Tuesday, April 4, 2023

साहित्य परिषद, बंजारा धर्म पीठ पोहरागडच्या अध्यक्षपदी निवड*

*डॉ.  दिनेश सेवा राठोड यांची एक दिवशीय साहित्य परिषद, बंजारा धर्म पीठ पोहरागडच्या अध्यक्षपदी निवड*
 🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️
 आपणास कळविण्यास आनंद होत आहे की *२९ मार्च २०२३ रोजी पोहरादेवी* येथे रामनवमी यात्रा महोस्तव निमित्ताने एक  दिवशीय साहित्य संमेलन (साहित्य परिषद) आयोजित केले आहे  या संमेलनाचे अध्यक्षपदी साहित्यिक डॉ. दिनेश सेवा राठोड यांची निवड करण्यांत आली आहे.    
 * इंग्रजी वाङमय चे अभ्यासक, डॉ.  दिनेश सेवा राठोड* हे महाराष्ट्र राज्यच नव्हे तर  भारतातील एक प्रख्यात इंग्रजी साहित्यिक, समिक्षक, शिक्षक, आणि विश्लेषक आहेत.  इंग्रजी, हिंदी व गोर बंजारा लेखक तथा लोकसाहित्यकार म्हणून त्यांची एक वेगळी आंतरराष्ट्रीय ओळख आहे. इंग्रजी साहित्यिक  टि. एस. इलियट, खुशवंत सिंह, डॉ. श्‍यामसिंह शशी आणि लेखक, भीमणीपुत्र मोहन नाईक या महान विद्वानांच्या साहित्यापासून प्रेरणा घेऊन ते साहित्य लेखनाकडे वळले. गोर-बंजारा भाषाशास्त्र, संस्कृती, इतिहास या क्षेत्रांचा सखोल अभ्यास आणि संशोधन करण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. गोरबंजारा संपन्न  परंपरा, इतिहास आणि संस्कृती आणि बंजारा समाजाचे प्रमुख व्यक्तिमत्त्व भावी पिढ्यांसाठी उलगडणे हे लेखकाचे जीवनातील ध्येय आहे.
 लेखकाने भारतीय गोर-बंजारा लोकसाहित्य, गौरवशाली इतिहास, सांस्कृतिक मूल्ये यावर आधारित *"Bhimniputra's GORPAN: The Linguistic Beauty In Gorboli Dialect: A Socio -Cultural Study &Analysis नावाचे इंग्रजी भाषेत समिक्षात्मक पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक जगातील विविध वेब पोर्टल्सवर वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.  परिणामी, फार कमी कालावधीत हे पुस्तक भारतात आणि परदेशात खूप लोकप्रिय झाले आणि मोठ्या प्रमाणावर विकल्या गेले आहे.  यामुळे लेखकाच्या पुस्तकाने जगभरातील वाचकांच्या हृदयात महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे.  याशिवाय, लेखकाने 2020 मध्ये वसंतराव नाईक यांच्या जीवन आणि कार्यांवर आधारित इंग्रजी  भाषेतील,  *VASANTRAO Naik: A Pioneer in Politics and the Father of Agro-Industrial Revolution- VOLUME: I & II* व 2021 मध्ये हिंदी भाषेतील *वसंतराव नाईक:  राजनीती के अग्रदूत और कृषी-औधोगिक क्रांती के प्रणेता- प्रथम खंड व द्वितीय खंड* पुस्तक प्रकाशित केले आहे. 
 अखिल भारतीय बंजारा सेवा संघाचे सक्रिय सदस्य म्हणून लेखक विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतात. त्यांनी मुंबई येथे 5 वे अखिल भारतीय गोर-बंजारा साहित्य संमेलन-2018 यशस्वीपणे आयोजित केले आहे. सध्या पोहरदेवी येथे उभारल्या जाणाऱ्या संत सेवालाल नांगरा संग्रहालयातही लेखकाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध उल्लेखनीय कार्यांसाठी लेखकाला राष्ट्रीय बंजारा समाज भूषण पुरस्कार, शिवनेरी पुरस्कार, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, रजि.ट्रस्ट, मुंबई द्वारा राष्ट्रीय शिक्षक दिनी "गुणवंत शिक्षक गुरूगौरव शिक्षकरत्न- 2021, केंद्र सरकाराचा   टिचर इनोव्हेशन अवार्ड, भारत सरकार नेहरू युवा केंद्राचा केंद्रीय राष्ट्ररत्न पुरस्कार , Kites Craft Zee production चा  Best Creative & International English Author Of The Year-2021 आणि इतर अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
 उदात्त प्रकाशित कार्य, संशोधन, विशिष्ट क्षमता, सातत्यपूर्ण कामगिरी, विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग, सामाजिक, साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्राविण्य आणि मानवतेच्या भावनेने केलेले कार्य यामुळे लेखक मानद पदवी, डी. लिट. उपाधीने ते सन्मानित आहेत.  
 डॉ. दिनेश राठोड यांनी काही संपादित पुस्तकांसह सुमारे दहा पुस्तके लिहिली आहेत आणि भाषाशास्त्र (विशेषतः गोरबोली- बंजारा भाषेची उत्पत्ती आणि वाढ), प्रमुख व्यक्तिमत्त्वे, बंजारा जमातीचे ऐतिहासिक पैलू, इंग्रजी साहित्य, व्याकरण आणि बदलते शैक्षणिक प्रवाह  यासारख्या विषयावर आंतरराष्ट्रीय नियतकालिकांसाठी अशा विविध विषयांवर एकशे पंधराहून अधिक संशोधन लेख लिहिले आहेत. ते एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत संशोधन कार्यासाठी भारत आणि परदेशातील अनेक विद्वानांना ते मार्गदर्शन करीत आहेत.
  *डॉ.दिनेश सेवा राठोड सर आपणास खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन*
 🙏🙏💐💐💐🙏🙏
   *श्री.  विलास राठोड*
  *राष्ट्रीय समन्वयक*
 *राष्ट्रीय बंजारा परिषद*


 



 

No comments:

Post a Comment

Jada jankari ke liye comment kare.

नाईक साहेबेरो गुन्हो कांयी ?*

*महानायक वसंतराव नाईक साहेबेर अप्रतिष्ठा करेवाळ लोकुपर सामाजिक बहिष्कार का न नाकेन चाये ?*    - फुलसिंग जाधव, छत्रपती संभाजीनगर ============...