Wednesday, December 29, 2021

याडीकार

*सामाजिक क्रांती चे दुत बापू फुलसिंग नाईक आणि शैक्षणीक क्रांतीचे दुत श्रद्धेय बळीराम पाटील मांडवीकर यांची ऐतिहासिक भेट* 


*गहुली ते मांडवी प्रवास डमणीने*
=================================
*याडीकार पंजाब चव्हाण, पुसद*

-------+++--++++++++++++++++++++++

 *काल 3 सप्टेंबर 2021 रोजी सामाजिक क्रांतीचे दूत श्रद्धेय बापू फुलसिंग नाईक यांचा स्मृतिदिन*
काल सकाळी फिरताना फुलसिंग नाईक महाविद्यालयाचे निवृत्त योगा *प्राध्यापक माननीय जे.के .राठोड सर आणि माझे मित्र माननीय डी एन राठोड कंजरवेटर ऑफ फॉरेस्ट ऑफिसर सेवानिवृत्त* यांची भेट झाली. आणि सकाळी सकाळी माझ्या घरी चहा घेतला. आणि गोरबंजारा समाजा विषयी चर्चा करताना समाजातील *लोक नेते बापू फुलसिंग नाईक यांची आठवण झाली*. प्राध्यापक जेके राठोड सरांना महाराष्ट्राचे *मुख्यमंत्री जलनायक सुधाकरराव नाईक साहेब यांच्या धर्मपत्नी सुमनताई नाईक* यांनी सांगितलेली हकीगत अशी.....
 बंजारा समाजाचे *सामाजिक क्रांतीचे दूत श्रद्धेय बळीराम पाटील मांडवीकर* आपल्या पत्नीसह काशी दर्शनाला गेले .असताना आपल्या पत्नीचा फेटिया काचळी आटीचोटला ही वेशभूषा पाहून रेल्वेमध्ये फार मोठी अडचण निर्माण झाली. ते काशीला जात असतांना त्यांना जागो जागी  *फेटिया काचळी आटीचोटला* या वेशभूषा मुळे त्यांना वाईट वागणूक मिळाली. त्यामुळे ते अत्यंत नाराज झाले. आणि त्यांनी घरी येऊन मांडवी येथे गोर बंजारा समाजाचा हा गौरव शाली पारंपरिक वेशभूषा बदलण्याचा कठोर निर्णय घेतला .आणि लगेच त्यांनी आपल्या धर्म पत्नीला लुगडे नेसणे सुरुवात केली .त्यामुळे  गोर बंजारा समाजामध्ये वेशभूषा बदलण्यावरून फार मोठे वादळ उठले. पण त्यांना न घाबरता गोर बंजारा समाजाचे परिवर्तन करण्यासाठी श्रद्धेय बळीराम पाटील मांडवीकर यांनी खूप मोठी धडपड सुरू केली होती .या परिवर्तन लढाईचा विरोध बहुतांश तांडयात होत होता. लोक होळीच्या सणाला लेंगी द्वारे गीत गात होते .
*तांडो मांडवीरो चाल बिघाडो शेरीया*
*तांडो  मांडवीरो..रं!*
अशा पद्धतीने होळी उत्सवा मध्ये लेंगी गीताद्वारे *श्रद्धेय बळीराम पाटील मांडवीकर* यांना प्रचंड विरोध होत होता त्यांनी *श्रद्धेय बापू फुलसिंग नाईक गहुली* यांना भेटण्याचा निर्णय घेतला .मांडवी ते गहुली असा प्रवास डमणीद्वारे करण्याचा निर्णय घेतला ते नियोजित भेटीसाठी मांडवी वरून सकाळीच गहुली कडे निघाले .आणि पुसद तांड्यातील धुंदी येते त्यांना रात्र झाली .पुढे प्रचंड जंगलाचा रस्ता असल्यामुळे रात्रीला जाणे शक्य नसल्यामुळे त्यांनी धुंदी येथे मुक्काम ठोकला.
 *पातळी बाटी, चरकदाळ,लसणेर खोडी* चा पाहुणचार घेऊन त्यांनी सगळ्या लोकांना बंजारा समाजामध्ये परिवर्तन आणण्यासाठी एक छोटेखानी जाळ पेटून  रात्री सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी बळीराम पाटील मांडवीकर अशी ओळख न देता *मी बळीराम पाटील मांडवी करांचा दिवांजी आहे अशी ओळख दिली* त्यामुळे  त्यांना  लोंकानी कुठल्याही शिव्या शाप दिला नाही .त्यांचे आदरातिथ्य केले. पण त्यांच्या समोरच बळीराम पाटील मांडवी करांना प्रचंड शिव्या देण्यात आल्या.
 *फेटिया काचळी बदलान गोरबाईन कोरी करनाको,समाजेर नाक कटानाको आसे पटल्यानं समाजेर  बार काढेर  गरजे छं?* असा सुर होता. लोकांचा रूख त्यांना समजला   होता. लोकांचा राग पाहून बळीराम पाटील मांडवीकर यांनी सकाळी पाच वाजता उठून चहा न घेताचं ते आपल्या डमणीने गहुली येथे  निघून गेले . आणि *बापू फुलसिंग नाईक* यांची भेट घेतली तोपर्यंत धुंदी तांड्यात येऊन वार्ता पसरली होती।
  *अरे ऊ मनक्या बळीराम पाटीलरो दिवानजी कोणी रं... ऊ  बळीराम पाटील मांडवीकर च रं.आपणेन ऊ  फसान चलेग़ो*
 तांडयात एकच कल्लोळ झाला .आणि तांड्यातील पाच पन्नास लोक त्यांच्या समाचार घेण्यासाठी गहुली येथे जाऊन पोहोचले. आणि बापू फुलसिंग नाईक यांच्या समोर बळीराम पाटील मांडवीकर या यांना शिव्या देणे सुरू केले. बापू फुलसिंग नाईक यांना हे अजिबात पटले नाही. त्यांचा दरारा केवळ गहुलीतच नव्हे तर संपूर्ण गोरबंजारा समाजामध्ये होता. त्यांनी त्यां लोकांना बजावून सांगितले बळीराम पाटील मांडवीकर हे आपले पाहुणे आहेत आणि गोर बंजारा संस्कृती मध्ये पाहुण्याचा कोणी अपमान करतो का? पाहुण्याला कोणी शिव्याशाप देतो का? अशी समजूत घालून सगळ्या लोकांना शांत केले. आणि त्यानंतर बापू फुलसिंग नाईक यांनी लोकनेते बळीराम पाटील मांडवी कर यांच्यासोबत गहुली गावात परिवर्तनाची पहिली सभा घेतली. आणि लोकांना परिवर्तनाच्या वाटेने आपण गेलो तरच आपली निश्चितच प्रगती होणार आहे .असे बजावुन सांगितले. लोकांचा राग शांत झाला. लोकांनी बळीराम पाटील मांडवी कर यांच्या परिवर्तनाच्या विचारांचे स्वागत केले. *गहुली गावातून फेटिया काचळी आटीचोटला  हद्दपार  करण्यात आला* 
कदाचित तो विदर्भातील पहिला तांडा असेल आणि ही परिवर्तनाची लढाई महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात पसरली .असे परिवर्तन करणारे *सामाजिक क्रांतीचे क्रांतीचे दुत बापू फुलसिंग नाईक आणि शैक्षणीक क्रांती चे दुत श्रद्धेय बळीराम पाटील मांडवीकर यांची ही ऐतिहासिक भेट*
 तिची ही माहिती दस्तुरखुद *बळीराम पाटील मांडवीकर यांची कन्या तथा महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री जलनायक सुधाकरराव नाईक साहेब यांच्या धर्मपत्नी सुमनताई नाईक* यांनी प्राध्यापक जेके राठोड सरांना सांगितली .आणि प्राध्यापक जे.के .राठोड सरांनी ही ऐतिहासिक भेटीची आठवण आज माझ्या घरी सांगितल्यामुळे ही ऐतिहासिक भेटीची चर्चा आपण सर्वांना माहित व्हावी. या हेतूने हा छोटेखानी लेख प्रपंच.
 एक काळ असा होता की फेटीया काचळी आटीचोटला बदलविण्याची गरज वाटली.  *
*पण कॉम्रेड डी.बी. नाईक साहेब माजी सभापती पंचायत समिती महागाव यांनी आज गोर बंजारा गौरवशाली वेशभूषा   वाचवणे ही काळाची गरज ओळखून त्यांनी सन 2009 मध्ये भेटीया बचाव आंदोलन केले होते* 
सदर बळीराम पाटील मांडवीकर हे परिवर्तन लढाई मधील गोर बंजारा समाजातील *प्रथम गोर सैनिक असून गोर बंजारा समाजामध्ये त्यांना आणि बापू फुलसिंग नाईक यांना मायनस करून कोणालाही पुढे जाता येत नाही. इतके मोठे प्रचंड काम या दोन्ही महापुरुषांनी केले आहे*
. *सामाजिक क्रांतीचे दूत बापू फुलसिंग नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण🙏🙏🙏 आदरांजली* 
या घटनेच्या  विस्तृत माहितीसाठी आत्ताच बोला प्राध्यापक जे.के .राठोड सर पुसद 97 67 15 74 41 
काही तांत्रिक अडचणीमुळे सदर पोस्ट काल टाकता आली नाही. 
समक्षव🙏🙏 

*याडीकार पंजाब चव्हाण, पुसद मोबाईल नंबर 95 52 30 27 97*

No comments:

Post a Comment

Jada jankari ke liye comment kare.

नाईक साहेबेरो गुन्हो कांयी ?*

*महानायक वसंतराव नाईक साहेबेर अप्रतिष्ठा करेवाळ लोकुपर सामाजिक बहिष्कार का न नाकेन चाये ?*    - फुलसिंग जाधव, छत्रपती संभाजीनगर ============...