरविणार्या व्यक्तीला सेवादास महाराजांनी शाबासकी दिली. गोरमाटींची बौद्धिक गुलामी मोजण्याचा हा सेवादास महाराजांचा अभिनव प्रयोग होता.
एकंदरीत व्यक्ती पूजेला सेवादास महाराज महत्व देत नसत. निर्णय प्रक्रियेत स्वतःच्या मेंदूचा वापर करणार्या व्यक्तीला क्रांतिसिंह सेवादास महाराज किती महत्व देत असत हे या घटने वरुन स्पष्ट होते.या छोट्याशा घटने वरुन शब्द सामर्थ्याचा योद्धा क्रांतिसिंह सेवादास महाराज हे प्रसिद्ध विचारवंत कवी "होमरच्याही" पंगतीला जाऊन बसतात.
हीच व्यक्ती पुढे आयुष्यभर क्रांतिसिंह सेवादास महाराजांचे विश्वासू सहकारी म्हणून सेवादास महाराजांच्या सोबत होती. क्रांतिसिंह सेवादास महाराजांच्या क्रांतीची धवल पताका हाती घेऊन दळात सर्वात पुढे चालण्याचा मान याच व्यक्तीने पटकावला होता कोण होती ती व्यक्ती? त्या व्यक्तीचे नाव आहे "नाथा वडतिया! अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पाईक...थोर सेनानी..नाथा वडतिया !!
चला..आपणही या थोर सेनानी नाथा वडतियाची धवल पताका हाती घेऊन उद्याच्या विद्रोही सांस्कृतिक,साहित्य आणि राजकीय क्रांतीची दिशा निश्चित करू या......!
या महान इतिहास पुरूष नाथा वडिलांच्या वैचारिक आंदोलनास मानाचा मुजरा 🙏🏾🙏🏾🙏🏾
भीमणीपुत्र
मोहन गणुजी नायक
No comments:
Post a Comment
Jada jankari ke liye comment kare.