*पोहरादेवी गोरबंजारा देशव्यापी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ. दिनेश सेवा राठोड यांची निवड*
-----------------------------------------
गोर बंजारा समाजाचा गौरवशाली इतिहास, जगासमोर आला पाहिजे, यासाठी समाजातील लेखक, साहित्यिक, विचारवंत, कवी, बुद्धीजीवी मंडळी, इतिहास अभ्यासक यांच्यामध्ये विचार मंथन होण्याची गरज आहे. यासाठी धर्मपीठावर *दि. २९ व ३९ मार्च २०२३* ला गोर बंजारा हृदयसम्राट उद्योगपती, भगवंत सेवक किसनभाऊ राठोड यांच्याकडून देशव्यापी साहित्य परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे. धर्मसत्ता, राजसत्तेबरोबर गोर बंजारा समाजाची साहित्यसत्ता मजबूत झाली पाहिजे. वैभवशाली गोर संस्कृती, गोर बोलीचे जतन संवर्धन झाले पाहिजे. यासाठी समाजातील लिहणाऱ्या हातांना बळ मिळावे. गोर बोलीत मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती व्हावी. गोर बंजारा समाजाचा इतिहास, साहित्याच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहचावा. यासाठी धर्मपीठावर भव्य अशा साहित्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या देशव्यापी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी *कोहळा तांड्याचे भूमीपुत्र साहित्यिक प्रा. डॉ. दिनेश सेवा राठोड यांची निवड करण्यात आली आहे.*
या साहित्य परिषदेला देशभरातील गोर बंजारा संस्कृतीचे अभ्यासक, लेखक, साहित्यिक विचारवंत हजेरी लावणार आहेत. समाजाला वैचारिक मेजवानी देणारी ही साहित्य परिषद असेल. अशा प्रतिक्रिया या साहित्य परिषदेबद्दल समाजातील साहित्यप्रेमी मंडळींकडून ऐकायला मिळत आहेत. तरी आपण गोर बंजारा समाजाचे साहित्यिक व राष्ट्रीय बंजारा परिषदेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व समाज बांधव *या साहित्य संमेलन मध्ये आपला सहभाग घ्यावा असे आव्हान स्वागताध्यक्ष व राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय संघटक श्री. विलासराव राठोड तथा पत्रकार शंकर आडे स्वागताध्यक्ष साहित्य परिषद यांनी केला आहे.*
No comments:
Post a Comment
Jada jankari ke liye comment kare.