Tuesday, July 23, 2019

ज्या समाजात आपण जन्माला आलो तो समाज विकासासाठी एकसंध बनला पाहिजे. समाजातल्या समाजसेवकांचे जाळे सर्वत्र निर्माण झाल्याशिवाय समाजात चैतन्य व गतिमानता येणार नाही. - वसंतरावजी नाईक मा. मुख्यमंत्री ( महाराष्ट्र राज्य )

  ज्या समाजात आपण जन्माला आलो  तो समाज विकासासाठी एकसंध बनला पाहिजे.

समाजातल्या समाजसेवकांचे जाळे सर्वत्र निर्माण झाल्याशिवाय समाजात चैतन्य व गतिमानता येणार नाही. 

   - वसंतरावजी नाईक मा. मुख्यमंत्री   ( महाराष्ट्र राज्य )

          जीवन व्यक्तीचे असो की राष्ट्राचे असो त्यात संकटे ही येणारच . पण संकटकाळी आपण कसे वागतो आणि संकटाशी सामना कशा प्रकारे करतो यावरून व्यक्तीचे किंवा देशाचे मोठेपण ठरत असते. व्यक्तीचे मोठेपण स्वतःच्या कर्तृत्वावरून ठरते तर देशाचे मोठेपण देशातील सर्वांच्या कर्तृत्वावरुन , कामगिरीवरून ठरते. देशातील व्यक्तीचे हे कर्तृत्व जागविण्यासाठी आणि कार्याला विधायक वळण देण्यासाठी निरनिराळ्या स्तरांवर काम करणा-या सेवाभावी संस्थांची आवश्यकता असते . देशावर जेव्हा संकट येते तेव्हा या संस्थांकडून विशेष कार्याची अपेक्षा केली जाते. १९७१ मध्ये या देशावर पाकिस्तानने आक्रमण केले तेव्हा भरीव कार्याच्या दृष्टीने राज्यातील आणि विशेषतः मुंबईतील भगिनींच्या संस्थांत सहकार्य निर्माण कारावे असे वाटले . आणि त्या दिशेने प्रयत्न केल्यावर आपल्याला दिसून आले की , अनेक महिला संस्थांनी पुढे येऊन कामांची मागणी केली. कमी वेळात जास्त काम करून दाखविले आणि तेही उत्तम प्रकारे त्यांना अजून पुष्कळ काम करण्याची इच्छा राहून गेली. अनेक लोकांना वाटले की , ' अजून चार दिवस युद्ध चालले असते तर अधिक कर्तृत्व दाखविता आले असते. हे खरोखर जिवंत राष्ट्राचे प्रतीक आहे. आपली सर्व शक्ती पणास लावून आलेल्या संकटावर मात करण्याची जिद्द ज्या समाजात किंवा राष्ट्रात असते तो समाज किंवा राष्ट्र कधीही पराभूत होत नाही.    जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकटे आलीत तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेने आत्मविश्वासाने आणि जिद्दीने संकटाशी मुकाबला केला. संकटांवर मात करून विजय मिळविला. कोयना येथे झालेल्या भूकंपामुळे १, ४०० गावांमध्ये ७० , ००० घरे पडली . ६०, ००० घरे नादरूस्त झाली . परंत महाराष्ट्राच्या आम जनतेने सर्व शक्ती एकवटून चार महिन्यांत ७० ००० हजार घरे बांधून दिली . महापूर येतात तेव्हा शेकडो गावांना जबरदस्त धक्का बसतो . हजारो घरे वाहून जातात. लाखो, करोडो रुपयांची संपत्ती नष्ट होते. त्यावेळी आपण पाहिले की , महाराष्ट्राच्या जनतेने त्या परिस्थितीशी  मोठ्या धैर्याने मुकाबला केला. १९६२ , १९६५ आणि १९७१ मध्ये जेव्हा या देशावर आक्रमणे झालीत तेव्हा महाराष्ट्राने सिंहाचा वाट उचलला. राष्ट्रीय संरक्षण निधीत कोणत्याही राज्यांपेक्षा महाराष्टाने अधिक निधी दिला. १९६५ मध्ये लालबहादूर शास्त्री मला म्हणाले की , ' लढाईकरिता आवश्यक असणाऱ्या  या वस्तू आणण्याकरिता आपल्याजवळ परकीय चलन नाही. म्हणून तुम्ही सोने द्या तेही फुकट ! आणि मला हे सांगताना अभिमान वाटतो की , सबंध देशातून जेवढे सोने जमले नाही त्यापेक्षा जास्त सोने महाराष्ट्राच्या जनतेने दिले ! संबंध देश एका बाजूला आणि महाराष्ट्र एका बाजूला ! ज्यावेळी देशावर आक्रमण झाले तेव्हा अल्पबचत योजनेत जास्तीत जास्त निधी गोळा करण्याचे धोरण शासनाने ठरविले. आणि ज्या महाराष्ट्रात दर वर्षी ३१ कोटी रुपये जमण्याची शक्यता असते तेथील जनतेने ६८ कोटी रुपये गुंतविले . महाराष्ट्रातील जनता कोणत्याही कामात किती अग्रेसर असते , किती मोठा हिस्सा उचलू शकते हे यावरून दिसून येते . मूलतःच महाराष्ट्रातील जनतेत देशभक्तेची भावना प्रखर आहे. परंतु या भावनाना वाव देणे आवश्यक असते. ते काम समाजातील निरनिराळ्या संस्था करतात . संकटकाळी विशेष रीतीने करतात. महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये भगिनींच्या अशा अनेक संस्था आहेत की ज्या उत्तम कार्य करतात , अशा या संस्थांत परस्पर सहकार्य व एकसूत्रीपणा आणण्याचे कार्य तुमच्या समितीने केले ही आनंदाची गोष्ट आहे .    संस्थेचे मोठेपण आणि संस्थेची उपयुक्तता संस्थेच्या निधी जमविण्याच्या क्षमतेवर अवलंबून नसते . तुमच्या संस्थेने पैसा कमी जमविला या भावनेने मी हे सांगतो आहे. असे नाही . तुमच्याकडे भरपूर पैसा आला , माझ्याकडेही आला , आणि तो केंद्रसरकारकडेही गेला . पण तुमच्याकडे जो पैसा आला त्यात गरिबांचा पैसा आला , सामान्यांचा पैसा आला. त्यांनी दिलेल्या एकेका पैशाची किंमत फार मोठी आहे . ज्यांच्याकडून तुम्हाला पैसे मिळाले त्यात काही असे आहेत की, ज्यांनी स्वतःजवळ एकही पैसा न ठेवता सर्व पैसे या निधीसाठी अर्पण केले. काही असे आहेत की, ज्यांनी उपाशी राहून जेवणाचे पैसे दिले . काहींनी स्वतःजवळचे सर्व पैसे तर दिलेच पण ते कमी वाटले म्हणून कर्ज काढून दिले . काहींनी अधिक वेळ कष्ट करून पैसे दिले . भिक्षेपोटी जमविलेले पैसे दिले . त्यांनी दिलेली ही देणगी अनमोल आहे. त्यांनी दिलेल्या राईएवढ्या निधीतून देशासाठी पर्वताएवढा त्याग करण्याची भावना व्यक्त झालेली आहे. देशावरील निष्ठा व्यक्त झालेली आहे. देशावरून स्वतःचे प्राण ओवाळून टाकणारे देशप्रेम व्यक्त झाले आहे. या समितीच्या रूपाने त्यांना आपली भावना व्यक्त करण्यास एक स्थान मिळाले. त्यांच्यात उसळणा-या देशप्रेमाच्या ऊर्मीना वाट करून देण्यास मार्ग मिळाला. किंचित प्रमाणात का होईना देशासाठी काही केल्याचे समाधान मिळाले. त्यामुळे गरिबांच्या , सर्वसामान्यांच्या मनात या संस्थेबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली. या संस्थेच्या माध्यमांतून काही कार्य करण्याची प्रेरणा निर्माण झाली .       जनसामान्यांत ही जागृती निर्माण करण्याचे या संस्थेने केलेले कार्य लाखमोलाचे आहे असे मला वाटते . जेव्हा अनेक लहान माणसे एकत्र येऊन जिद्दीने काम करतात तेव्हा ती मोठ्या माणसापेक्षा मोठे काम करू शकतात. सामाजिक एकसंध भावनेचे हे प्रतिक आहे.ज्या समाजात आपण जन्माला आलो, तो एकसंध कसा बनेल याला प्राधान्य दिले तरच तो समाज प्रगतीच्या दिशेने अग्रभागी राहिल. आज महिला समितीने गरिबांकडून छोट्या छोट्या रकमा एकत्र करून दहा लाखांहून अधिक निधी जमविली आहे . युद्ध संपले आपले कार्य संपले असे नाही . खरे म्हणजे शांततेच्या काळातच देश बलवान बनविण्याचे कार्य आपणांस करावयाचे असते . येत्या काही वर्षांत हा देश आपण असा बलवान केला पाहिजे की , या देशाकडे वक्र दृष्टीने पाहण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही . खूप लढाऊ विमाने , रणगाडे , बाँब किंवा इतर युद्धसाहित्य निर्माण केल्याने देश बलवान बनत नाही . देशात खूप कारखाने काढले , धरणे बांधलीत , खूप अन्नधान्य पिकविले . गगनचुंबबी इमारती बांधल्या , विजेचा सर्वदूर लखलखाट केला तरीही देश बलवान बनत नाही. तर देशाचे बळ देशात राहणा-या लोकांच्या ज्ञानावर , त्यांच्या चारित्र्यावर व कर्तृत्वावर व देशासाठी सर्वस्व ओवाळून टाकण्याच्या वृत्तीवर अवलंबून असते . येणा-या नवीन पिढीत जेवढ्या अधिक प्रमाणात हे सदगुण असतात तेवढ्याच अधिक प्रमाणात देश  बलवान बनत असतो. त्याचे सामर्थ्य हे त्याची समृद्धी वाढत असते आणि नवीन पिढी घडविण्याचे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य वयाच मोठ्या अंशाने महिलांवर अवलंबून आहे. जिजाबाईने ज्याप्रमाणे महाराष्ट्राला आणि या देशाला ललामभूत ठरणा - या सर्वगुणसंपन्न छत्रपती शिवाजींना घडविले त्याप्रमाणे प्रत्येक महिलेने कर्तृत्ववान व देशभक्ती पिढी घडविण्याचे महत्त्वाचे कार्य केले पाहिजे. मी आपणांस सांगू इच्छितो की, घरातील माणूस शिकतो तेव्हा घरात तो एकटाच शिकलेला असतो. पण घरातील स्त्री शिकलेली असते तेव्हा सारे घर शिकते , संस्कारक्षम बनते . त्यासाठी महिलांनी शिकले पाहिजे , मुलींना शिक्षणासाठी प्रवृत्त केले पाहिजे. इतर वाचनाने ज्ञान वाढविले पाहिजे . स्त्रीशिक्षणाचा सर्वत्र वेगाने प्रचार आणि प्रसार केला पाहिजे.  आज विद्यार्थी शिक्षण घेऊन तयार झाला की, त्याला श्रम करण्याची लाज वाटते.  शेतीत काम करणे कमीपणाचे वाटते. ही भावना बदलवून श्रमाबद्दल प्रेम, श्रमिकाबद्दल आपुलकी नवीन पिढीत निर्माण झाला पाहिजे. त्याला आपल्या शेजा - याबद्दल , समाजाबद्दल , समाजात जे मागासलेले असतील त्यांच्याबद्दल आपल्याला आपुलकी वाटली पाहिजे. स्वतःचे व देशाचे आपण शिल्पकार आहोत ही भावना त्यांच्यात रुजविली पाहिजे. त्यांच्यात विधायक कार्याबद्दल आस्था निर्माण केली पाहिजे .    युद्ध संपले म्हणून आपण गाफील राहिलो तर ते योग्य होणार नाही . आता  कदाचित काही वस्तुंची टंचाई निर्माण होईल . युद्धामुळे आपल्या साधनसंपत्तीवर जो अतिरिक्त ताण पडला त्याचीही झळ कदाचित काही दिवस आपल्याला लागेल. कारण युद्धाची खरी झळ युद्ध संपल्यावरच लागत असते. तेव्हा युद्ध जिंकल्याचा आनंद मानतानाच युद्धानंतर निर्माण होणा-या परिस्थितीला तोंड देण्याकरिता आपण तयार राहिले पाहिजे . यापुढेही वस्तूंचा संग्रह करणे, अन्न व इतर वस्तूंची उधळपट्टी करणे या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. या संस्थेचे काम अजून संपलेले नाही. स्त्री - संस्थांना समाजसेवेची गोडी लावणे, त्यांना नवीन नवीन कामे करण्यास प्रोत्साहित करणे, आणि त्यांच्यात समाजसेवेसाठी आवश्यक गुणांची वृद्धी करणे आवश्यक आहे. समाजातल्या समाजसेवकांचे जाळे सर्वत्र निर्माण झाल्याशिवाय समाजात चैतन्य व गतिमानता येणार नाही. समाजात काटकसरीची व बचत करण्याची  वृत्ती  निर्माण करण्याचे काम महिलाच उत्कृष्ट रीतीने करू शकतात. समाजातील उच्चनीचतेची भावना त्या नष्ट करू शकतात आणि समाज एकसंध बनवू शकतात. अशा प्रकारे किती तरी कार्य करावयाचे आहे. देश आणि भारतीय समाज बलवान करावयाचा तर धर्म , वंश , पंथ , जात , भाषा यांवर आधारलेले भेद नष्ट झाले पाहिजेत. आम्ही अस्पृश्यता , उच्चनीचता पाळतो. त्यामुळे समाजात एकात्मता निर्माण  होत नाही. समाजातून ही भेदभावाची भावना नष्ट करण्यासाठी स्त्रीया  मोलाचे कार्य करू शकतात . कारण पूर्वी छताछुतीची , जाती , धर्मभेदांची भावना स्त्रियांतच अधिक प्रमाणात होती. आजही जुन्या विचारांच्या स्त्रिय समाजात जास्त आहेत. त्यांच्या विचारात आणि आचारात मूलभूत फरक घडवून आणून समाजातून सर्व प्रकारेच भेद नष्ट करून समाज एकजिनसी बनविण्याचे महत्त्वाचे कार्य स्त्रियांनी व महिला संस्थांनी केले पाहिजे. स्त्रीया छोट्या मनाच्या असतात असे अनेकांचे मत आहे . त्या मताशी मी सहमत नाही. त्या जाणीवपूर्वक काम करतात तेव्हा विकाराला विसरून विचाराने काम करतात. खेळीमेळीने काम करतात असा माझा अनुभव आहे . ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या जागेपासून तो देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत सर्व जागा भूषविण्याचे कौशल्य त्यांच्यात आहे यात आता शंका राहिली नाही. जगाला विस्मित करून टाकणारे आजचे भारताचे कर्तृत्व एका स्त्रीच्याच नेतृत्वाखाली एकवटले आहे . दीर्घकाळ स्त्रियांचे कार्यक्षेत्र घरात, चार भिंतींच्या आत मर्यादित राहिल्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळत आहे. त्यामुळे देशाच्या प्रगतीला मोठा हातभार लागणार आहे . पावसामुळे ज्याप्रमाणे रोपांना अंकुर फुटतो , त्याचप्रमाणे संकटामुळे माणसाच्या कर्तृत्वालाही नवीन पालवी फुटते. याही संस्थेने संकटकाळात समाजाच्या कर्तृत्वाला चालना दिली आहे. आता त्यांना कर्तृत्वाच्या रोपट्याचे महावृक्षात रूपांतर करावयाचे आहे. आत्मविश्वासान कार्य केल्यास ते कठीण नाही. ते महत्तम कार्य ही संस्था करील व समाजात व एक नवीन आदर्श निर्माण करील अशी मला आशा आहे . 


संदर्भः वसंतराव नाईक यांची निवडक भाषने


 ( २१ डिसेंबर १९७४ या रोजी महिला समिती , मुंबईत दिलेले भाषन)
                            

       संकलनः दिनेश सेवा राठोड 
profdineshrathod.blogspot.com

******************************************


The society in which we were born, should united and integrated


  There will be no mobility in the society, unless the network of social workers is created everywhere. 

       -Vasantraoji Naik (Former Chief Mnister,Maharashtra State)

   There will be calamities in life whether it be of a person or a nation.  But how we behave in times of crisis and how we cope with adversity is a great honor for the individual or the country.  The dignity of a person is determined by one's own performance, while the dignity of the country is determined by the performance of the people of the country.  Organizations needs to work at different levels to wake up for the duty of the people of the country and give a constructive turn to work.  When the crisis occurs on the country, special work is expected from these organizations.  When Pakistan invaded our country in 1971, it was felt that there was co-operation in the state and especially in the fraternal institutes of Mumbai in view of the rich work.  And after trying in that direction, we find that many women organizations came forward to work.  They did more work in less time, and they were willing to do more.  Many people thought, 'If war went on for four more days, more duty could have been done.  It truly symbolizes the living nation. The society or nation in which we strive to overcome the crisis brought on by all our power will never be defeated. Whenever there was a crisis in Maharashtra, the people of Maharashtra faced the crisis with confidence and stubbornness.The earthquake in Koyna affected 1400 houses in 70000 villages and  6000  houses were damaged.  But the general public of Maharashtra built  seventy thousand houses in four months at a time.  Hundreds of villages are hit by the floods.  Thousands of homes are transported.  Millions of crores of rupees are destroyed.  We saw then that the people of Maharashtra dealt with the situation with great courage.  Maharashtra has the lion's share in  invasions occurred in 1962, 1965 and 1971.  Maharashtra provided more funds than any other state in the National Defense Fund. In 1965 , Lal Bahadur Shastri told me, 'We do not have any foreign currency to bring these items which are necessary for war.  So you shoud give  freely.   And I am proud to say that the people of Maharashtra gave more gold than the whole country has not collected !  In this regard country on one side and Maharashtra on one side !  When the country was invaded, the government decided to raise the maximum amount of funds in the scheme.  And in Maharashtra, where people are expected to collect Rs 31 crore per year, the people invested Rs 68 crore. This shows how far the people of Maharashtra are at the forefront of any work, and how big a contribution they can make.  Basically, it is the feeling of patriotism is intense among the people of Maharashtra.  But these emotions need to be addressed.  They work in different organizations in the community.  They do it in a special way in times of crisis.  It is a pleasure to see that there are many institutes of wives in Maharashtra and Mumbai who work together to bring about mutual cooperation and solidarity in these institutions.
   The magnitude of the organization and its usefulness do not depend on the organization's ability to raise funds. I'm saying this in the sense that your organization did not collect little money. Certainly,  you got a lot of money, and it was given to the central government too.  But the money you got came from the poor, the money from the ordinary. The monetary value they gave is huge.  Some of those from whom you received money are those who, with no money left to themselves, offered all the money for this fund. There are those who are hungry and work for their meals.  Some even paid all the money they had, but took out the loan because it was too low.  Some worked hard and paid. Their donation is valuable.  The amount of funds they have given is in the  sense of sacrifice for the country.  Loyalty has been expressed in the country. The patriotism of the country has been expressed.  As a member of this committee, they got a place to express their feelings.  They found a way to share the warmth of patriotism among them.  To a lesser extent, it was a relief to do something for the country.  This created a feeling of affection for the organization in the minds of the poor, the general public. The motivation for doing something through your  organization is really inspiring.  I think, the work done by your organization to create awareness among the masses is worthwhile in millions.  When many small people come together and work stubbornly, they can do greater things than the big ones.  It is a symbol of social unity. In the society in which we were born, we would prefer to become united only if the society was at the forefront of progress. Today, the Women's Committee has collected more than one million funds by collecting small sums from the poor.  War is not over, your work is still continued.  In fact, in times of peace, we have the task of strengthening the country.  We should strengthen this country in the years to come, so that no one will dare to look at this country in a curvy way.  Creating too many fighter planes, warplanes, bombs or other war materials does not make the country strong.  Made many factories in the country, built dams, harvested a lot of food.  Even if skyscrapers are built, electricity is bright, the country is not strong.  So the strength of the country depends on the wisdom of the people living in the country, their character and their duties and attitude towards the country.  In the coming new generation, the more these virtues, the more the country becomes stronger.  Its strength is increasing in its prosperity and this crucial task of creating a new generation is dependent on women at large scale.  Just as Jijabai gave birth to Chhatrapati Shivaji for a virtuous nation. In the same way every woman should do the important job of creating a loyal and patriotic generation. When the woman in the house is educated, she learns all the houses and becomes ritualistic.  For this, women should learn, girls should be motivated for education. Women's education should be spread and spread everywhere.  Today, the student is ready to study and he is ashamed to labor.  Working in the field seems daunting.  By changing these feelings, love for labor, affection for labor should be created in the new generation.  We should feel affection for our neighbors - about this, the community, the people who are marginalized in the society.  They should cultivate the feeling that we are sculptors of ourselves and our country. They should have faith in constructive work.   If the war is over, it  doesn' mean we will not be worthy of it. Now maybe some of the commodities will be created.  We may also need to take a few days to recover from the additional stress caused by war.  Because the true outcome of the war is the end of the war.  So while enjoying the victory of war, we must be prepared to face the conditions that arise after the war.  Even now, collecting goods, destroying food and other items should be avoided.  The work of this organization is not yet finished.  Women organizations need to embrace social service, encourage them to innovate, and enhance the qualities required for social service.  Unless the network of social workers is created everywhere, there will be no movement and mobility in the society. Women can do their best to create a sense of humiliation and saving in the society.  They can eradicate feelings of inferiority in society and make society united. This is how much work is to  be done in order to strengthen the country and the Indian society, the discrimination based on religion, race, creed, caste and language should be destroyed.  We adhere to untouchability.  It does not create unity in society.  Women can do valuable work to eradicate this feeling of discrimination from society.  Because in the past, there was a higher prevalence of ceiling, caste, caste discrimination among women.  Even today, women of old thinking are more in the society.  The important task of women and women's organizations is to make the society united by making a fundamental difference in their thinking and behavior by eliminating all forms of discrimination from society.  Many believe that women are  narrow minded.  I disagree with that opinion. They work consciously, forgetting the disorder, and acting thoughtfully.  It is my experience that I work for this . There is no doubt that women have  the ability to win all the seats from the Gram panchayat sarpanch to the Prime minister of the country.  Today, India's mission to unleash the world is united under the leadership of a woman.  Long-term women's workplaces are gaining prominence in the home, confined within the four walls.  Therefore, the progress of the country will be increased.  Just as the rains germinate the seedlings, so does the man's duty.  It has also promoted the duty of the community in times of crisis.  Now they want to transform the plant of duty into an oasis.  Working with confidence is not  difficult.  I hope that this organization will do a great job and create a new model for the society to shape developed country.


 References: Vasantrao Naik's Selected Speeches 

(Speech delivered before *Women Committee, Mumbai on December 3, 1974)


      Compiled by : Dinesh Seva Rathod
 profdineshrathod.blogspot.com
   


Saturday, July 20, 2019

VASANTRAO NAIK: Historical Things to Remember THROUGH OTHERS' EYES FROM THE GOLDEN PAGES OF HISTORY In the words of.....Ex-MLA Mrinal Gore





VASANTRAO NAIK:
Historical Things to Remember
THROUGH OTHERS' EYES FROM THE GOLDEN PAGES OF HISTORY
In the words of....... 
Ex-MLA Mrinal Gore 

 मृणाल गोरे (२४ जून, इ.स. १९२८- १७ जुलै, इ. स. २०१२; वसई, महाराष्ट्र,भारत) या भारतातील समाजवादी कार्यकर्त्या-राजकारणी, विधानसभेतील आमदार होत्या. सामान्यजनांच्या आणि महिलांच्या समस्यांबद्दलच्या विविध चळवळींचे यांनी नेतृत्व केले. वसंतरावजी नाईक समवेत त्यांचा हा अनुभव...  
                                संकलन- दिनेश सेवा राठोड 
-------------------------------------------------------------------
  मे , १९७२ ते १९७५पर्यंत आमदार म्हणून मी काम केले. या तीन वर्षाच्या काळात विधानसभेत आम्ही नाईक साहेबांना  सातत्याने विरोध केला. आमचा व त्यांचा वैचारिक संघर्ष ठामपणे चालू होता. पण व्यक्ती या नात्याने त्यांनी आमच्याबद्धल कटूता दाखविली नाही. १९७२ साली दुष्काळामध्ये भरमसाठ वाढलेल्या महागाईबद्धल आम्ही मोर्चा काढला होता.  १० - १२ हजार बायका हातात लाटणे घेऊन घोषणा देत मोर्चात सामील झाल्या होत्या. सचिवालयात मंत्रीमंडळाची बैठक चालू होती. पोलीस प्रमुखांचे म्हणणे होते की आम्ही परत निघून जावे. परंतु मुख्यमंत्र्यांनी आमच्यासमोर येऊन आपले काय म्हणणे आहे ? ते सांगावे असे आम्हास ठामपणे सांगितले. पोलीसांना काय करावे ते कळेना. एखादे लाटणे कुणी फेकून मारले तर ? परंतु मी पोलीस कमीशनरला तसे होणार नाही हे विश्वासाने सांगितले. जेव्हा विरोधकांच्या समोर मुख्यमंत्री वसंतराव नाईक आले. आम्ही सर्वजनी  विरोध नकरता फक्त लाटणे झतात उंच धरून त्यांचे स्वागत केले. त्यांच्याबरोबर त्यावेळचे राज्यमंत्री शरद पवार होते. त्यांनी समोर आल्याबरोबर सांगितले “ तीन दिवसांच्या आत सर्व रेशन दुकानांतून अपेक्षित माल मिळेल? "त्यांच्या भाषणातील आश्वासनाने आमच्या मोर्चाचा हेतू सफल झाला होता.
  माझी खरी राजकीय कारकीर्द वसंतराव  नाईक सोबत 1972 पासून सुरू झाली. त्यावेळी भीषण दुष्काळ होता. अन्नधान्याचीही टंचाई होती. त्यावेळी  वसंतराव नाईक  मुख्यमंत्री असताना जनतेच्या अनेक प्रश्नांसाठी मी आवाज उठवत असताना केवळ, नाईक साहेबा मुळेच नेतृत्वाचे खरे गुण मला आत्मसात करता  आले. राजकारणातील असे अभ्यासु व्यक्ती  भविष्यात मिळणे ही आपवादात्मक बाब ठरेल असे वाटते..

संदर्भ -फूटप्रिंट्स ऑफ द क्रूसेडरः द लाइफ स्टोरी ऑफ मृणाल गोरे लेखिकाः डॉ. रोहिणी गवाणकर 
              ------------------------------------------ 
       I  served as an MLA from May  1972 to 1975.  During these three years, we have consistently opposed  him in the Legislative Assembly.  In those days, We and their ideological struggle were firmly underway.  But as individuals, Vasantraoji Naik did not show his bitterness.  In the year 1972, we had organised a rally in the wake of the drought-like inflation. We were  3-4 thousand wives in the march.  The cabinet meeting was underway in the secretariat. The police chief said that  we should  return. We were excited to know what does the chief minister says to us in front of us?  We were told to stop march and return. The police did not know what to do. But I told the police commissioner, our march will be silently performed and nothing will happen.  In front of the opposition, Chief Minister Vasantrao Naik came. At that time Hon. Sharad Pawar  was then Minister of State in the Ministry, was with him, We all just greeted Naik instead of opposition. He came forward and said, "Within three days, all the ration shops will get the required goods?"  "With the assurance of his speech, the purpose of our march became successful. 
   My real political career started with Vasantrao Naik in 1972. There was a severe famine at that time. There was also a shortage of food. As Vasantrao Naik was tChief Minister, due to Naik, I learned  the true qualities of leadership while raising the voice of many questions of the masses.
Having such a studied person in politics seems to be a rare event in the future.


       Compiled by- Dinesh Sewa Rathod 
www.profdineshrathod.blogspot. com


VASANTRAO NAIK: Historical Fact to Remember THROUGH OTHERS' EYES FROM THE GOLDEN PAGES OF HISTORY

                    VASANTRAO NAIK:
Historical Fact  to Remember
THROUGH OTHERS' EYES FROM THE GOLDEN PAGES OF HISTORY
In the words of.......
SHRI . DAYANAND BANJODUKAR
 (Ex - (Ex-Chief Minister of Goa , Daman and Diu) 

   Maharashtra' s soft - spoken, polished and superb Chief Minister Mr. Naik is undoubtedly a tremendous asset. I have had the good fortune to have met him when he was the Revenue Minister in the State. He stayed with me for nearly a week . I had thus a good opportunity to have a close glimpse of my dear friend in his most informal moments.
  What I appreciate most in him is that he is not a tub-thumping orator , but a practical social worker who speaks less and does note concrete work. It would be difficult to find others who have done so much for so many in  short a time . A farmer loves harmony all round and being born one, Vasantrao loves it interisely. That is why, perhaps, he has , with sweel reasonableness , travelled the arduous path, taking with him the opposition in his stride. On many momentous and controversial issues , he has unhestingly taken the counsel of his party and the views of the opposition and he has always come out with flying colours . I liked to watch him, calmly smoking his pipe, and undisturbed, solving many a tangled problem of the premier State in India . Nothing Tuffled him . Talking over a Chief Minister at a critical juncture , he has piloted the destiny of the State and has firmly laid the foundation of a propermiss Maharashtra.

            Compiled By- Dinesh S.Rathod
               www.profdineshrathod.blogspot.com
     
Ref. Desai Dinesh- Plough and Pipe  page 41
                ------------------------------------------


Tuesday, July 16, 2019

गोरबोली भाषारो सामाजिक भाषा शास्त्र/समाज भाषा विज्ञान..!


*गोरबोली भाषारो सामाजिक भाषा शास्त्र/समाज भाषा विज्ञान..!*

- कतरी कतरा छेळीन फाडनाके.
- घडीखांड एराम भी कर लेणू.
- मुंडो लगाडेन कांयी छ ?
- वारुसेक लंगावण घालन देमेलेस. 
- तार सरिख वारसेक चलेगे.
- तार सरिख छप्पन देखमेलो छू.
- पफोळी फाटगी  (तांबडे फुटलंय) 
- सवारो वेगो (उजाडलंय)
- झाकटेर आंगज वावरेम चले जावचं.
- झाकट पडतूज घर आवचं.
- पाणी झांजरगो छ.
- झगर लाग जाये,झामे वणान माररी छ.
- के
- नंजर लाग जाये.
- हांगोळी कर लं,पाणी भेळमेली छू.
- सिकमं बाटी मेलछांडी छू,दोपेरपडी खालेस. 
- से एलमाल छ क ?
- ताडो सिळो करं!
- वेरा वणचागो.
- वावडीमं दि परस पाणी छ.
- राम पोरेमं ठालोपालो बकवाना मत कर!
- घर ठालोठालो लागरो छ.
- मार ओडेर सोड धरा नाकेस.
- बोल कोनी गो ?
- बोलं कानी जा ?
- बोल कानी गो ?
- बोलचाल करतू पकडोगे !
- भेसी रामरी छ .
-बळद वगाळरो कोनी,बेमार छ कांयिको? कानकळासी तो ठिक दखारी छ.
- बळद घणो दाडचं,बरोबर कुटाये कोनी.
- बाटीमाटी धापन खातोजो!
- वेलाकसालाती रंडापो काडलीदी;पणन दुसरो धणी कोनी किदी.
- तरसाळेन लोटाभरो पाणी देणू.
- आतरा तरसाणू कोनी केनी? 
- कोळीयार छ क,काचेकुलरेर छ ?
             (सवार)

                                       *भीमणीपुत्र*
                                 *मोहन गणुजी नायक*
                    ------------------------------------------ 
 *बापू, गोरबोलीर सामाजिक भाषाविज्ञानेर अभ्यासपूर्ण विश्लेषण किदे..धन्यवाद !!*
  इतर भाषा सरीक गोरबालीन भाषाविज्ञान छ. गोरबोली भाषार अध्ययन करन भाषार उत्पत्ति, स्वरूप, विकास येर  वैज्ञानिक आन सामाजिक  विश्लेषणात्मक अध्ययन किदे तोच भविष्येयेम गोरबोलीन न्याय मळीय. कातो गोरबोली भाषा शास्त्रेर  कसोटीम पूर्ण उतरच. (Gorbli qualify all the Criteria of linguistics as like Marathi and English Language and there are such principles  or standard by which Gorboli  can be considered as a perfect  language rather than dialect.) आजकाल राजकीय पाठबळेर अभावा रेयेर येती गोरबोलीन न्याय मळरो कोणी. विद्यापीठ स्तरेप वोपर संशोधन वेरो कोणी. गोरबोली भाषाविज्ञान, भाषार स्वरूप, अर्थ और वोर ऐतिहासिक सन्दर्भेर  विश्लेषण करणो काळेर गरज छ. है। तोच गोरबोली भाषार दस्तावेजीकरण आन विवेचन मायीती गोरबोलीर भाषिक सौंदर्येन न्याय मळीय.
गोरबोलीर सामाजिक भाषाविज्ञान बकम उंडो छ आन वू व्याकरणेती वेगळो छ. गोरबोली व्याकरणेर नियमेम तंतोतंत बेसच. गोरबोली भाषार का कार्यात्मक अध्ययन (functional description) गोरबोली व्याकरणेमायीती दकान पडच.आजकाल इतर बोली आन भाषार  भाषा-विज्ञानेर दृष्टिकोनेती विशेष महत्त्व देन वोपर संशोधन वेरोच..असोच हामार गोरबोली भाषार अभ्यास आन संशोधन वीय तोच गोरबोली भाषार सुवर्ण काळ दूर छेचा..
                                           - दिनेश सेवा राठोड
                      ----------------------------------------

Sunday, July 14, 2019

गोरबोली: एक चिंता व एक चिंतन - नवलकिशोर राठोड / नामा नायक यवतमाळ ( महाराष्ट्र राज्य )

              गोरबोली: एक चिंता व एक चिंतन             
लेखकनवलकिशोर राठोड / नामा नायक यवतमाळ 
  
    गोर बोलीभाषा  पिढ्यांनं पिढ्यापासुन प्रवाहित होत आली आहे.कालौघात स्वतःची लिपी नसल्यामुळे देवनागरी लिपीतील तिचे ठराविक स्वरुप निश्चित झाले आहे.
   गोरबोली बोलणा-या गोरबंजारा समाजात आपल्या बोलीभाषेविषयी कमालीची अनास्था आहे.आपण आपल्या भाषेचा गांभीर्यानेि विचारच करणे सोडुन दिले आहे.हेच मुख्यत्वे आजचे आपले व गोर बोली भाषेविषयीचे चिंतेचे कारण आहे.
    गोरबोलीला हजारो वर्षाची ऐतिहासिक परंपरा आणि समृद्ध वारसा आहे.ती जगातील सर्वात आदिम अशा सिंधू संस्कृतीशी नाते जोडुन तिचे अवशेष अंगाखांद्यावर घेऊन आजही जगते आहे. सिंधू संस्कृतीच्या पतनानंतर तेथील वारसा सांगत बंजारा समाजाची गोरबोली नंतरच्या काळात भटक्या जीवनअवस्थेत वावरणा-या गोर समाजाची लोकभाषा असल्याने, ज्या ज्या परिसरातुन त्याना मार्गक्रमण आपल्या आजीविकेसाठी करावा लागला, तेव्हा त्याना तेथील भाषा एकतर शिकावी लागली किंवा त्या भाषेतील दैनदिन व्यवहारासाठी आवश्यक शब्दाना आपल्या गोरबोलीत,भाषेत स्थान देऊन, समाविष्ट करुन घेत एक अरिहार्यताम्हणुन ते आत्मसात करावे लागले, काळाच्या ओघात आपल्या बोलीत नविन शब्दाना समाविष्ट करावे लागले.त्यामुळे या गोरबीलीचे पुरातन मुळ स्वरुप, शुद्धता टिकून ठेवता आली नाही.पर्यायी शब्दाची,  नवनव्या शब्दाची सातत्याने भर पडत गेली.दुस-या शब्दात सांगायचे  झाल्यास गोरबीली बदलत्या काळाबरोबर  अधिक समृद्ध होत गेली, हा तिचे आजचे बदललेले विकसित स्वरुप पाहता सांगता येईल.कोणतीही भाषा वा भाषेतून  येणारे भाषिक ज्ञान हा सतत वर्धिष्णू आणि विस्तारक्षम असावा लागतो.तरच तो समकालीन आणि अद्ययावत होऊ शकतो.आजच्या गोरबीलीच्या अवस्थेबद्दल बोलायचे झाल्यास, गोरबीलीचे पूर्वीचे समाजातील स्थान आणि लोकव्यवहारात मिळत गेलेला मान, आज टिकविणे हे तर फारच जिकरीचे सोबतच आव्हानात्मक झाले असुन तिचे पुर्वीचे वैभवशाली वर्धीत स्वरुप टिकवितांना पुरती दमछाक होतांना दिसत आहे. आजची गोरबीलीची अवस्था पाहु जाता गोरबोली शहरीभागात नोकरी वा काही कारणाने वास्तव्यास असणा-या व गोरबोली बोलणा-या बंजारा भाषीकामधुन नामषेश होण्याच्या मार्गावर असुन, तांड्यात सुद्धा ती गटांगळ्या खाताना, बाह्य भाषाचे सततचे आक्रमण झेलत कशीतरी तग धरुन आहे.मात्र,एकंदरीत पाहू जाता गोरबोलीचे अस्तित्व हे समाज- बांधवाच्या आणि विशेषत्वाने गोरबोली बोलणा-याच्या इच्छेवर अवलंबून राहणार आहे. येणा-या काळात आपली मायबोली-गोरबोली टिकवुन ठेवण्यात समाजबांधव कोणती भुमिका बजावतात यावर सारे तिचे भवितव्य निर्भर आहे.
     जगातील इतर बोलीभाषा आज जगाच्या पाठीवरून नामशेष होण्याच्या वा होतं असल्याचे भाषाशास्त्रीनी धोक्याचा इसारा दिला असुन बोलीभाषा प्रेमीनी आपआपल्या भाषेबाबत भविष्यातील धोके लक्षात घेऊन आजच सावध  राहण्याचे लक्षात आणुन दिले आहे, ते उगीच नाही? जगातील आपल्या सारख्या बोली भाषेची मरणकळा पाहताना आपली गोरबोली जगाच्या नकाशावरुन नामशेष होते की, आपला भाषीक असणारा गौरवशाली वारसा जपत टिकून राहते किंवा कसे, हे पाहणे मुळात औत्सुक्याचे ठरणार आहे.जो समाज आपल्या भाषेपासुन दुरावतो, तो आपल्या संस्कृतीपासुन तुटतो,असा भाषेपासुन दुरावलेला समाज  आपले अस्तित्व आपल्या हातानी संपवितो,सोबतच तो नष्ट होतो, हा इतिहास आहे. 
      यासाठी जर आपली बोलीभाषा टिकवायची असेल तर या लोकबोलीत, गोरबोलीत मोठ्याप्रमाणात साहित्याची निर्मिती झाली पाहिजे, नव्हे ते आज करणे फार गरजेचे झाले आहे.परंतु खेदाची बाब ही आहे कि, हे सारे समजुनही आजच्या पिढीचे गोरबंजारा लेखक,  ( काही सन्माननीय अपवाद आहेत) कवी, साहित्यिक मोठ्याप्रमाणात आपल्या गोरबोलीतुन लेखन करतांना, अभिव्यक्त होताना आजही दिसत नाहीत. याचे गांर्भियच त्यांना कळाले नाहीवकी काय? हे कशाचे लक्षण समजावे? 
     तेव्हा आताही वेळ गेलेली नाही. गोरबंजारा समाजात गोरबोलीसोडुन अन्य भाषेत बरेच प्रतिथयश विचारवूत,लेखक, कवी, साहित्यिक  चिंतनशील, वाचणीय लेखन करतांना दिसतात. त्यानी जर इतर भाषेचे व्यासपीठ न  वापरता आपल्या बोली- भाषेपासुन लेखन केले, तर ते गोरबोलीचे आपल्या मायबोलीचा पांग फेडल्यासारखे  निश्चितच होईल.नव्हे ती आपली गोरबोली टिकवुन ठेवण्यासाठी मोलाचे योगदान दिल्यासारखे होईल.आणि याची दखल येणारी पिढी नक्कीच घेईल. असे लेखन गोरबोलीतुन आपल्या हातुन घडले, तर गोरबोलीभाषेचा इतिहास लिहिताना येणारा काळ आपण दिलेल्या गोरबोलीतील लेखनाची, योगदानाची दखल निश्चित घेतल्याशिवाय राहणार नाही.आपल्या उल्लेखाशिवाय ते पुर्ण होऊच शकणार नाही, एवढे मात्र नक्की.  नव्हे तर गोरबोली टिकवायची, तगवायची नि वाढवायची असेल तर गोरबोलीतुन लिखाण करने ही काळाची गरज आहे. तरच आपण आपली मायबोली- गोरबोली टिकवुन ठेऊ शकू; नाहीतर आपली गोरबोली संपली, भाषा संपली की भाषेबरोबर येणारे वा बोलीभाषेतून केले जाणारे गोर संस्कार संपतील,गोरसंस्कार संपले की गोर समाज संपेल,आणि समाज संपला की आपली गोर संस्कृती संपेल, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज भासणारा नाही.हे सारे आपल्या डोळ्यादेखत घडु द्यायचे नसेल तर वेळीच समाजातील सर्व बुद्धीजीवीनी सावध झालेले बरे.
         आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा झपाटा पाहला की वाटते तो सा-या प्रादेशीक भाषाच्या मुळावर येणारा आहे.या भयशंकेने सा-यांनी चिंतीत होऊन चिंतन करण्याची गरज आहे. ज्याना ज्याना आपली बोली, भाषा जीवंत राहावी असा वाटते, अशा सा-यानीच बोलीभाषेसमोर उभ्या ठाकणा-या या आवाहनाचा मुकाबला करण्यासाठी चिंतन, मनन करणे व आपली भाषा म्हणजेच आपले समाजाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सगळ्यांनी आजपासुनच पडेल तो त्याग व योगदानाची भुमिका घेतली पाहिजे. तसेच आपल्या बोली- भाषेवर  येणारे भविष्यातील आव्हानाचा मुकाबला आपण कोणत्या विचाराने आणि आयुधाने करतो यावर आपले आणि आपल्या गोरबोलीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. हे बोलीभाषेसमोर उभे ठाकलेले आव्हान  परतवून लावण्याचे एकच सशक्त माध्यम म्हणजे समाजातील सगळ्या प्रथितयश लेखक, कवी, साहित्यिक  यानी आपल्या बोलीभाषेपासुनच यापुढे लेखन केले पाहिजे,तरच ते गोरबोलीचे आपल्या मायबोलीच्या  शतकाचे पांग फेडल्याचे सार्थक होईल व प्रयत्न सार्थकी लागण्याचे पुण्य आपल्या पदरी पडेल, एवढे मात्र नक्की. सोबतच आपल्या घरात गोर बोलीला मानाचे स्थान देणे, गोरबोलीत आपण बोलणे व आपल्या पाल्यांना गोरबोली येईल एवडे बघणे आपल्याच हातात आहे; हे कोण नाकारेल? बघुयात..काय करतात ते..!!

                                                -- नामा नायक
-------------------------------------------------------------------
नवलकिशोर राठोड उपाख्य नामा नायक यवतमाळ (महाराष्ट्र राज्य)

Friday, July 12, 2019

VASANTRAO NAIK: Historical Fact to Remember THROUGH OTHERS' EYES FROM THE GOLDEN PAGES OF HISTORY

                    VASANTRAO NAIK:
         Historical Fact to Remember
       THROUGH OTHERS' EYES FROM THE GOLDEN PAGES OF HISTORY

In the words of.......
SHRI. RADHAKRISHNA R. RUIEA
(Ex-Chairman, Millowners' Association, Bombay)

  Since his assumption of the Chief Ministership of the State in December 1963, Mr. Vasantrao Naik has been making earnest efforts to promote agricultural growth so that the State may become self-sufficient soon in its requirements of foodgrains and industrial raw materials. Mr. Naik was probably the first among the Chief Ministers to realise the importance of agriculture to the Indian economy and to formulate his policies on the basis of that conviction. Mr. Naik is most competent to speak on agriculture and allied subjects. Though a lawyer by training, he is by birth, upbringing and outlook a peasant. He has lived and laboured among the agricultural class and is fully conversant with its problems. He is convinced that India can become self-sufficient in foodgrains and in such essential raw materials as cotton and has set out to prove this by galvanizing the farm economy of his own State. He does not spare himself. His energy is indeed amazing. He works every day of the week from 9 a.m. to 1. a.m. Even so, he is always good tempered and soft-spoken. The burden of responsibility that has fallen upon him, is staggering and yet he is calm and unperturbed. He is always pleasant and persuasive and has never been harsh either in word or deed. His mental equipoise is indeed remarkable. He adds to this rare quality a quiet competence which greatly helps him to take quick and right decisions even on the most momentous issues. I do not want to smother Mr. Vasantrao Naik with superlative praise, but I do wish to take this opportunity of wishing him a long and active life so that he may continue to serve the State and the country with characteristic wisdom and moderation.
     
श्री.  राधाकृष्ण आर. रुइआ
(माजी अध्यक्ष, मिलोअनर्स असोसिएशन, मुंबई)

  डिसेंबर 1 9 63 मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची पदभार सांभाळल्या नंतर श्री वसंतराव नाईक शेती वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. जेणेकरुन लवकरच राज्य आन्नधानौयाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल.  अन्नधान्य आणि औद्योगिक कच्च्या मालाची गरज लक्षात घेऊन  श्री. नाईक कदाचित भारतीय अर्थव्यवस्थेच्या शेतीचा महत्त्व समजून घेण्यासाठी आणि मुख्यमंत्रीांच्या नात्यावर आधारित धोरणे तयार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांतील आजतगायतचे पहिले निष्ठावान मुख्यमंत्री आहेत. या नात्याने श्री. नाईक शेती व संबंधित विषयांवर बोलण्यासाठी सर्वात सक्षम नेते आहेत.  ते अभ्यासू वकील असले तरी, ते जन्मातः शेतकरी कुटुंबातील आहे,  त्यांनी ग्रामीण शेती जवळून बघितलं शेती त्यांच्या समस्यांशी पूर्णपणे ज्ञात आहेत. त्यांना विश्वास आहे की भारत अन्नधान्य आणि अशा कच्च्या कच्च्या मालामध्ये परिपूर्ण बनू शकतो आणि स्वतःच्या राज्याच्या शेती अर्थव्यवस्थेला गॅल्वनाइझ करून हे सिद्ध करता येईल. असा त्यांचा गाढ विश्वास आहे. त्यांची काम करण्याची  ऊर्जा खरोखर आश्चर्यकारक आहे.  आठवड्याच्या प्रत्येक दिवशी ते सकाळी 9 . ते 1 पर्यंत काम करतात. तरीही, ते नेहमीच चांगले आणि सभ्य असतात. त्याच्यावर जी जबाबदारी आहे त्याचा भार खुप मोठा आहे आणि तरीही ते शांत आणि स्वस्थ आहे. ते नेहमीच आनंददायी आणि प्रेरणादायी असने हा त्यांच्या स्वभावाचा स्थायीभाव आहे.त्यांचे
शब्द किंवा कृतीत नेहमीच  अनुकूल असतात . त्याचे मानसिक कौशल्य खरोखर उल्लेखनीय आहे. त्यांच्या अशा या दुर्मिळ गुणवत्तेमध्ये शांत क्षमता कौशल्याची जोड आहे. ज्यामूळे ते अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर अगदी जलद आणि योग्य निर्णय घेण्यास तत्पर असतात . मी श्रीमान वसंतराव नाईक यांची अशी उत्कृष्ट स्तुती करने अतिशयोक्ती ठरू नये.  परंतु मी त्यांना दीर्घ आणि सक्रिय राजकीय वाटचालची शुभ कामना देऊ  इच्छितो.ते सदैव  ते राज्य आणि देशाची सेवा आपल्या वैशिष्ट्येपूर्ण अशा संयम व अभ्यासू व्यक्तीत्वातून अविरत होत राहील.
                ------------------------------------------
Compiled By- Prof.Dinesh Sewa Rathod
    www.profdineshrathod. blogspot.com 
                    Mob- +91-9404372756 

Thursday, July 11, 2019

Specimen Activity Sheet Unit Two: Family 2.1 I ran into a stranger

             Specimen Activity Sheet

                    Unit Two: Family 
           2.1    I ran into a stranger 

Q.4  Read the extract and do the activities that follow (Lines I to 17)                 8 -marks

Extract-  [Coursebook Page 29/ line 1-17]
 I ran into a stranger as he passed by 
"Oh, excuse me please" was my reply. 
He said, "Please excuse me too; wasn' t even watching for you." 
We were very polite, this stranger and I. 
We went on our way and we said good-bye 

But at home a different story is told, 
How we treat our loved ones, young and old 
Later that day, cooking the evening meal. 
My daughter stood beside me very still 
When I turned, I nearly knocked her down
 "Move out of the way," I said with a frown
 She walked away, her little heart broken. 
I didn't realize how harshly I'd spoken. 

While I lay awake in bed, 
God's still small voice came to me and said,
 "While dealing with a stranger, common courtesy you use.
 But the children you love, you seem to abuse. -
----------------------------------------------------------
 A1. Describe
 Describe with evidence from the poem how we treat strangers and our loved ones differently          (2) 

A2 Poetic Device: Figure of Speech
 Find out an example of the figure of speech "Antithesis' from the extract and explain it                   (2) 

A3. Personal Response 
Write down two instances at which your mother treated you harshly and state wh intention was behind it. (2)
A4. Creativity
 Frame four poetic lines on the following situation using a rhyming pattern: 
 "While introducing great personalities, we praise them very highly and talk about their qualities, but while speaking about our friends we may not follow the same trend." 

                   Model Answers  

 Q.4. Al: Describe 
When we run into a stranger, we immedistely say sory as the mother and the stranger did in the poem. "Oh, excuse me please," was mother's reply He said "Please excuse me too, wasn't even watching for you But at home we are very casual and treat our family members roughly The mother, in the poem, after accidentally knocking her little child shouts at her, saying "Move out of the way." 

 A2: Poetic Device: Figure of Sperch "How we treat our loved ones young and old Two contradictory words, 'young' and 'old' are brought together for the poctic effect It is called Antithesis

 A3: Personal Response
 Probable reasons for mother treating her child roughly may be : --The mother may be very busy her daily chores.
--The mother may be lost in her thought.
---The mother may be unaware of her child standing behind her.
--- The mother may be in a great hurry
 (Accept any two responses or even other than the above-mentioned responses if they are reasonably relevant)

 A4: Creativity
 While ntroducing great personalities----- a
We flatter and praise their qualities--- a 
 But while speaking about our friends, --- b 
Do we really follow the same trends?  --- b  
******************************************
               Compiled By- Prof.D.S.Rathod

World Banjara Day

Mr. D. Rama Naik took the historic initiative to organize "World Roma-Banjara Day" in India. Compiled by-  Dr. Dinesh Sewa...