Saturday, June 22, 2019

"गरिबी हटविण्याचे महाराष्ट्रात सुरू झालेले नवीन क्रांतिपर्व" - वसंतरावजी नाईक

"गरिबी हटविण्याचे महाराष्ट्रात सुरू झालेले नवीन  क्रांतिपर्व"
                       - वसंतरावजी नाईक साहेब                 

 ( महाराष्ट्र दिन १ मे १९७२ , मुंबई , आकाशवाणी वरून दिलेले भाषण)


    1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि महाराष्ट्रीयन जनतेचे एक भाषिक राज्याचे स्वप्न साकार झाले. महाराष्ट्रातील लोकांच्या इच्छा-आकांक्षांना आणि कर्तृत्वाला नवीन पालवी फुटली. स्वककृत्वाने नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण कंकन बांधले. भूकंप वादळे पूर दुष्काळ आणि परकीय आक्रमणे यासारख्या नैसर्गिक व राष्ट्रीयआपत्तींना तोंड देऊनही राज्याने एका तपाच्या काळात विकासाच्या सर्व क्षेत्रात भरीव प्रगती करून समाजावर आधारित समृद्धीचा पाया घातला आहे. प्रगतीचा हा इतका मजबूत आहे की समृद्धीचे आणि सामाजिक संमृद्धीचे  सुंदर व भव्य मंदिर यावर उभारता येईल. 
  नुकत्याच भारतातील इतर राज्‍यात आणि महाराष्ट्रात राज्य विधानसभेच्या निवडणुका अत्यंत शांततेने आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या यामुळे लोकशाही ही भारतीय जनतेची जीवनपद्धती बनली आहे. याची पुन्हा सर्वांना एकदा प्रचिती आली. आपले प्रतिनिधी निवडून देताना महाराष्ट्रातील जनतेने जी शिस्त, शांतता आणि समजुतदारपणा दाखवला याबद्दल त्यांचे अभिनंदन करून माझ्यावर आणि माझ्या सहकार्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे मी माझे प्रथम कर्तव्य समजतो.
    गर्ववर्षात राज्य नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन मोठमोठ्या गोष्टींना तोंड द्यावे लागले.  गेल्या डिसेंबर मध्ये पाकिस्तानने भारत हल्ला केला.  मानव स्वातंत्र्य, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता या महान तत्त्वांचा आणि भारतचा सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय एकता त्यांच्या संरक्षणासाठी आपण हे आव्हान स्वीकारले आहे.  पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारत आसेतुहिमाचल एक झाला आणि आक्रमणाचा प्रतिकार उभा ठाकले.  आमच्या शूर जवानांनी पराक्रम केला आहे, केवळ चौदा दिवसांत पाकिस्तानवर अपूर्व विजय संपादन केले.  या विजयामुळे आमच्या तत्त्वनिष्ठेची पुन्हा एकदा चाचणी केली गेली आणि भारताची शान आणि मानसशाही उंचावली.  मला सांगायला अभिमान वाटतो की, संकटाशी सामना करण्यासाठी आघाडीवर राहण्याची आपली परंपरा महाराष्ट्राने याही वेळी राखली. जनतेने सर्व प्रकारे झळ सोसून , युद्ध प्रयत्नातला साथ दिली. आता युद्ध थांबले असले यी झळ मात्र आपल्याला दीर्घकाळ सोसावी लागणार आहे . यात अनेक जवानांना वीरगती प्राप्त झाली तर अनेक सैनिक  लढाईत अपंग बनले . त्यांच्या याराठी शासनाने जवान कल्याणाच्या अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत.
  गतवर्षी पावसाच्या अभावी खरीप व रब्बी पिके बुडाल्यामुळे लागोपाठ दुस - या वर्षी  राज्यात टंचाईची परिस्थिती निर्माण झाली . राज्यात वीस जिल्ह्यातील  सुमारे पंधरा हजार खेड्यांना दुष्काळग्रस्त परिस्थितीने ग्रासले . पण याही वेळी संकटावर मात करण्याच्या जिद्दीने शासन व जनता यांनी धैर्याने आणि कल्पकतेने टंचाईग्रस्त परिस्थितीशी यशस्वी रामना केला . दुष्काळग्रस्त भागातील सर्व गरजू लोकांना काम देण्यात आले . गेल्या फेब्रुवारीपर्यंत या कामावर सुमारे चाळीस कोटी रुपये खर्च  करावे लागले. यावरून टंचाईच्या या  प्रचंड कामांची कल्पना येईल .
     विशिष्ट वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक अशी खास यंत्रणा गेल्या वर्षी  उभी करण्यात आली . हातमाग विणकराचे प्रश्न सोडविण्यासाठी हातमाग संचालनालय , ऊस शेतक - यांच्या प्रश्नासाठी साखर संचालनालय आणि आदिवासींच्या प्रश्नांसाठी आदिवासी विकास महामंळाची स्थापना या दृष्टीने महत्त्वाची घटना होत . याशिवाय दुध व्यवसायाचा विकास करण्यासाठी खास योजना राबविण्यात येणार आहे.
  आणखी काही गोष्टीचा आज उल्लेख  करणे समयोचित ठरेल. महाराष्ट्रातील जनतेच्या आकांक्षाशी सीमा प्रश्न निगडित आहे . सत्र निवडणुकानंतर म्हेसुरमध्येही आता लोकनियुक्त सरकार अधिकारवर आले आहे . यास्तव केंद्र  सरकारने यापूर्वीच हाती घेतलेला महाराष्ट्र - म्हैसुर सीमा प्रश्न लवकरच  निकालात निघेल अशी अपेक्षा आहे.
     मराठवाड्याची भूमी सुपीक आहे . नवनवीन  शास्त्रीय शोध लावून तेथील कृषी उत्पादन वाढण्याला मोठा वाव आहे . यामुळे सुमारे तीन वर्षांपूत , मराठवाड्यात कृषी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता . हे कृषी विद्यापीठ दहा वर्षांनी स्थापन कावयाचे होते. पण तो कालावधी कमी होऊन येत्या जूनपासून परभणी कृषी विद्यापीठ सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत . या विद्यापीठामुळे मराठवाड्याच्या कृषी औद्योगिक विकासाला मोठा हातभार लागेल अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत शासनाने केलेल्या कार्यात जनतेने सक्रिय सहकार्य दिले . यापुढेही त्यांच्या आकांक्षेशी समरस होऊन आम्ही कार्य करू हा आमच्यावरील विश्वास जनतेने पुन्हा व्यक्त केला आहे . या जनतेच्या आकांक्षांशी एकरूप झालेले श्रीमती इंदिरा गांधींचे नेतृत्व आम्हाला लाभलेले आहे . ' गरिबी हटाव ' हे आमचे ध्येय असून , ते साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्व आहे . जनतेचे दारिद्र्य दूर करून , राज्यातील मागासलेल्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अधिक प्रमाणात सामाजिक न्याय मिळावा व त्यांची आर्थिक उन्नती झपाट्याने व्हावी यासाठी शासनाने एक सर्वव्यापी पंधरा कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे . या कार्यक्रमात जनतेच्या इच्छा - आकांक्षांचे प्रतिबिंब उमटले आहे . हा कार्यक्रम तातडीने अमलात आणण्यासाठी लागणारा पैसा अग्रहक्काने उपलब्ध करून देण्यात येईल . त्याचबरोबर अन्य विकास कार्याचीही वेगाने अंमलबजावणी करावयाची आहे . यासाठी जरूर तर उत्पन्नाची नवीन साधने शोधावी लागतील , कर आकारणी कमी व्हावयाची असल्यास , अल्पबचतीत अधिकाधिक गुंतवणूक झाली पाहिजे . गेल्या वर्षी जनतेने अल्पबचत मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला ही समाधानाची गोष्ट आहे . अल्पबचतीत अधिक पैसा गुंतवून आणि कराच्या रूपाने पडणारा बोजा स्वीकारून , गरिबी हटविण्याच्या कार्यास आपल्याला हातभार लावावा लागणार आहे . पंधरा कलमी कार्यक्रमातील ' मागेल त्याला काम ' हा कार्यक्रम उद्यापासून अमलात येत आहे तर कपाशीची एकाधिकार पद्वतीने खरेदी आणि कापडधंद्यांच्या पुनर्रचनेचा कार्यक्रमही याच हंगामापासून सुरू होत आहे . मुंबईतील झोपडपट्टया सुधारण्याचे कार्य १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे . मुंबई , पुणे , नागपूर , सोलापूर , औरंगाबाद वगैरे ठिकाणी यावर्षी जवळजवळ सहा कोटी रुपये या बाबतीत खर्च होणार आहेत . पंधरा कलमी कार्यक्रमातील प्रत्येक गोष्टी तातडीने पूर्ण करण्याचा शासनाचा निर्धार आहे . 
   समाजवाद आणि सामाजिक न्यायावर आधारित सध्द समाज निर्माण करणे , आपले अंतिम ध्येय आहे . यापुढे स्वावलंबन हा आपला परवलीचा शब्द आहे . यासाठी सर्व उपलब्ध साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन, आणि मानवी बुद्विमत्ता व कर्तृत्व पणाला लावून उत्पादन वाढविणे आणि वाढते संपत्तीचे न्याय्य वाटप होणे आवश्यक आहे . तसे केल्यानेच समाजवादवर आधार समृद्वीचे मंदिर आपण बांधू शकू . आपणच या मंदिराचे शिल्पकार आहोत . शिक्षण गुणवत्ता वाढवून आपल्याला नव्या युगातील प्रगतीच्या नव्या वाटांचे , नवनव्या  शास्त्रीय शोधांचे ज्ञान करुन घेऊन , कर्तृत्व व पुरुषार्थ जागृत करणे आवश्यक आहे. 
खरे म्हणजे माणसातील कर्तृत्व जागृत करून त्याच्यातील पुरूषार्थ चेतविणे हे विकासाचे मूळ कार्य आहे . महाराष्ट्र जागृत व्हावा यासाठी दहा वर्षांपूर्वी आपण जिल्हा परिषदा , पंचायत समित्या स्थापन केल्या . या काळात त्यांनी उत्कृष्ट कार्य केले . नैसर्गिक आणि राष्ट्रीय संकटांच्या प्रत्येक हाकेला त्यांनी ओ दिली . संकटावर मात करण्याच्या शासकीय प्रयत्नांना जिल्हा परिषदा आणि पंचायत सचिन निश्चयाने साथ दिली . अनेक शेतक - यांना उत्पादनाचे जुने उच्चांक मोडले . नवीन  प्रस्थापित केले . या पुरूषार्थात दुष्काळाचा सुकाळ करण्याची क्षमता आहे . महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणण्याची शक्ती आहे . महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाचे कर्तृत्व पुरुषार्थ जागृत करून आणि स्थानिक नेतृत्वाची आणि कर्तृत्वाची सांगड घातून गरिबी हटविण्याचे महाराष्ट्रात सुरू झालेले नवीन  क्रांतिपर्व यशस्वी करण्यास महाराष्ट्र दिनाच्या मंगल दिनी आपण कटिबद्ध होऊ या.
     
                             शब्दांकन- दिनेश सेवा राठोड 
                 कोहळा तांडा ता.दारव्हा जि.यवतमाळ
        www.profdineshrathod.blogspot.com
                     profdineshrathod@gmail.com
                          Cell- +91-9404372756 

स्रोत - वसंतरावजी नाईक - आवाहन ( Selected Speeches) पारीजात प्रकाशन 


No comments:

Post a Comment

Jada jankari ke liye comment kare.

नाईक साहेबेरो गुन्हो कांयी ?*

*महानायक वसंतराव नाईक साहेबेर अप्रतिष्ठा करेवाळ लोकुपर सामाजिक बहिष्कार का न नाकेन चाये ?*    - फुलसिंग जाधव, छत्रपती संभाजीनगर ============...