*वाढदिवस विशेष लेख*
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐
आदरणीय भिमणीपुत्र मोहन गणुजी नाईकसाहेब यांचा आज वाढदिवस.
*मला भेटलेला पहिला लेखक--मा.भिमणीपुत्र मोहन नाईकसाहेब*
------------------------------------------------------------
*✍️याडीकार पंजाब चव्हाण,पुसद 95 52 30 27 97*
===============================
कवी सुरेश राठोड च्या या दोन ओळी
*भिमणीपुत्र ज्यांचे नाव*
*साहित्यक्षेत्राचे गांव*
*प्रणाम घ्यावा रावं*
*विचार पुत्राचा!!*
माझे असे नशीब बलवत्तर की माझ्या लेखनाच्या सुरुवातीलाच मला गोर बंजारा समाजातील काही लेखक भेटले. ज्यांनी पहिल्या भेटीतच मला साहित्याची ओळख करून दिली. मित्र मानले. त्यापैकी एक म्हणजे *माननीय भिमणीपुत्र मोहन नाईकसाहेब* तसे ते मला भेटलेले पहिले आंतरराष्ट्रीय गोर विचारवंत, प्रसिद्ध साहित्यिक, लेखक ,कवी मनाचे ज्यांच्या मुळे माझे लेखन सुरू झाले. ते पुढे माझे लेखन गुरू झाले आहे.
मी भंडारा जिल्ह्यातून पुसदला 1994 मध्ये बदलून आलो. माननीय शंकरराव राठोड साहेब बामसेफ कार्यकर्त्यै सोबत महाराष्ट्र बंजारा कर्मचारी सेवा संस्थेमध्ये यवतमाळ जिल्हा सचिव म्हणून काम करू लागलो .वाचनाची आवड होतीच. वाचता-वाचता लेखनाची आवड निर्माण झाली .
आणि *महानायक वसंतराव नाईक साहेब यांच्यावर पहिला लेख लिहिला तशातच *गोरबंजारा साहित्य संमेलनाचा विडा उमरखेडचे देवीदास मुडे काका यांनी उचलला होता* .
या संमेलनाची मूळ कल्पना माननीय भिमणीपुत्र मोहन नाईकसाहेबांची होती. भिमणीपुत्र
मोहन नाईक साहेबच या संमेलनाचे दिग्दर्शक,डायरेक्टर होते. उमरखेडला सदर साहित्य संमेलनाचे सभेसाठी गेलो असता. माननीय भिमणीपुत्र मा. देवीदास मुडे काकाच्यां घरी हजर होते. मी त्यांचे चरणस्पर्श 🙏🙏केले. आताही कोणीही वरिष्ठ मला दिसले की मी त्यांचे चरण स्पर्श करतो. ही सवय माझ्या वडिलांनी मला लावून दिली होती. चरणस्पर्श झाल्यानंतर माझी ओळख देविदास मुडे काका,आणि माझे मोठे बंधु नथू गोपा चव्हाण यांनी करून दिली .
भिमणीपुत्र मोहन नाईकसाहेब यांनी माजी आस्थेने चौकशी केली .थोड्याच वेळात त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे जवळकीचे नाते जुळले .मी त्यावेळी छोटे-छोटे लेख लिहित होतो .त्यात अनुकरणाचा भाग होता. पण सातत्य नव्हते .माननीय भिमणीपुत्र मोहन नाईक साहेबांनी माझ्याशी चर्चा केल्यावर त्यांना माझ्यात एक साहित्यिक दडून बसला आहे. असे कदाचित जाणीव झाल्यामुळेच त्यांनी होऊ घातलेल्या उमरखेड येथील पहिले गोरबंजारा साहित्य संमेलनात रीतीरिवाजाप्रमाणे पुस्तक प्रकाशन करण्यासाठी पंजाब ने एक पुस्तक लिहावे अशी सभेत घोषणा केली .मी एकदमच घाबरलो. मला काहीच सुचत नव्हते .शेवटी हा.. हुं! करून मी होकार दिला. आणि विषय निवडला माझ्या जीवनात मला उंच शिखरापर्यंत नेणाऱ्या माझ्या सुंदल याडी विषयी लिहिण्याचे ठरले. असे लिहिण्यासाठी अजून पर्यंत तरी कोणी मला सांगितले नव्हते. मला नवी उभारी देणारा तो अनुभव होता. या आत्मकथनाने माझी ओळख भारतात सर्व दूर होईल याची कल्पना त्या वेळी मला आली नव्हती. पण माननीय भिमणीपुत्र मोहन नाईकसाहेबांना कदाचित ती आली असेल ? मी उमरखेड वरून निघताना आनंदित होतो .पुढे मला कळले की नवीन लेखकांना मार्गदर्शन करण्याचा त्यांना लेखनासाठी प्रोत्साहन देण्याचा माननीय भिमणीपुत्र मोहन नाईक साहेबांचा स्थायीभाव होता .त्यांच्याकडे येणाऱ्या अनेक नवलेखकांना त्यांनी मदत केली होती. एवढेच नाही तर केवळ कोणतेही लिखाण करून चालत नाही .तर समाज परिवर्तनाचे लिखाण करून समाज सुधारण्याचे प्रयत्न प्रत्येक लेखकाने आपल्या लेखणीतून करावे असे त्यांचे ठाम मत
होते . पाठीवरून मायेचा हात फिरवून त्यांना माझ्या लेखनास मार्गदर्शन केले होते. त्यानंतर अनेक मित्राकडून त्यांच्या विषयी खूप माहिती मिळाली. आणि त्यातून त्यांच्या बद्दल एक विशेष आकर्षण वाढत गेले .त्यांचे माहूर तालुक्यातील चिंचखेड हे गाव .
शालेय जीवनापासूनच त्यांनी लेखनास सुरुवात केली होती .त्यांच्या वैचारिक लिखाण हे साहित्य क्षेत्रातच नव्हे तर मराठी साहित्य क्षेत्रात धुमाकूळ घालत होते .एवढेच नव्हे तर नसाबी (अंक) या लेखनाचे परिवर्तनवादी साहित्यिक यांनी तोंडभरून कौतुक केले .त्यानंतर त्यांचा गोरमाटी संस्कृती आणि संकेत चे प्रकाशन झाले म्हणून कवी सुरेश लिहतात.
*म्हणुन गोरगणाची संस्कृती*
*हीच खरी आदिम संस्कृती*
*उदाहरण सुकल्लडी चे वरती*
*कथीले भिमणीपुत्राने !!*
नंतर नाईकसाहेब कविता कडे वळले त्यांनी केसुला नावाचा मराठी कविता संग्रह काढला. तेही खूपच गाजले. त्यानंतर त्यांचा तुकारी( सांस्कृतिक सेतू )आणि क्रांतिसिंह सेवादास तोडावाळो सन 2012 मध्ये प्रकाशित झाले. क्रांतिसिंह सेवादास तोडावाळो लिखाणाबाबत काही ठिकाणी जुजबी वाद झाले. पण थोड्याच दिवसात ते निवळले.
क्रांतिसिंह सेवादास तोडावाळो लिहिण्यामागचा हेतू हाच की गोर समाजाचा इतिहास तमाम गोरबंजारा समाजाला माहीत व्हावा तेवढेच.?
*बापू भिमणीपुत्राचा सायास* *वाचण्याचा करावा प्रवास*
*क्रांतिसिंह तोडावाळो खास*
*अर्जी कवी सुरेश !!*
सन 2017 मध्ये मारोणी पुस्तक प्रकाशित झाले
*मारोणी हि गोरबोली शब्द*
*सखि या अर्थानेच सिद्ध*
*गोरगणातआहे प्रसिद्ध*
*मोखिक साहित्यात !!*
आणि गोरपान हे पुस्तक प्रकाशित झाले विशेष बाब अशी की
*गोरपानचे इंग्रजी रुपांतर आंतरराष्ट्रीय इंग्रजी समीक्षक प्राध्यापक डॉक्टर दिनेश सेवा राठोड मलकापूर यांनी करून आंतरराष्ट्रीय स्तरावर हे पुस्तक पोचून एक नवी क्रांती केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणारे हे गोर बंजारा समाजातील प्रथम पुस्तक आहे* त्याबद्दल प्राध्यापक दिनेश सेवा राठोड यांचे मनःपूर्वक अभिनंदन 👍👍.
*मने दिनेश बापूंचं खरे शिलेदार* *गोरगणला दिला त्यांनी आधार*
*लेखन केले खास बहारदार*
*गोरपानाचे!!*
*म्हणूनच प्राध्यापक दिनेश म्हणतो त्यांना गडकरी*
*लिओ टाल स्टॉय ,गारगी ते काय करी*
* *विलियम्स शेक्सपियर ची उपमा भारी*
*शोभे बापू भिमणीपुत्रला !!*
प्रचंड लिखाण सुरु असतानाच माननीय भिमणीपुत्र मोहन नाईक साहेब आजारी पडले. त्या आजारामधुन सहीसलामत बाहेर आल्यानंतर पुन्हा लिखाणाकडे वळले .प्रा. रवींद्र. बी. राठोड यांनी संपादन केलेला भिमणीपुत्र लिखित वाते मूंगा मोलरी हा मार्च 2018 मधील पुस्तकाने प्रचंड गाजावाजा केला .
*प्राध्यापक रवींद्र राठोड*
*माणूस फार गोड*
*पत्र लिहिला आजोड*
*बापू भिमणीपुत्रास!!*
*प्राध्यापक माणिक राठोड यांच्या मते*
*काका भिमणीपुत्र भाग्यविधाते* *पुतण्याचेही आहे अतूट नाते*
*गोर कुळीला उद्धरण्या*
चांदा जपजोर, चांदापरेर डोकरीर साकी , सुकल्लडी, मेलिया गोर याडी रो ढावलो हे आणि इतर प्रकरण प्रचंड गाजले. त्यानंतर सन 2020 मध्ये लावण पिवशी, गोरबंजाराचे प्रतिभावंत कवी सुरेश राठोड काटोल यांचे काव्यरूपी गेय संवाद आणि एडवोकेट चेतनकुमार नायक यांनी संपादित केलेला वाते मूंगा मोलरी चे प्रकाशन झाले. असे तीन पुस्तकाचे एकाच वेळी ऑनलाइन प्रकाशन सोहळा पार पडला .वाते मुंगा मोलरी यामुळे साहित्य क्षेत्रात खळबळ उडाली. लावाण पिवशी आणि गेय संवाद या पुस्तकावर मला समीक्षा करण्याची संधी मिळाली .खरंतर मी भिमणीपुत्र मोहन नाईकसाहेब यांचा चेला त्यांच्या पुस्तकावर समीक्षा करण्याची माझी पातळी नव्हती. पण माननीय नाईकसाहेबांनी मला समीक्षा करण्यास भाग पाडले. आणि सदर समीक्षेचे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रचंड स्वागत झाले .त्यामुळे माझी समीक्षक म्हणून आज दुसरी ओळख निर्माण झालेली आहे .त्याचे सर्व श्रेय आदरणीय भिमणीपुत्र नाईकसाहेबांना जाते.
दलित साहित्याचा प्रारंभीच्या काळात अनेक चर्चांमध्ये भाग घेऊन लिहून दलित साहित्य व साहित्यिक यांची नाईक साहेबांनी पाठराखण केली. त्यासाठी त्यांची पुरोगामी विचारांची बैठक कामी आली. दलित साहित्यात नवनवीन लेखक जसे उदयाला आले. तसेच गोरबंजारा साहित्यात नवनवीन लेखक उदयाला यायला पाहिजे. ही धडपड नाईकसाहेबांची होती. आज महाराष्ट्रात दीडशेच्या वर गोर साहित्यात लेखक कवी साहित्यिक लिहित आहे ही आदरणीय भिमणीपुत्र मोहन नाईकसाहेबांची देणं आहे.
*धन्य धन्य बापू भीमणीपुत्र*
*अनेक असती मानसपुत्र*
*शाहीन ताई मानसकन्या मात्र*
*सांगे विचारपुत्र*
उमरखेड येथील साहित्य क्षेत्रात आम्ही सोबत जोडलो. त्यानंतर अधून मधून भेटीगाठी व्हायच्या. त्यामुळे लेखण साहित्या बाबत चर्चा व्हायची. प्राध्यापक मोतीराज मामा, माननीय प्राचार्य ग. ह. राठोड सरांच्या सोबत चिंचखेड येथे भेटी झालेल्यां आहेत. माननीय भिमणीपुत्र मोहन नाईकसाहेब यांनी याडी पुस्तकानंतर मला थेट मार्गदर्शन केले नाही. परंतु त्यांचे सुक्षम लक्ष माझ्या लिखाणावर असायचे भेटल्यावर बोलायचे. चर्चा व्हायच्या. माझ्या पहिल्या याडी पुस्तकासाठी त्यांचे मोलांचे सहकार्य लाभले. त्यांच्यामुळेच हे पुस्तक बाहेर आले. त्यांनी सुंदर अशी प्रस्तावना या पुस्तकाला लिहिलेली आहे .उमरखेड च्या सन 2003 च्या पहिले गोरबंजारा साहित्य संमेलनांमध्ये याडीचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. कारण ते त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात माझ्या याडी पुस्तकावर भरभरून बोलले आणि भाषणाच्या शेवटी त्यांनी घोषणा केली *यानंतर पंजाब चव्हाण यांचे नाव केवळ पंजाब चव्हाण असणार नाही तर याडीकार पंजाब चव्हाण अशी ओळख राहील असे जाहीर करताच सभागृहात टाळ्यांचा प्रचंड गडगडाट झाला* मला स्टेजवर बोलावून माझे नामकरण *याडीकार* म्हणून केले *आज महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात *याडीकार म्हणून जी माझी ओळख आहे ते केवळ माननीय भिमणीपुत्र मोहन नाईकसाहेबांमुळे* आधी नाईक साहेबांची ओळख *नसाबीकार* म्हणून होती. त्यानंतर नाईकसाहेब राष्ट्रीय बंजारा परिषद महा संमेलनाचे सन 2011 मध्ये अध्यक्ष होते. पाचवे अखिल भारतीय गोरबंजारा साहित्य संमेलन डोंबिवलीचे ते संमेलनाध्यक्ष झाले .आजही त्यांची तब्येत बरोबर नसतांनाही ते अनवाल आणि काकडवादां या सदरातुन रोज सकाळी वाचकांना भेटतात .*गोरबोलीला राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्यांचे फार पूर्वीपासून प्रयत्न सुरू आहे .त्या पद्धतीने त्यांचे लिखाण आणि त्यांचा पत्रव्यवहार आजही सुरू आहे*
म्हणून कवी सुरेश राठोड आपल्या गेय संवाद मध्यें लिहितात.
*भिमणीपुत्रा सारिखे वरं*
*लाभो गोरकुळीला फारं*
*तेव्हाच होईल उद्धारं*
*गोरबोलीचा!!*
त्यांचे आगामी आत्मकथन कडपो लवकरच साहित्यक्षेत्रात यावे .आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी सेवा बापू चरणी 🙏🙏प्रार्थना करतो आणि थांबतो !!
*या लेखात आलेल्या सर्व कवीता या प्रतिभावंत कवी सुरेश राठोड कटोल-सिंगद यांच्या गेय संवाद पुस्तकतील आहेत*
आंतरराष्ट्रीय लेखकाची ओळख सर्वदूर होण्यासाठी आपण सदर पोस्ट जास्तीत जास्त लोकांना फारवड कराल अशी अपेक्षा करतो🙏🙏 !!
*जय सेवा ...🙏.जय वसंत ..🙏🙏..जय संविधान !!*
*एक गोर....नेक गोर*
*✍️याडीकार पंजाब चव्हाण पुसद* *मोबाईल नंबर 94 21 77 43 72*
No comments:
Post a Comment
Jada jankari ke liye comment kare.