Friday, April 3, 2026

जानजो छानजो पचच मानजो- फुलसिंग जाधव

*"जाणजो छाणजो पछच मानजो" बाबत गबरूसिंग राठोड यांचा कबुलनामा आणि अनुत्तरीत प्रश्न*
 -फुलसिंग जाधव, सामाजिक कार्यकर्ता
---------------------------
    दिनांक ८/३/२०२६ रोजी "छत्रपती संभाजीनगर येथील सध्या गाजत असलेल्या "जाणजो छाणजो पछच मानजो" प्रकरणावरील लेख तालिबानी प्रवृतीचा राजपालसिंग राठोड स्वतःच्या बापाची पण धिंड काढणार का ?" या शीर्षकाखाली मी "जाणजो छाणजो पछच मानजो" या संदर्भात सविस्तरपणे वस्तुस्थिती मांडली होती. प्रारंभी मी मांडलेली वस्तुस्थिती समाजाच्या पचनी फारशी पडली नाही. पण जेंव्हा बुद्धिजीवी वर्गाने या विषयावर खल करायला सुरुवात केली तेंव्हा त्यांनाही पटु लागले की हे विचार संत श्री सेवालाल महाराज यांचे नसून दुसऱ्यांचे विचार समाजात पेरणाऱ्यांचे मोठे षडयंत्र आहे. आता तर गबरूसिंग राठोड यांनी कबुलनामाच देऊन टाकलेला आहे. पाहू यात कबुलनामा काय आहे तो...!
    *काय आहे कबुलनामा?*
  समाजात होणारी नाचक्की पचवणे अवघड झाल्याकारणाने दिनांक १९/३/२०२६ रोजी गबरूसिंग राठोड यांनी एका पोस्टद्वारे त्यांनी समाजाची केलेली दिशाभूल आपली चमडी वाचवत सांगून टाकलेले आहे.
     दिनांक १९/३/२०२६ रोजीच्या आपल्या पोस्टमध्ये गबरूसिंग राठोड लिहितात- *"मी व माझे पुर्वज हे जन्मापासूनच बुद्ध असून हिंदुत्वाविरुद्ध जनजागृती करणे हे आमचे परमकर्तव्य आम्ही मानतो. ‘जाणजो छाणजो पछज मानजो’ हे बोधवचन मुलत: बुद्धांचे आहे, हे मी पुस्तकातच स्पष्ट केले आहे. तेव्हा या बुद्ध व बोधवचनाबाबत वैचारिक वाद निर्माण करणे मूर्खपणाचे लक्षण आहे."*
   एकीकडे गबरूसिंग राठोड महाशय ‘जाणजो छाणजो पछज मानजो’ हे बोधवचन मुलत: बुद्धांचे आहे, हे मी पुस्तकातच स्पष्ट केले आहे असे म्हणतात, तर दुसरीकडे ते त्यांच्या
"क्रांतीकारी संत, संत सेवालाल महाराज" या पुस्तिकेच्या पृष्ठ क्रमांक १६ वर लिहिलेले आहे की, "संत सेवालाल महाराजांनी 'जाणजो, छाणजो अन पछज मानजो' अर्थात कोणत्याही बाबतीत सत्याचा शोध घेऊन नंतरच त्याचा स्वीकार करीत जा, असी शिकवण दिली आहे."
   सदरील प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून लगेच त्यांनी पलटी मारुन 'जाणजो, छाणजो अन पछज मानजो' हे बोधवचन मुलत: बुद्धांचे आहे असे मान्य केले आहे.
   या विद्वान तथाकथित परिवर्तनवादीचा गुंड मुलगा राजपालसिंग राठोड काय म्हणतो ते पहा- "गोर विचारवंत व सेवालाल बापूंच्या निष्ठावंतांनी विकृत बुद्धिवंताचा निषेध करावा. 'जाणजो छानजो अन पछज मानजो' हे *गोर बोलीतले बोधवचन शंभर टक्के सेवालाल बापूचेच आहे.* जर सेवालाल बापूचे हे वचन नाही असे कोणाचे म्हणणे असेल तर दुसरे कोणाचे हे वचन आहे हे आक्षेप घेणाऱ्यांनी सिद्ध करावे."
  आम्ही सिद्ध करण्यापूर्वीच त्याच्या भेसळकिंग बापाने सिद्ध करुन टाकले आहे की, हे वचन संत श्री सेवालाल महाराज यांचे नसून भगवान बुद्धांचे आहेत !
   गेली पंधरा वर्ष मी 
"जाणजो छाणजो पछच मानजो किंवा केनी भजो मत पूजो मत किंवा भजने पूजनेम वेळ मत घालो किंवा तमारे जीवणेम तमच दिवो लगा सकोछो." असे अनेक वचन संत श्री सेवालाल महाराज यांचे नसून आपल्या समाजातील बुद्ध धर्मीयांनी पेरलेले आहेत. हे मी सतत सांगत होतो, पण समाज विश्वास ठेवायला तयार नव्हता. आता तरी सत्य उजागर झाल्यानंतर छुपा अजेंडा राबविणाऱ्यांना समाजाने त्यांना ओळखावे ! 
   भ्रमिष्ट गबरूसिंग राठोड त्यांच्या पोस्ट मध्ये पुढे लिहितात की- " मी *जन्मापासून माझ्या पूर्वजांच्या मुळ धम्मतत्वाशी एकनिष्ठ आहे. जन्मापासून तथागताचा धम्म जीवनप्रवास हा माझा प्रवास आहे. मला दीक्षा घेण्याची गरज नाही. शाळेतील लेखामुळे मी हिंदू म्हणून ओळखला जात असलो तरी मी पाखंडी हिंदू कर्मकांडांत स्वत: होवून कधीच घुसलो नाही.* मी बालपणापासून धम्मजीवन जगत आहे. दीक्षा घेण्याची गरज त्यांना असते जे धर्मांतर करतात. मी लहानपणापासून हिंदू जीवन न जगता धम्मजीवन जगत असल्यामुळे *मी 24 कॅरेट सोन्याप्रमाणे 100% बुद्धतत्वीयच आहे."*
   या देशाचे संविधान प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य देते. तुम्ही बुद्ध धम्म स्विकारलात याला माझा आक्षेप नाही. आक्षेप आहे तो तुमच्या नियतीवर. म्हणून तुम्हाला माझे कांही प्रश्न आहेत- (एक) जर तुम्ही बुद्धिस्ट आहात तर, आजवर ही गोष्ट समाजापासून लपवून का ठेवली ? 
 (दोन) जर तुम्हाला धर्म निवडण्याचा अधिकार असेल तर मग आमच्या पूर्वजांनी जो धर्म निवडला त्याला तुमचा आक्षेप का ? का तुम्ही आम्हाला नाव ठेवता?
   *आम्ही आमच्या संतांचे आणि पूर्वजांचे अनुसरण केले.  तुमच्या पोटात पोटसुळ उठण्याचे कारण काय ?*
   दूरदृष्टी असलेले आमचे संत स्वामी हाथीराम महाराज, संत श्री सेवालाल महाराज, संत श्री ईश्वरसिंगजी बापूजी, संत श्री महादेव (दगाजी) चैतन्य बापूजी, संत श्री रामराव बापूजी, संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांनी आणि आमच्या पूर्वजांनी जीवन जगण्याची "हिंदू जीवन पद्धती" स्विकारली. त्याचेच आम्ही अनुसरण केले आहे. जर तुम्हाला धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य आहे, तर मग आम्हाला तो नाही असे तुम्ही का मानता? आमच्या संतांनी आणि आमच्या पूर्वजांनी  निवडलेल्या हिंदू धर्मामुळे आम्ही मनुवादी,  मनुवादीची औलाद, मनुवादीचे बैल कसे काय ठरु शकतो? आज या देशातील ऐंसी टक्के जनता हिंदू आहे. ते सारे मनुवादी आहेत का?   
 *भ्रमिष्ट भ्याडांनो, मनुवादीचे हाडुक अजून किती दिवस चघळणार आहात* ? जग AI च्या युगात आहे. मनुवादीचे हाडुक चघळून चघळून तुमचे जबडे रक्तबंबाळ झालेले आहे.आता तरी टाका ते खाली.
     *हिंदू गोर बंजारा समुहात तुमची लुडबुड कशासाठी?*
     जेंव्हा तुम्ही होय "आम्ही बौद्ध धम्मीय आहोत" असे छाती ठोकुन सांगता, तेंव्हा तुमचे कार्यक्षेत्र बौद्ध धम्मीय समाज आहे. हिंदू गोर बंजारा हे कार्यक्षेत्र तुमचे कसे होऊ शकते? ज्याअर्थी तुम्ही बौद्ध धम्म निवडला आहे; त्याअर्थी त्या धर्मात तुम्ही काम करायला पाहिजे. इकडे तोंड घालण्याची तुमची गरज काय आहे ? तुमचे कांहीही घेणेदेणे नसतांना तुम्ही लक्षचंडी यज्ञाच्यावेळी तोंड घातलात, गोद्री येथे आयोजित हिंदू गोर बंजारा कुंभात तुम्ही तोंड घातलात. तुमचा धर्म वेगळा आहे. 
आमचा धर्म वेगळा आहे. आम्ही बिघडू अथवा सुधरु. त्याची चिंता तुम्ही कशाला करता? तुम्ही तुमचे बघा ना. कशाला हिंदू गोर बंजारा समुहात घुसुन घाण करताय ? इकडे डोकावण्याचा तुमचा कांहीही संबंध नाही. यापुढे हिंदू गोर बंजारा समुहात तुम्ही बंजारा बुद्ध धम्मीय लोकांनी घाण केलात तर याद राखा. यापुढे तुम्हाला सोडले जाणार नाही. विषय धर्माचा आहे म्हणून हा तुम्हाला स्पष्ट निर्वाणीचा इशारा आहे. आजवर तुम्ही समाजाला भ्रमित करण्याचे उद्योग भरपूर केलेला आहात. यापुढे ते खपवून घेतले जाणार नाहीत. 
*मनुवाद्याचे तुम्ही काय वाकडे करुन घेतले ?*
    भ्रमिष्ट गबरूसिंग राठोड महाशय त्यांच्या पोस्टमध्ये पुढे असे लिहितात की, "या बोधवचनाबाबत माझ्यावर चिखलफेक करतांना शाम मुडे, प्रकाश राठोड, दिगंबर राठोड यांच्यापर्यंत चिखलफेक करणे हे महामूर्खपणाचे लक्षण आहे यात शंका नाही. असा मूर्खपणा मनुवादी अवलादच करु शकते. माझ्या एकूण 35 पुस्तकात मी सर्वत्र मनुवादावर हल्ला केला आहे. शाम मुडे, प्रकाश राठोड व दिगंबर राठोड यांनी सुद्धा मनुवादावर सतत प्रहार केला आहे, करीत आहे व हेच या मनुवादी औलादीला पचत नसल्यामुळे आम्हा चौघांवर चिखलफेक केली आहे." 
  आता यांनी आमची औलादच काढलेली आहे. म्हणून यांना झोपडपट्टीची औलाद म्हणायचे का ? 
   या नादान अज्ञानी चांडाळ चौकडीला माझा साधा आणि सरळ प्रश्न आहे. " तुम्ही तुमच्या आयुष्याची चाळीस ते पंचेचाळीस वर्ष पुरोगामी, परिवर्तनवादीचे झुल पांघरुन मनुवाद्याना/ ब्राह्मणाना, हिंदू धर्माला शिवीगाळ करण्यात घालवलात. कधी याचा विचार केलात का, आम्ही चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपासून मनुवाद्याना/ब्राह्मणांना, हिंदू धर्माला जेवढ्या खालच्या पातळीवर जाऊन लिहिता येईल तेवढ्या पातळीवर जाऊन लिहित आहोत, त्यांच्या विरोधात नको नको ते घाणेरडे शब्द प्रयोग करुन मोठमोठी भाषणं ठोकत आहोत; त्यांना आम्ही शत्रु मानून त्यांच्या विरोधात समाजात घृणा, तिरस्कार, द्वेष पेरत आहोत, त्यामुळे या मनुवादी/ब्रह्माण किंवा हिंदू धर्म किती रसातळाला गेला ? त्यांच्या प्रगतीचा ग्राफ खाली गेला की वाढला ? जर तुमच्या लिखाणामुळे, विषारी भाषाणांमुळे त्यांची अधोगती न होता प्रगती झाली असेल, त्यांच्या उन्नतीचा आलेख वर वर चढत गेला असेत तर काय उपयोग झाला तुमच्या विखारी लिखाणाचा, विषारी भाषणांचा ? आणि तुमच्या जगण्याचा ?    
    तुम्ही मनुवादाला आणि ब्राह्मणांना शक्ती, बळ देण्याचे काम केले आहे असे म्हणणे गैर होणार नाही. मग खरे मनुवादी तुम्ही की आम्ही ? 
    तुम्ही जेवढी मदत मनुवाद्याला केली आहे, तेवढी कोणीही केली नसेल. हे कसे ? ते समजून घेऊ या.
   महाराष्ट्रातील एक नामवंत विचारवंत प्राचार्य नरहर कुरुंदकर म्हणायचे, आज ब्राह्मण समाज प्रगतीच्या ज्या उंचीवर आहे; त्याचे सर्व श्रेय आम्ही आमच्यावर टीका करणाऱ्यांना, आमच्या समाजाबद्दल पातळी सोडून लिहिणाऱ्यांना जाते. कांही जण यापुढे जाऊन म्हणतात की, आम्हाला शिवी देणाऱ्यांना आम्ही मार्गदर्शक मानले आणि झोपेत असलेला आमचा समाज खडबडून जागा झाला. प्रगतीची नवनवीन संधी आम्ही शोधल्या आणि आज नेत्रदीपक यशाच्या शिखरावर आम्ही आहोत. ज्या लोकांकडून अतिशय खालच्या पातळीवरील शिवी आम्हाला देण्यात येते ती प्रत्येक शिवी आमचा स्वाभिमान, आमचा आत्मसन्मान जागा करते. आणि आम्ही नवीन ऊर्जा घेऊन न थांबता पुढे चालतो. या देशात आम्हाला शिवी देणारे नसते तर आमचा समाज खुप रसातळाला गेला असता.
   गोबर बुद्धिनो, तुम्ही ज्यांना शिवीगाळ करण्यात तुमचे अनमोल आयुष्य चंदनासारखे झिजवले. ते किती तरी पुढे निघून गेले आहेत. आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या विकृत होऊन, आहे तेथेच आहात. मी ब्राह्मणाची बाजू घेत नसून आपण आपली शक्ती आणि वेळ कुठे खर्च करायला पाहिजे; जेणे करुन समाजाचे भले होईल हा मुद्दा मी येथे अधोरेखित करीत आहे.
   कशाला समाजाची शक्ती नको तेथे खर्च करण्यात घालवताय ! एखाद्या समाजाला, धर्माला शिवीगाळ करण्यात किंमती वेळ वाया घालण्यापेक्षा कांही विधायक काम करण्यात घातले तर वाईट काय आहे?
    आणि विशेष म्हणजे तुम्ही ज्या लोकांच्या नादी लागून तुमचे अनमोल आयुष्य वाया घालवताय; त्या समाजाला संविधानाचे मजबूत कवच आहे. तुम्हाला काय आहे ? बाबाजीका ठल्लु ! तुम्ही अनेकदा असे बरगळता की, घटनाकारांनी दिल्लीच्या एका तांड्यावर बसून घटना लिहिली आहे. कधी नव्हे तर नेहमीच तुम्ही असेही बरगळता की या देशाचे संविधान संत सेवालाल महाराज यांच्या विचारांवर लिहिले गेले आहे. गोबर बुद्धिनो, मला एक सांगा, संविधान तांड्यावर बसून लिहिले गेले असेल, संत श्री सेवालाल महाराज यांच्या विचारांवर संविधान लिहिले गेले असेल, तर मग संविधानकर्त्याला आमचा तांडा आणि तांड्यातील माणूस का दिसला नाही ? का आम्हाला संवैधानिक कवच मिळाले नाही ? याला जबाबदार मनुवादी की संविधान निर्माते? १८७१ च्या जन्मजात गुन्हेगार ठरवणाऱ्या जुलमी कायद्यातून मुक्त व्हायला आम्हाला स्वातंत्र्यानंतर पांच वर्षांहुन अधिक काळ का लागला? याला जबाबदार कोण ? मनुवादी की संविधान निर्माते?
   आम्हाला SC/ST सारखे मजबूत संवैधानिक कवच संविधान निर्मार्त्यांनी दिले असते तर, आज आम्हाला सामाजिक न्याय हक्कासाठी ५५-५५ मोर्चे काढावे लागले असते का ? मनुवादी-मनुवादी म्हणून किती दिवस समाजाला तुम्ही मूर्ख बनवणार आहात? कधी उघडणार आहात तुमची झापडं ?
 *तुम्ही बुद्ध मार्गी नसून बुद्धि गंजवणारे मार्गी आहात*
     तुम्ही म्हणता आम्ही बुद्ध मार्ग निवडलेला आहे. तुमचा हा निर्णय चांगला निर्णय आहे. अभिनंदन. पण बुद्ध मार्गाचे कांही नियम आहेत हे तुम्हाला माहितच असेल. जसे की, नियमित विपश्यना करणे, पंचशीलाचे पालन करणे, चार आर्य सत्य, अष्ठांगिक मार्ग समजून घेऊन तशी उपासना करणे. आणि स्वतःला सिद्ध करुन समाजासमोर एक आदर्श निर्माण करणे. हा मुळ उद्देश बुद्ध तत्वज्ञानाचे आहे. तुम्ही लोक वरवर चार गोष्टी वाचून बुद्ध मार्ग म्हणजे- "समाजासमाजात तेढ निर्माण करणे, इतर जाती धर्माला शिवीगाळ करणे, दुसऱ्या जाती धर्माबद्दल समाजात  तिरस्कार, घृणा, द्वेषभावना पेरणे म्हणजेच बुद्ध मार्ग आहे, हे तुमच्या आचरणावरुन, लिखणावरुन आणि भाषाणांवरुन दिसते." तुमच्यासारख्या विषारी लोकांनी एक नाही हजारो जन्म जरी घेतले तरीही तुम्हाला बुद्ध तत्वज्ञान समजणार नाही. फारफार तुम्ही पोपट होऊ शकता. आज तुम्ही पोपटाचेच काम करताय.
    भगवान बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन समाजात घृणा, तिरस्कार, द्वेष पेरणाऱ्यांनी आम्ही बुद्ध विचाराने जगतो म्हणणे म्हणजे, महाराष्ट्रातील हास्य जत्रेतील विनोदच म्हणावे लागेल.
    भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीही हिंदू धर्म किंवा ब्राह्मणाबद्दल अपशब्द काढलेले नाहीत. त्यांनी त्यांच्या सान्निध्यातील लोकांचे प्रबोधन केले. त्यांनी धर्माला किंवा जातीला शिवीगाळ केलेली नाही. तुम्ही भ्रमिष्ट लोक या महापुरुषांच्या विचारांच्या विरुद्ध वागुन समाजाच्या डोक्यात घृणा, तिरस्कार, द्वेषाचे विष सतत पेरुन समाजाला चुकीच्या दिशेने नेण्याचे पाप करीत आहात.
   मनुष्य जन्म चांगले कर्म करण्यासाठी मिळतो. 
    परम गुरु गबरूसिंग राठोड हे स्वतःच्या मुलाला सुधारु शकलेले नाहीत, ते समाजाला काय सुधारणार आहेत? 
   गबरूसिंग राठोड त्यांच्या पोस्ट मध्ये असे म्हणतात की, धम्म हा पूर्णत: निर्दोष, कल्याणकारी, मानवतावादी, समतावादी आहे. तर मग तुमच्या भाषेतील अमानवीय, विषमतावादी हिंदुधर्माच्या पद्धतीने मुलांमुलीचे लग्न का केले बरे? कारण तिकडे कोणीही विचारत नसावेत !
  *चिखलफेक कोणी केली ?*
     परम् वंदनीय, परम्  पूजनीय गबरूसिंग राठोड म्हणतात की आमच्यावर चिखलफेक केली. यामुळे ते मगरीचे अश्रु ढाळत आहेत. गरज नसतांना माझ्या व डॉ. अशोक पवारविरुद्ध अतिशय खालच्या पातळीवर लिहायला, बोलायला सुरुवात त्यांचा कुपत्र गुंड राजपालसिंग यांने केली. हेच आहेत का तुमचे संस्कार ? गबरूसिंग राठोड यांना आता का झोंबत आहे?
तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा आहे, मग आम्हाला नाही का?
 त्यांचा गुंड मुलगा कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता, जी गरळ ओकत होता ती अशी होती- "या दोघांची धिंड काढा, तोंडाला काळे फासा, त्यांना समाजात फिरू देऊ नका, या दोघांना कोणत्याही कार्यक्रमाला बोलावू नका. अशी चितावणीखोर भाषा वापरुन समाजात सातत्याने आमची अप्रतिष्ठा करायची मोहिम तो वेगवेगळ्या मंचावरुन राबवित होता. आणि लोकांमध्ये आमच्याबद्दल गैरसमज पसरवत होता तेंव्हा हे गबरूसिंग राठोड कुठे गोबर खात बसले होते? का ते मुग गिळून का बसले होते?"  चिखलफेक करणारा स्वतःच्या घरात असतांना आम्हाला दोष देऊन काय साध्य करायचे आहे?
 *गबरूसिंग राठोड यांनी मौन पाळले नसते मनं कलुषित झाली नसती*
 जो वाद निर्माण झाला होता, त्या वादाचे मुळ गबरूसिंग राठोड असतांना त्यांनी दीड महिन्यानंतर "जाणजो छाणजो आन पछच मानजो" हे वचन संत श्री सेवालाल महाराज यांचे नसून तथागत बुद्ध यांचे असल्याचे कबुल केले.  हाच खुलासा त्यांनी सुरुवातीलाच केला असता तर अकारण मनं कलुषित झाली नसती. आणि हा वादही एवढ्या टोकाला गेला नसता.   
   मला वाटते पिता पुत्राने असे ठरवले असावे की, धटिंगपणा करुन आमचा आवाज बंद करायचे ठरवले असावे. पण त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांची एवढी छी थूं होईल याची कल्पना त्यांनी केली नसावी. शेवटी रडत पडत आपली उरली सुरली इभ्रत वाचवण्यासाठी का असेना सत्य उगाळून मोकळे झाले आहेत. सुरुवातीला शहाणपण सुचले असते तर पिता पुत्राची समाजात एवढी नाचक्की झाली नसती. आणि हा वाद चिघळला नसता. यालाच म्हणतात 'विनाशकाले विपरित बुद्धि.'. तरीही 'जो हुवा अच्छा हुवा ।'
*अनुत्तरीत प्रश्न*
 मी बुद्ध धर्मीय आहे.   'जाणजो छाणजो आन पछच मानजो'  हे विचार बुद्ध भगवान यांचे असल्याचा कबुलनामा बुद्ध धर्मीय गबरूसिंग राठोड यांनी लेखी स्वरुपात समाज माध्यमातून दिलेला आहे. तरीही कांही प्रश्न अनुत्तरीत आहेत. 
ते प्रश्न पुढील प्रमाणे आहेत-
(१) 'जाणजो छाणजो' या मुद्यावरुन कोणताही सारासार विचार न करता, त्याची पूर्ण माहिती न घेता डॉ. अशोक पवार यांची सार्वजनिक कार्यक्रमात बेइज्जती करुन पुन्हा त्यांच्या विरोधात सोळा जणांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्या तक्रारदारांविरुद्ध  कोणती भूमिका घ्यायला हवी?
(२) राजपालसिंग राठोड याचा बाप सर्व पापाचा धनी असतांना यांने पातळी सोडून अतिशय खालच्या स्तरावर जाऊन अतिशय गलिच्छ भाषेत  आमच्यावर केलेल्या टीकेचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्याच्याविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी का?
(३) गबरूसिंग राठोड हे बुद्ध धर्मीय असतांना त्यांनी विज्ञानवादाच्या नावाखाली संत श्री सेवालाल महाराज यांच्या मुळ विचारांना बगल देऊन बुद्ध साहित्यातील विचार उचलून ते संत श्री सेवालाल महाराज यांचे विचार म्हणून समाजात पेरुन समाजाची दिशाभूल केलेली आहे. त्याबाबत समाजाने त्यांच्याविरुद्ध कोणती भूमिका घ्यावी ?
(४) नंगारा भवनमध्ये भगवान बुद्ध यांची बसवलेली मूर्ती आणि यांच्या विचारांचे आपल्या भाषेत भाषांतर करुन सदरील विचार हे संत श्री सेवालाल महाराज यांचे असल्याचे भासवून लावलेल्या पाट्यांबाबत कोणता निर्णय घ्यायला पाहिजे?
(भारतात मुस्लिम बंजारा, ख्रिश्चन बंजारा, शिख बंजारा, हिंदू बंजारा आहेत. प्रत्येक धर्मीयांनी ते ज्यांना मानतात त्यांची मूर्ती बसवण्याचा आग्रह उद्या धरला तर गुंतागुंत वाढेल. म्हणून समाजात तणाव वाढणार नाही असा निर्णय घेणे आवश्यक आहे की नाही? )
(५) गबरूसिंग राठोड, दिगंबर राठोड, डॉ. प्रकाश राठोड, डॉ. श्याम मुडे आणि इतर तत्सम मंडळी बुद्ध धर्मीय असतांना त्यांची हिंदू गोर बंजारा समुहात सतत होणारी ढवळाढवळ रोखण्यासाठी कोणती उपाययोजना करावी?
(६) खऱ्या युवकांना डावलून पन्नाशी ओलांडलेल्या राजपालसिंग राठोड यांना ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष बनवलेले आहे. याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. टी.सी. राठोड यांच्याकडे सुरुवातीलाच आक्षेप नोंदवूनही आजपर्यंत त्यांना त्या पदावरुन दूर केलेले नाही. ऑल इंडिया बंजारा सेवा संघ व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. टी.सी. राठोड यांच्या विरुद्ध कोणती भूमिका घ्यावी?
   वरील अनुत्तरीत प्रश्नांची योग्य उत्तरे समाजाने शोधली पाहिजेत.
  *विज्ञानवादीच्या नावाखाली होणारी भेसळ*  
'जाणजो छाणजो' हा विषय व्यक्तिगत नसून समाजाच्या अस्मितेचा आहे. विज्ञानवादीच्या नावाखाली संत श्री सेवालाल महाराज यांना क्रांतीकारी लेबल लावून त्यांचे संतत्व आणि लडीतील विचार नष्ट करणाऱ्यांचे कुटिल डाव आता उजागर झालेले आहेत. आता तरी समाजाने चांगल्या विचाराच्या नावाखाली फसगत करुन घेऊ नये. आपल्या संतांच्या तोंडी विज्ञानवादीच्या नावाखाली 'पर' विचारांची होणारी भेसळ कुठून होत आहे, याचा शोध घेऊन नंतरच ते स्विकारले जावे.
  शेवटी 'जाणजो छाणजो पछच मानजो' हे वचन कोणाचे आहे? याची स्पष्ट कबुली गबरूसिंग राठोड यांनी दिल्याबद्दल त्यांना विशेष धन्यवाद. पुन्हा अशी चुक कोणीही करु नये ही अपेक्षा.
दिनांक : ३१/३/२०२६
  *फुलसिंग जाधव*
  सामाजिक कार्यकर्ता
  छत्रपती संभाजीनगर
संपर्क : ८९९९०९८२६५
--------------------------

जाणजो छानजो लेख

*विरासत-ए-बणजारा सामाजिक,सांस्कृतिक व ऐतिहासिक राष्ट्रभक्तीचे केंद्र व्हावे-एक चिंतन!*

------------------------------------
प्राचार्य जयसिंग द. जाधव
____________________
*जाणजो, छाणजो पचच माणजो.*
           अशी अनेक तथागत गौतम बुद्धांची वचने संत सेवालाल महाराजांचे मुखी पेरण्याचे काम कांही बंजारा लेखक अनेक दिवसांपासून करत आहेत.धाटी शब्दाआडून आपला कोणताही धर्म नाही,असा विचार बंजारा समाजात रुजविण्यासाठी तथागत बुद्धांचे विचार संत सेवालाल महाराजांचे मुखी टाकुन पुस्तके लिहिण्याचे काम सुरू केले.वसंतराव नाईक यांचे कार्यावर शंका उत्पन्न करणारे लेखन केल्या गेले. लोक खाजगीत याबाबत चीड, संताप व्यक्त  करत होते, पण पुढे येत नव्हते त्यामुळे मिथ्या गोष्टी मांडण्याचे धारिष्ट्य त्यांच्यात येवु लागले.अखेर प्रा फुलसिंग जाधव यांनी सत्याला सिद्ध करण्यासाठी पाऊल उचलले,त्यांच्या सोबत महाराष्ट्र उभा राहिला.लेखनवॉर सुरू झाले.मते मतांतरे व्यक्त होत राहिली.असत्याचा चेहरा कालावंडला.माझ्या दस्ताऐवजावर हिंदु म्हणून नोंदी जरी असल्या तरी मी बालपणापासून धम्म जीवन जगत आलो आहे व पुस्तकात नोंदविलेले जाणजो, छाणजो पचच माणजो अशाप्रकारचे दहा सुक्त पाली भाषेतील तथागत बुद्धांची असल्याचे त्यांनी मान्य केले व लेखनवॉर प्रकरणाला अर्धविराम मिळाला. वास्तविकता तथागत बुद्धांची आदर्श सूक्ते जीवनकल्याणाची आहेत,यात वेगळे मत असल्याचे कारण नाही. चौर्यकर्म करुन तथागत बुद्धांची सूक्ते संत सेवालाल महाराजांचे मुखी लडी वचन म्हणून स्थापित करणे ही वाटते तशी साधी सरळ गोष्ट नाही, त्यामागे धर्मांतराचा विचार पेरण्याचा कावेबाजपणा असल्याचे आज लोक बोलु लागले आहेत.
सामान्यांचे प्रश्न, विकास, आरक्षण इत्यादी बाबींचे संरक्षण करण्यासाठी लोकशाही व्यवस्था देशात निर्माण केल्या गेली व त्यांना संविधानाचे कवच दिल्या गेले आहे. ही सार्वभौम प्रजासत्ताकाची बांधणी आहे. जर संविधान हाच राष्ट्रधर्म असल्याचे मान्य केले तर धर्मस्वातंत्र्य संविधानानेच बहाल केले आहे, धर्म व्यक्तिस्वातंत्र्य आहे.भारतात हिंदु, मुस्लिम, शिख,इसाई,जैन, बौद्ध व ख्रिश्चन धर्माचे लोक राहतात. अनेक भाषा, अनेक संस्कृती, वेगवेगळ्या श्रध्दा हेच भारताचे अभेद्य बलस्थान आहे.वारकरी संप्रदाय हा हिंदु धर्माचा भाग आहे. पंढरीचा पांडुरंग व संत सेवालाल महाराज पूर्वाश्रमीचे कर्नाटकचे आहेत. पंढरपूरात भागवत धर्माची पताका फडकली. पोहरादेवीला संत सेवालाल महाराजांनी नगारा भजनाच्या माध्यमातून बंजारा समाजाचे अस्तित्व अबाधित ठेवले. दोघांमध्ये कलखंडाचाच काय तो फरक. भागवत पुराण मध्ये बंजारा तांडा माल लादकर घुमता रहता है!असा उल्लेख श्रीमद भागवत मध्ये आहे.
धबुकार,भोग ही बंजारा समाजातील अग्निपूजा  कौटुंबिक व सार्वजनिक संक्षिप्त यज्ञेच आहेत.मनु,आर एस एस, भाजप असे राजकीय प्रश्न उपस्थित करुन समाजमन विचलित व कलुषित करण्याचा प्रयत्न कांही लेखक करतांना दिसतात,विषय व मुळमुद्दा भरकटविण्याचा हा प्रकार असल्याचे दिसते.जन्म ते मृत्युच्या मधिल काळास आपण आयुष्य संबोधतो. बंजारा समाजात आयुष्य काळात अनेक विधिसंस्कार केले जातात. मृत्यूनंतरचा अंत्यसंस्कार विधी कर्मकांड ठरत असेल तर मृत देह फेकुन दिल्याने पशुपक्ष्यांच्या कामी येईल असे आपणास सुचवायचे आहे का?
बंजारा तांड्याची रचना,सामाजिक व सांस्कृतिक वैभवाला कांही मापदंड आहेत, हीच आपली प्राचीन व आदिम लक्षणे सिद्ध करणारी ठळक वैशिष्ट्ये आहेत.सांस्कृतिक वैभवावर आघात होत राहिले तर आपले सामाजिक,सांस्कृतिक अस्तित्वही धोक्यात येण्यास वेळ लागणार नाही.नदी तलावास मिळते म्हणजे काय होते तर तलावाची जलपातळी वाढते व नदीचे अस्तित्व संपते.असाच बाह्यविचारांचा  परिणाम आपल्या मूलभूत घटकांवर होतो. अस्तित्व संपुष्टात येते. संत तुकाराम महाराजांच्या अभंगात विठ्ठलाच्या बौद्ध अवताराचा उल्लेख सापडतो पण चंद्रभागेच्या वाळवंटात वारकरी संप्रदायाची पताका फडकतांना दिसते, हे वास्तव मान्य करता आले पाहिजे. संत सेवालाल महाराज यांच्या भजन परंपरेने बंजारा समाजाचे अस्तित्व टिकुन राहिले आहे.गराशागड देऊळगाव साकरशा येथे महाराजांचे काहीकाळ वास्तव्य होते, तेथे आश्रमशाळा परिसरातील पाण्याचा जलस्त्रोत व देवीची स्थापना केली आहे,इतर समाज बांधव या स्थळाला इसाईची टेकडी म्हणून संबोधतात,सराळा ता मेहकर येथे बंजारा समाजाचे एकही घर नाही तरी त्यांच्यावर श्रध्दा ठेवणारा अन्य समाजवर्ग मोठ्यासंख्येने आहेत,चौथऱ्यावर भक्तिभावाने संत सेवालाल महाराजांची पूजा करतात. बुलडाणा चिखली रोडवरील देवीची स्थापना महाराजांनी केली असल्याचे सांगितले जाते.लखिशा बंजारा यांच्या कार्याचा गौरव पंतप्रधान त्यांचे भाषणांतून करतात याचाच अर्थ देशाच्या विकासात बंजारा समाजाचे योगदान अधोरेखित होते. योद्धा लखिशा बंजारा यांच्या मुळे आपण राजधानी दिल्लीशी नाते सांगु शकलो. माजी मुख्यमंत्री व खासदार महानायक वसंतराव नाईक यांच्यामुळे विकासाच्या दोन पायऱ्या चढु शकलो,दुर्लक्षित बंजाराला नाईक ही सामाजिक प्रतिष्ठा मिळाली.अशा महान विभूतीच्या प्रतिमा पायदळी तुडवून आपण वैचारिक मोडतोड करुन इतिहास लिहीत असु तर आपण अनोळखी प्रांताच्या दिगंत प्रवासाला आपल्या बंजारा बांधवांना घेवून त्यांचा कडेलोट करत आहोत असे वाटते.नगारा म्युझियम बंजारा स्वाभिमान असलेल्या ताठ कण्याच्या धरोहर भूमीने आपल्या लेकरांना  जाज्वल्य पराक्रमाचा,बंजारा समाजाच्या व्यापारिक दातृत्वाचा,देशसेवेचा परिचय येणाऱ्या अगणित पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल अशी खंबीर भूमिका बजवावी लागणार असल्याने नगारा म्युझियम या वारसा स्थापत्य कलेला सांस्कृतिक मूल्याधिष्ठित अधिष्ठान देणे ही बंजारा समाजाची आर्त हाक आहे.

*अंजामे गुलिस्ता क्या होगा..*

------------------------------------
9923482062
------------------------------------

World Banjara Day

Mr. D. Rama Naik took the historic initiative to organize "World Roma-Banjara Day" in India. Compiled by-  Dr. Dinesh Sewa...