*गोरबोली-बंजारा भाषेला घटनात्मक संरक्षण, संत सेवालाल महाराराजांचा विज्ञानवाद व वसंतराव नाईक साहेब यांचा वसंतवाद अंगीकार केल्यासच बंजारा समाजाची सर्वागीण प्रगती शक्य.*
*- प्रा. डॉ. दिनेश सेवा राठोड (वसंतकार)*
🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️
*मानोरा-* पोहरादेवी भक्तीधाम येथे राष्ट्रीय बंजारा परिषद द्वारा उद्योजक श्री. किसनराव राठोड यांच्या अथक प्रयत्नाने आयोजित एकदिवसीय गोर बंजारा साहित्य परिषद दि. 29 मार्च ला मोठ्या थाटात पार पडली
गोर बंजारा समाज हा वैचारिक, साहित्यिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध सुसंस्कारित, न्यायप्रिय मानवतावादी प्रकृति पूजा वर विश्वास ठेवणारा समाज आहे. या समाजाची संपन्न अशी मौखिक परंपरा, इतिहास आणि संस्कृती आहे. समाज जीवनाचे चिंतनात्मक प्रतिबिंब साहित्य संमेलनात उमटत असते व त्याद्वारे तत्त्वचिंतनाची एक नवी वाट साहित्यप्रेमीं करवी समाजाला गवसत असते. गोर बंजारा समाज आणि साहित्यिकांसाठी हा फार आंनदाचा क्षण ठरला आहे. हजारो साल पडद्यामागे असलेलेले गोर "तांडा साहित्य" साहित्य हे नवेसाहित्यिकाच्या माध्यमातून आज समाजा समोर येण्यासाठी मोठे प्रयत्न आज होत आहेत. ज्या समाजाचे साहित्य अन प्रेरणास्त्रोत दुबळा तो समाज ही दुबळा असतो, साहित्य हा समाज क्रांतीचा टप्पा असायला हवे. साहित्यातुन समताधिष्टित समाज रचनेमधील शोषण मुक्त नवा माणूस उभा करण्याची प्रेरणा मिळत राहावी. अशा साहित्यकाच्या प्रेरणा शक्तीची आज तांड्याला नितांत गरज आहे.
आमच्या मौखिक साहित्यातील "याडी" ही समाजाची पहीली साहित्यिक आहे. खरे साहित्य तेच आहे जे समाजाला सत्याकडून प्रगतीकडे अग्रेसित करते. याच बरोबरच आज समाजातील शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक व राजकिय क्षेत्रा समोर निर्माण झालेली दुरावस्था व त्यावरील विचार मंथन हे आमच्या साहित्यिक, कवी व सशोधक यांच्या साहित्यातुन सदाकाळ उमटत राहायला हवे. वैचारिक अधिष्ठान नाविण्यपूर्ण विचाराचे सर्जन व स्वीकार करून समाज परीवर्तनाचे विविधांगी विचार आपल्या लेखनीतुन साहित्यिक उभे करतो आहे. त्यांच्या कथा, कादंबरी, कवीता, समिक्षा, अनुवाद, संशोधन, ललीत व वैचारिक लेखन आम्हाला वाचायला मिळत आहे. आज शासनाच्या साहित्य अकादमी द्वारा बंजारा साहित्य पूरस्कृत होत आहे... शालेय व विद्यापीठीय अभ्यासक्रमात आमच्या साहित्याचा समावेश होत आहे ही अभिमानाची बाब आहे. गोरबोली भाषा ही केवळ बोलीच नाही तर मान्य भाषेच्या निकषाने परिपूर्ण भाषाच आहे. हे मी संशोधनातुन जागतिक स्तरावर सिद्ध केले आहे. त्यामुळे आमच्या बोली भाषेला लिपी नसली तरीही बोलीभाषातुन निर्माण झालेले साहित्य हे ज्ञानपीठ पुरस्कारासाठी सुद्धा निश्चितच पात्र ठरणार आहे.
*"दनं डूबगो काळे बादरीयामं नेकी गमागीये मायारी झोलेम नेकी ढुंडलो सासो वचारेम"*
अर्थात गोर बंजारा बोलीभाषा.
ही बंजारा भाषिक समाजाच्या विकासाचे मूळ सुत्र आहे. ते आचरणात आणून उपरोक्त अंगाने विचार करावे लागेल. आमच्या भाषेचा विकासच हे समाजाच्या सर्वागीन विकास व प्रगतीची धार आहे. बोली भाषिक बंजारा लोक गण समुदायाला सामाजिक प्रतिष्ठा मिळण्यासाठी गोरबोली बंजारा भाषेला घटनात्मक मान्यता मिळण्याची मांगणी ही भाषिक लोकगण साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पूर्ण करणे ही आजची खरी गरज आहे. त्यामुळे अशा साहित्य संमेलनाचे/ परिषदेचे आयोजन नेहमी होत राहायला हवे. बंजारा बोलीभाषा लिखित साहित्य हे प्रपंचात येणे गरजेचे आहे.. आतापर्यंत आमच्या समाजात वाचन संस्कृती रूजीलीच नाही यी मोठी शोकांतिका आहे. तांड्यातांड्यात वाचनालय निर्माण होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे. बंजारा बोलीला भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, ही जुनी मागणी आहे. गोर बंजारा बोलीभाषेला घटनात्मक संरक्षण मिळण्यासाठी आपण सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. सोबतच बंजारा बहुल क्षेत्रातील विद्यापीठाच्या अध्ययन आणि भाषाविज्ञाच्या कक्षेत संशोधनासाठी गोरबोली भाषेचा समावेश व्हायला हवे. भाषिक राज्याच्या क्रमिक, पाठ्यपुस्तकात अधिकाधिक गोरबोली भाषा साहित्याचा समावेश होत राहायला हवे. मुल्याधिष्टित अद्भुत अशी गोरमाटी, संस्कृती, गोर बोलीभाषेचे जतन व संवर्धन अशा प्रकारच्या साहित्य सम्मेलन परीषदेतून होत राहायला हवे. .
शेकडो वर्षांपासून गोर बंजारा समाजाचा गौरवशाली व शौयाचा इतिहास आहे. त्यांचे साहित्य प्राचीन आहे. सर्वच राज्यांत असलेल्या बंजारा समाजाची एकच बोली आहे. त्यात हे साहित्य लिहिले गेले. भजनकरी, कवी, गायक व याडी-आई यांनी मौखिक साहित्यातुन त्याची जपणूक केली आहे. या साहित्याला पारंपरिक न ठेवता त्याचा विस्तार करावा, गोर बंजारा समाज प्राचीन काळापासून आपली समतावादी, जात, धर्म, देव, अन कर्मकांडमुक्त निसर्गवादी जीवन जगत आहे. आजच्या बदलत्या प्रवाहात बंजारा साहित्यिकांनी गोर बंजारा समाजाचा प्राचीन साहित्याचा शोध करून वास्तव साहित्य समाजा समोर मांडण्याचे प्रयत्न करायला हवे, आणि समाजात आधुनिक स्वरुपाचा विज्ञानवादी, बुध्दिप्रमाण्यवादी अन परिवर्तनवादी साहित्य निर्माण करायला हवे. आज समाजात अनावश्यक प्रथा व अंधश्रद्धा फेफावात आहे. याला कायम आळा घालना गरजेचे आहे. *"गोरवट गोरुरो राजवट लावा...."* हे क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांचे लाख मोलाचे वाड्ःमय धन याची जाणीव आजच्या पिढीला करून देणे ही आमच्या साहित्यिकाची जबाबदारीची आहे. संत सेवालाल महराराज यांचा विज्ञानवाद, विचारधारा मौलिक बाबी समाजाच्या प्रतेकांपर्यत पोहोचणे गरजेर आहे. तसेच वसंतराव नाईक यांच्या राजकीय नेतृत्वामधील व्यापक समाजिक हित, समाजवादी अर्थव्यवस्थेचे कार्यन्वयन, लोकतांत्रिक प्रतिबद्धता व व्यक्ती विकासाचा दृष्टिकोन या चार सिद्धांतानी युक्त असलेला वसंतवाद याचा अंगीकार केल्यासच गोर बंजारा समाजाला परिवर्तनवादी वाटेने चालण्याची दिशा मिळेल असा आशावाद आपल्या दिर्घ अध्यक्षीय भाषणातुन साहित्य परिषदेचे अध्यक्ष *इंग्रजी साहित्यिक- वसंतकार प्रा. डॉ. दिनेश सेवा राठोड* यांनी व्यक्त केला.
परिषदेचे उद्घाटन प्रा. डॉ. गणेश चव्हाण यांनी केले. यावेळी भक्ती धाम निर्माता भगवंत सेवक किसनराव राठोड, तेलंगणाच्या मंत्री सत्यवतीबाई राठोड, तेलंगणाच्या आमदार रेखाताई राठोड, आमदार बापूराव राठोड, महंत जितेंद्र महाराज, प्रा. डॉ. विजय जाधव, डॉ. विपीन राठोड, प्रा. डॉ. माणिक राठोड, कवी बाबुलाल राठोड, साहित्यिक प्राचार्य श्रीमंत राठोड मुंबई, प्रा. डॉ. अशोक पवार, प्रकाश वडते, श्रीपद राठोड नागपुर, डॉ. शांतीलाल चव्हाण, बाबुसिंग नाईक, रामबल नायक (हैदराबाद), सिद्धलिंग स्वामी (कर्नाटक) आदी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार अनंतकुमार पाटील यांना 'बंजारा रत्न' हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बंजारा साहित्य अकादमीचे अध्यक्ष *शंकर आडे व प्रा. विलास राठोड* यांनी कार्यक्रम-सत्रसंचालन केले.
No comments:
Post a Comment
Jada jankari ke liye comment kare.