विरोधकांच्या मते वसंतराव नाईक
कृष्णराव धुळप , माजी विरोधी पक्षनेते , [ महाराष्ट्र विधानसभा ]
वसंतराव नाईक हे अजातशत्रू होते . कुणाचीही कधीही निंदा न करणारा आणि शत्रूशी सुद्धा अत्यंत नम्रपणे वागून शत्रूस मित्र करणारा थोर नेता म्हणजे वसंतराव नाईक होते. विरोधी पक्षातल्या जवळजवळ सर्व नेत्यांशी त्यांचे अत्यंत स्नेहाचे संबंध होते . कृष्णराव धुळप , रामभाऊ म्हाळगी , कारखानीस , बच्छराज व्यास , उत्तमराव पाटील , जांबुवंतराव धोटे , मृणाल गोरे , केशवराव धोंडगे , गणपतराव पाटील , एन . डी . पाटील , रा . सू . गवई ही सर्व मंडळी एकीकडे वसंतराव नाईक यांच्याशी राजकारणात भांडत होती. पण व्यक्तीशः त्यांचे स्नेहाचे आणि सलोख्याचे संबंध होते . वसंतराव नाईक यांच्या स्नेहपूर्ण वागणुकीतून अनेकवेळा विरोधी पक्ष अडचणीत येत होता. सर्वांशीच प्रेमाने , मैत्रीपूर्ण पद्धतीने वागणे हे वसंतराव नाईक यांचे वैशिष्ट्य होते . जांबुवंतरावाचे वडील आजारी होते, तेव्हा नाईकसाहेब त्यांची विचारपूस करण्यासाठी दवाखान्यात स्वतः गेले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक सध्याचे तत्कालीन
सरसंघचालक गोळवलकर गुरूजी कॅन्सरने दवाखान्यात आजारी होते . गुरूजी म्हणजे नाईकसाहेबांचे राजकीय विरोधक , पंरतू एक थोर नेता आजारी आहे, तर त्याला भेटले पाहिजे ही वसंतराव नाईक यांची वृत्ती होती .
मी कृष्णराव धुळप , माजी विरोधी पक्षनेते , महाराष्ट्र विधानसभा - १९५७ ते १९७२ पंधरा वर्षे विधानसभेचा सभासद होतो आणि १९७२ पासून पुढे सतत दहा वर्षे विरोधी पक्षाचा नेता होतो. त्यामुळे ९ वर्षे मी विरोधक म्हणून मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा कारभार डोळ्यात तेल घालून पाहिला आहे . विधानसभेतील त्यांचे वागणं, बोलणं चालणं सारे काही चलचित्रपटाप्रमाणे माझ्या मनचक्षु समोरून सरकत आहे. या बाबत जे मी ऐकले , पाहिले आणि अनुभवले ते सारं काही माझ्या लेखात समाविष्ट करणे शक्य नाही . त्याकरिता एखादा ग्रंथच लिहावा लागेल . विधानसभेतील विरोधी पक्षाचे काम म्हणजे सरकारला सतत धारेवर धरण्याचे. कर्तव्यात कसूर करणा-या मंत्र्यांना खिंडीत गाठून नामोहरम करण्याचे, भ्रष्ट राजकारभाराची लतूभरी लक्तरे वेशीवर टांगण्याचे , त्यामुळे विधानसभेच्या व्यासपीठावर “ नित्य आम्हा युद्धाचा प्रसंग ! " मी अनेक वेळा नाईक सरकारवर आणि वसंतरावजीवर व्यक्ती आणि मुख्यमंत्री म्हणूनसुद्धा अति कठोर , घणघाती रक्तबंबाळ करणारी टीका केली आहे. परंतु सरकार पक्षियासाठी ठेवलेल्या बाकावर पहिल्या क्रमांकावर बसलेले मुख्यमंत्री नाईक एका हातावर गाल टेकून शांतपणे माझे भाषण ऐकत असत . एखादा नर्म विनोद किंवा त्यांना घेतलेला शाब्दिक रेशमी चिमटा किंवा मारलेली अवखळ कोपरखळी त्यांच्या रसिक नजरेतून चुकत नसे आणि लगेच अस्पष्ट हास्याची सूक्ष्म लकेर त्यांच्या एरवी निर्विकार असलेल्या खानदानी चेह - यावर चमकून जाई . त्यांना सभागृहात मी कधी चिडलेले पाहिले नाही. त्यांनी कधी स्वतःचा तोल जाऊ दिला नाही. विरोधी पक्षाची टीका करण्याचा अधिकार मान्य करून सरकारी धोरणाचा आपल्या वैदर्भीय गोडव्याने ते पाठपुरावा करीत असत. असे व्यक्तीमत्व पुन्हा मिळणे ही भविष्यातील अत्यंत दुर्मिळ बाब असेल.
संकलन ः प्रा. दिनेश सेवा राठोड
संदर्भ ःलोकमत -वसंतराव नाईक स्मृती पुरवणी ३०/०८/१९७९
*********************************
Vasantrao Naik: According to the leaders of opposition
Vasantrao Naik was a person with no enemies. He was the great leader who never blasphemed anyone and was friendly to the enemy, treating the enemy with humility. He had a deep affection with almost all oppositional leaders , namely..Krishnarao Dhule, Rambhau Mhalgi, Karkhanis, Bachraj Raj Vyas, Uttamrao Patil, Jambuvantrao Dhote, Mrinal Gore, Keshavrao Dhonde, Ganpatrao Patil, Nr. D. Patil, Rt. Su Gawai was arguing with Vasantrao Naik on the one hand. But personally, they had affection and harmony with him. Vasantrao Naik's affectionate behavior was often troubling the opposition. His specialty was to act in a friendly manner. When Jambuvantarao's father was ill, Naik willingly had gone to the hospital to inquire about his health. National Volunteers,Golwalkar Guruji, the RSS chief, was ill and admitted in the hospital and was diagnosised with cancer. Although Guruji is a political opponent of Vasantrao Naik, but he lovingly met him because as he is a great leader.
I, Krishnarao Dholap, have been former Leader of the Opposition, Maharashtra Legislative Assembly and member from 1957to 1972 for fifteen years and leader of the Opposition for ten consecutive years from 1972 onwards. So for 9 years, I have seen his diplomacy very closely in the form of opposition. His behavior in the assembly and speaking are all moving in front of me like a movie . What I have heard, seen and experienced in this regard cannot be included at all in my my short speaking or in the article. If so far I have to write a book for that. The task of the Opposition in the Legislative Assembly is to hold the government in line. Ministers who have been convicted of their duties should be banished, hung on corrugated corridors by the corridors , so on the platform of the Legislative Assembly, sometimes it has been "The occasion of our war!" "I have repeatedly criticized Naik's government as like making very harsh, abhorrent bloodshed, both as a person and as a Chief Minister. But the Chief Minister, Naik, placing his palm on his cheek , he has been quietly listening to my speech. A soft joke or a literal silk. Pinch or hit the foggy corner with their juicy gaze Immediately, the subtle lines of humor flashed on his erratic nobility, and I never saw him so angry in the House. He acknowledged his right to criticize the opposition and immediately followed doctrinal sweetheart. It would be very rare to have such a great politician as well as personality again in future.
Compiled By- Prof. Dinesh Sewa Rathod
No comments:
Post a Comment
Jada jankari ke liye comment kare.